Site icon Get In Marathi

Today Onion Rate : आजचे कांदा बाजारभाव, सर्व जिल्ह्याचे आजचे बाजार भाव

Today Onion Rate : आजचे कांदा बाजारभाव, सर्व जिल्ह्याचे आजचे बाजार भाव

Today Onion Rate

Today Onion Rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया सर्व जिल्ह्यातील कांदा मार्केटचे दर, सर्व बाजार समितीमध्ये मागील 8 दिवसांमध्ये जे दर होते. त्यापेक्षा सध्या 500 ते 600 रुपये प्रती क्विंटलने कांदा दर वाढले आहे. सर्व बाजार समितीमध्ये सध्या कांदा आवक थोड्याफार प्रमाणात कमी झालेली आहे. (Today Onion Rate) त्याचे परिणाम आपल्याला दरवाढीमध्ये दिसत आहे. महाराष्ट्र राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने पुनरागमन केल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कांदा माल बाजार समितीमध्ये दाखल होत नाही.

परंतु काही जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्याने कांद्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहे. अजून देखील खूप सारे शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा साठवलेला आहे. सध्या मार्केटमध्ये नवीन कांदा देखील दाखल झाला आहे. 

Today Onion Rate

लासलगाव आजचे कांदा दर :

Today Onion Rate : आशिया खंडातील एक नंबरचे कांदा मार्केट लासलगाव येथे कांदा आवक वाढलेली आहे. आज लासलगाव येथील बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हा सुमारे 7000 क्विंटल एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता. लासलगाव येथील कांद्याला आज कमीत कमी दर 2000 आणि जास्तीत जास्त दर हे 3600 रुपये प्रती क्विंटल होते. तर सरासरी कांदा दर हे 3400 रुपये प्रती क्विंटल होते. तसेच पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीमध्ये देखील आज कांद्याला तेजीचे दर मिळालेले आहे.

आज पिंपळगाव बसवंत येथे तब्बल 18000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती आणि आज तेथील दर हे किमान 2000 तर कमाल 3860 रुपये प्रति क्विंटल इतके होते आणि सरासरी दर हे 3500 रुपये प्रति क्विंटल इतका दर कांद्यांना मिळाला. पुणे येथील बाजार समितीमध्ये आज 13849 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. (Today Onion Rate) आज पुणे येथील कांदा दर हे किमान 800 तर कमाल 3500 रुपये प्रति क्विंटल इतका होता आणि सरासरी दर हे 2650 रुपये प्रति क्विंटल इतके होते. बाकी बाजार समितीच्या तुलनेमध्ये आज पुणे येथील लोकल कांद्याचे दर हे कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत होती.

मुंबई येथे कांदा आवक 14592 क्विंटल इतकी होती आणि तेथील कांद्याला किमान 3000 रुपये कमाल 3600 प्रति क्विंटल इतका दर होता आणि सरासरी कांदा दर मुंबई येथे ते 3300 रुपये प्रति क्विंटल इतका बघायला मिळाला. (Today Onion Rate) कोल्हापूर येथील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक ही आज 5642 क्विंटल इतकी होती. तसेच तेथे आज कांद्याचे दर हे किमान 1200 तर कमाल 3700 होते आणि सरासरी कांदा दर हे 2500 रुपये प्रति क्विंटल इतके होते.

कोल्हापूर येथे देखील आज कांदा दर हे कमी होते. छत्रपती संभाजीनगर येथे कांदा आवक ही 543 क्विंटल इतकीच होती. तेथे कांद्याला आज दर हे किमान 1300 कमाल 3400 आणि सरासरी 2350 रुपये प्रति क्विंटल इतका दर उपलब्ध होता. सोलापूर येथील बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक ही प्रचंड होती. आज सोलापूर येथे तब्बल 18453 क्विंटल इतकी लाल कांद्याची आवक होती. तेथे आज कांद्याला दर हे किमान 1300 कमाल 4000 तर सरासरी 3000 /- रुपये प्रति क्विंटल इतके होते. तसेच बारामती येथे कांद्याची आवक ही अगदी कमी उपलब्ध होती.

बारामती येथे आज लाल कांद्याची आवक ही 307 क्विंटल इतकी होती. तेथील कांद्यांना आज किमान दर 1000 कमाल 3700 आणि सरासरी 2600 /- प्रती क्विंटल इतका दर मिळाला. (Today Onion Rate) नागपूर येथे लाल कांद्याची आवक आज ही 1800 क्विंटल इतकी होती. किमान 2500 रुपये कमाल 3500 रुपये तर सरासरी 3250 रुपये प्रतिक्विंटल इतका दर उपलब्ध होता. कळवण येथे उन्हाळी कांद्याची आवक हि प्रचंड प्रमाणात दिसून आली.

कळवण येथे आज 21850 क्विंटल उन्हाळी कांदा आवक होती. आज तेथे उन्हाळ कांद्याला किमान दर 1500 रुपये कमाल 3800 रुपये आणि सरासरी 3250 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. चांदवड येथे देखील आज कांद्यांना उत्तम दर मिळाले चांदवड येथे आज उन्हाळी कांद्याची आवक ही 2700 क्विंटल इतकी होती. तेथे आज कांद्याला दर किमान 2014 कमाल 3620 तर सरासरी 3450 रुपये प्रति क्विंटल इतके दर उपलब्ध होते.

येवला अंदरसुल येथे उन्हाळी कांद्याची आवक 3000 क्विंटल इतकी उपलब्ध होती. तेथील उन्हाळी कांद्यांना आज दर हे किमान 1200 कमाल 3517 तर सरासरी 3350 रुपये प्रतिक्विंटल इतके मिळाले. नागपूर येथे पांढरा कांद्याची आवक ही 1000 क्विंटल इतकी होती आणि पांढरा कांद्याला दर हे किमान 2600 कमाल 3600 तर सरासरी 3425 रुपये प्रतिक्विंटल इतके मिळाले.

पुणे येथील मोशी बाजार समितीमध्ये लोकल कांद्याची आवक ही 485 क्विंटल इतकी होती. तसेच या कांद्यांना प्रतिक्विंटल दर हे किमान 2500 कमाल 3000 तर सरासरी 2750 रुपