Site icon Get In Marathi

TATA PUNCH EV 3.3 : इलेक्ट्रिक कार मध्ये सर्वात जास्त affordable कार,मार्केट मध्ये घातलाय धुमाकूळ,कींमत एकूण होणार तुम्ही थक्क

TATA PUNCH EV 3.3

TATA PUNCH EV 3.3 : इलेक्ट्रिक कार मध्ये सर्वात जास्त affordable कार,मार्केट मध्ये घातलाय धुमाकूळ,कींमत एकूण होणार तुम्ही थक्क

TATA PUNCH EV 3.3

TATA PUNCH EV 3.3 : मार्केटमध्ये SUV कार धुमाकूळ घालत आहे ग्राहकांपुढे खूप असे पर्याय मध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल दरवाढ आणि डिझेल दरवाढ यामुळे ग्राहक त्रस्त झालेले आहे त्याचबरोबर वाहनांमध्ये येणारे मेंटनन्स हे सुद्धा खर्चिक असते या सर्वांवर पर्याय म्हणून इलेक्ट्रिक कार एक वरदान ठरत आहे सध्या इलेक्ट्रिक कारचा खूप क्रेझ वाढला आहे आणि भविष्यात देखील इलेक्ट्रिक कारच हा एक चांगला पर्याय असेल.इलेक्ट्रिक कार कंपनीमध्ये सध्या चढाओढ सुरू आहे भरपूर कार आता इलेक्ट्रिक मध्ये उपलब्ध आहे यामध्ये सर्वात बेस्ट कार कोणती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेऊ.

Electric Car : सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार चे क्रेज वाढल्यामुळे आता कार कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चांगले फीचर्स आणि जास्त किलोमीटर रेंज असणारी कार मार्केटमध्ये घेऊन येत आहे यामध्ये टाटा कंपनीने आपले वर्चस्व कायम ठेवत इलेक्ट्रिक कार मध्ये देखील आपणच सरस असल्याचे दाखवून दिले आहे. टाटा कंपनीची TATA PUNCH EV 3.3 ही SUV कार मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहे टाटा पंच कार आपल्या फीचर्स आणि कमी किमतीमुळे मार्केटमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ठरत आहे.

TATA PUNCH EV

ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 300  ते 400 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते त्याचबरोबर या कारमध्ये चार्जिंग देखील फास्ट होते. बॅटरीचे दोन ऑप्शन दिलेले आहेत या कारची किंमत १०.९९ लाख पासून सुरू होते. टाटा कंपनीने या कारचे स्थान टाटा नेक्सन च्या खाली आणि टियागो कार च्या वरती दिलेले आहे. 22 जानेवारीपासून ही कार मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहे लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत या कारची डिमांड ही वाढत चाललेली आहे. TATA PUNCH EV 3.3 ची टक्कर ही Citroen EV या कार सोबत होत आहे.

परंतु टाटा पंच हि  कार किंमत  आणि फीचर्स च्या बाबतीत वरचढ ठरत आहे. Citroen EV या कारची किंमत 13 लाखापासून सुरुवात आहे आणि या कारची रेंज ही 300 किलोमीटर पर्यंत आहे यापेक्षा जास्त फीचर्स हे TATA  PUNCH मध्ये उपलब्ध असून कारची किंमत देखील ही कमी आहे.  कार ची किंमत आणि मायलेज पेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारची असणारी बच्छावात्मक रेटिंग.

Citroen EV या कारची रेटिंग ही फक्त 2 आहे तर दुसरीकडे टाटा पंच कारची रेटिंग ही 4.5 आहे टाटा कार्स या आपल्या  मजबुतीने ओळखले जाते. जर एक्सीडेंट झाला तर टाटा कंपनीच्या कार ह्या थोडेफारच डॅमेज घेतात आणि प्रवासी देखील हे सुरक्षित राहतात परंतु बाकी कार्स मध्ये मजबुती नसल्याने प्रवाशांना आपला जीव गमावण्याची भीती असते.

आज देखील बहुतांश ग्राहक हे कारची मजबुती न बघता कार विकत घेतात जसे की मारुती SUZUKI कंपनीची SWIFT. स्विफ्ट हि कार 2023 मध्ये मार्केटमध्ये सर्वात जास्त विकली गेलेली कार आहे. परंतु तिची जर रेटिंग बघितली तर ती फक्त 1 आहे. ग्राहक विचार न करता आपले पैसे गुंतून कार खरेदी करतात.

कार खरेदी करताना फक्त कारचा लुक बघणे गरजेचे नसते. टाटा ग्रुपने मार्केटमध्ये दुसऱ्या कार कंपनींना टक्कर देण्यासाठी एकाहून एक वरचढ कार्स मार्केटमध्ये लॉन्च केले परंतु आपल्या कार बिल्ड कॉलिटी मध्ये थोडेही कॉम्प्रमाईज केले नाही कंपनीने ग्राहकांचा विश्वास टिकून ठेवलेला आहे .चला तर बघूया TATA PUNCH EV 3.3 कार चे काही वैशिष्ट्ये आणि तिची किमत.

दोन बॅटरी ऑप्शन  :

TATA  PUNCH EV BATTERY कारचे वैशिष्ट्य म्हणजे कंपनीने या कारमध्ये दोन बॅटरी पॅक दिलेले आहेत यामध्ये 25 किलो वॅट आणि 35 किलो वॅट क्षमतेचे बॅटरी पॅक दिलेले आहेत त्याचबरोबर चार्जिंग साठी देखील दोन पर्याय उपलब्ध आहेत यामध्ये घरगुती फास्ट चार्जर हे 7.2 किलोवॅट आणि 3.3 किलोवॅट वॉल बॉक्स हे चार्जर दिलेले आहेत 25 किलो वॅट बॅटरी क्षमता असलेली श्रेणीची कार ही 315 किमी धावू शकते तर 35 किलो वॅट बॅटरी बॅकअप मध्ये कार ही 421 किलोमीटर धावू शकते.

सुरक्षेची हमी :

सुरक्षेच्या दृष्टीने या कार्स मध्ये 6 एअर बॅग दिलेल्या आहेत त्याचबरोबर ईएसपी, एबीएस, इएससी, क्रूज कंट्रोल आणि 360  डिग्री कॅमेरा हे दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या कारची रेटिंग 4.5 आहे जी की बाकी कार सर्व कंपनी पेक्षा जास्त आहे.

चार्जिंग साठी लागणारा वेळ:

बॅटरी चार्जिंग करण्यासाठी वेळ देखील कमी लागतो. ही कार कोणत्याही  50 किलो वॅट डीसी चार्जर ने फक्त 56 मिनिटांमध्ये 80 टक्के पर्यंत बॅटरी चार्ज होते. तर पूर्ण चार्जिंग होण्यासाठी  एक तास वीस मिनिट  लागतात. या कारमध्ये वापरलेली बॅटरी ही वॉटरप्रूफ असून तिची वारंटी ही 8 वर्षे आहे किंवा 160000  किलोमीटर इतकी आहे.

TATA  PUNCH किती व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे : 

TATA  PUNCH कार ही किती अंतर धावेल यानुसार दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ते दोन व्हेरिएंट म्हणजे स्टॅंडर्ड आणि लॉंग रेंज स्टॅंडर्ड. यामध्ये दोन ऑप्शन दिलेले आहे स्टॅंडर्ड म्हणजे 25 किलो वॅट ची बॅटरी आणि 315 किलोमीटर  दुसरे आहे लॉंग रेंज स्टॅंडर्ड यामध्ये  35 किलो वॅट बॅटरी आणि 421 किलोमीटर  ची रेंज .जर फीचर्स नुसार बघितले तर TATA  PUNCH कार ही 20 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

कशी आहे  कार ची डिझाईन :

 TATA PUNCH EV 3.3 या कारची डिझाईन ही थोडीफार TATA Nexon  कारच्या मिळतीजुळती आहे. परंतु खूप सारे नवीन फीचर्स ॲड केल्याने कारचा लुक खूपच चांगला झालेला आहे कारच्या समोर जे एलईडी लाईट दिलेले आहेत ते एक पूर्ण सरळ पट्टीमध्ये आहे त्यामुळे कारचा लुक हा खूपच चांगला दिसतो बाकी कार्स मध्ये जसे Swift ला  हे दोन वेगळे असते. परंतु पंच मध्ये हेडलाईट हे पूर्ण एक सरळ आडवी पट्टीमध्ये दिलेले आहे त्यामुळे कार हि एकदम तगडी दिसते.. आणि चार्जिंग च्या वेळी जे सॉकेट आहे ते कारच्या फ्रंट मध्ये बंपरच्या वर दिलेले आहे.

आत मध्ये असलेले एक बटन दाबले की समोरील चार्जिंग सॉकेट चे कव्हर हे ओपन होते हे कव्हर सुरुवातीला थोडे पुढे येऊन नंतर एका बाजूला स्लाईड होते हे एक स्टॅंडर्ड फीचर्स दिलेले आहेत.या फीचर्स मुळे कार ला एक अप्रतिम लुक येतो.आणि बंपर देखील नवीन प्रकारे डिझाईन केलेले आहेत बंपरला  उभे  काळ्या रंगाचे आलोय  रॉड दिलेले आहेत त्यामुळे गाडीचा लुक हा एकदम भरगच्च वाटतो.

कारच्या बोनेट च्या खाली  स्टोरेजसाठी स्पेस दिलेला आहे बाकी कोणत्याही कारमध्ये हा स्पेस उपलब्ध नसतो. यामुळे ग्राहकाला वापरण्यासाठी तसेच काही सामान ठेवण्यासाठी जागा मिळते. तसेच मागील बाजूस Y  आकाराचा ब्रेक लाईट दिलेला आहे. मागील  बंपर देखील हे दोन कलर मध्ये डिझाईन केलेले आहे आणि कारच्या सर्व चाकांवर डिस्क ब्रेक दिलेले आहेत तसेच सर्व चाक हे  आलोय व्हील मध्ये उपलब्ध आहे.

इंटिरियर फीचर्स : 

TATA PUNCH EV INTERIOR

Top  मॉडेल मध्ये डॅशबोर्ड साठी 10.25 इंच असलेली  इन्फोटेनमेंट स्क्रीन दिलेली आहे यामध्ये 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एक मोठे टू स्पोक स्टेरिंग व्हील देखील आहे. TATA PUNCH EV 3.3  बेस मॉडेलमध्ये स्क्रीन 7 इंच इन्फोटेनमेंट आणि डिजिटल क्लस्टर आहे. रोटरी ड्राईव्ह ही सिस्टीम फक्त  लॉंग रेंज मध्येच उपलब्ध आहे.

हे देखील वाचा ! : शेतकऱ्याने कोणता ट्रक्टर खरेदी करावा ?

काही आकर्षक फीचर्स :

TATA PUNCH EV 3.3 कार मध्ये LED Headlamp,  प्याडल शिफ्ट सह मल्टीमोड  रिजन , इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि 6 एअर बॅग देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये चार मोड ऑप्शन दिलेले आहेत Smart , Adventure , Empowered  आणि Empowered Plus ,  या वेगवेगळ्या मोडनुसार कार ही आपली रेंज देत असते.

 एडवेंचर Model  ग्राहकांना हार्मोनचे 7 इंच  इन्फोटेनमेंट सिस्टीम, एप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी,ऑटो होल्ड सह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक क्रूज कंट्रोल कॉर्नरिंग फंक्शन,फ्रंट फॉग लॅम्प आणि सनरुफ देण्यात आलेला  आहे.

 एम्पावर्ड Model मध्ये 7 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले 10.25 इंच मोठी इन्फोटेनमेंट सिस्टीम, AQI  डिस्प्ले सोबत एक प्युरिफायर, SOS  फंक्शन,ऑटो फोल्डिंग ORVMS, 16  इंच डायमंड कट आलाय व्हील  आणि दोन कलर पर्याय, वायरलेस मोबाईल चार्जर,  व्हेंटिलेटेड फ्रंट सीट,360 डिग्री कॅमेरा देण्यात आलेला आहे.

हे देखील वाचा : Maruti Suzuki Alto 800 फक्त 60000/- रुपयांमध्ये ही कार घरी घेऊन जा

TATA  PUNCH EV PRICE कारची किंमत किती आहे ? :

 TATA  PUNCH EV PRICE कार ची किंमत ही 10.99 लाखापासून सुरुवात होते आणि १६  लाखापर्यंत विविध कार ऑप्शन उपलब्ध आहेत. कारची कींमत हि राज्य आणि शहरा नुसार थोडीफार वेगळी असू शकते.TATA PUNCH EV 3.3 मध्ये असलेले फीचर्स आणि मजबुती नुसार बाकी इलेक्ट्रिक कंपनीच्या कार पेक्षा पंच हि कार योग्य किमतीत उपलब्ध आहे.कारची अचूक किमत हि तुमच्या नजीकच्या डीलरकडे मिळेल.


Sr. No
Model / Varient ( प्रकार)Range KM
(क्षमता – किलोमीटर)
Ex – showroom Price (कींमत )
1Punch EV Smart 3.3315 KM10.99 Lakh
2Punch EV Smart Plus 3.3315 KM11.49 Lakh
3Punch EV Adventure 3.3315 KM11.99 Lakh
4Punch EV Adventure S 3.3315 KM12.49 Lakh
5Punch EV Empowered 3.3315 KM12.79 Lakh
6Punch EV Adventure Long Range 3.3421 KM12.99 Lakh
7Punch EV Empowered S 3.3315 KM13.29 Lakh
8Punch EV Empowered Plus 3.3315 KM13.29 Lakh
9Punch EV Adventure Long Range
3.3 (7.2 Fast Charger )
421 KM13.49 Lakh
10Punch EV Adventure S Long Range 3.3421 KM13.49 Lakh
11Punch EV Empowered Plus S 3.3315 KM13.79 Lakh
12Punch EV Empowered Long Range 3.3421 KM13.99 Lakh
13Punch EV Adventure S Long
Range 3.3 (7.2 Fast Charger)
421 KM13.99 Lakh
14Punch EV Empowered Long
Range 3.3 (7.2 Fast Charger)
421 KM14.49 Lakh
15Punch EV Empowered S Long
Range 3.3
421 KM14.49 Lakh
16Punch EV Empowered Plus Long Range 3.3421 KM14.49 Lakh
17Punch EV Empowered S Long
Range 3.3 (7.2 Fast Charger)
421 KM14.99 Lakh
18Punch EV Empowered Plus Long
Range 3.3 (7.2 Fast Charger)
421 KM14.99 Lakh
19Punch EV Empowered Plus S Long
Range 3.3
421 KM14.99 Lakh
20Punch EV Empowered Plus S Long
Range 3.3 (7.2 Fast Charger)
421 KM15.49 Lakh
SUV TATA PUNCH EV 3.3

कोणत्या कलर मध्ये उपलब्ध आहे :

TATA PUNCH EV 3.3 कार मध्ये 5 कलर ऑप्शन उपलब्ध आहेत.कारची कींमत हि कारच्या कलर नुसार थोडीफार वेगळी असते.

Tyre साईज काय आहे ? 

TATA PUNCH EV 3.3 कार मध्ये ३ प्रकारचे Tyre वापरण्यात आलेले आहे.

  1. समोरील tyre 185 / 70 R15 & मागील tyre 185 / 70 R15
  2. समोरील tyre 195 / 60 R 16 & मागील tyre 195 / 60 R 16
  3. समोरील tyre 194  / 60 R 16 & मागील tyre 195 / 60 R 16

हे देखील वाचा : BJP VS Dhruv Rathee

Spread the love
Exit mobile version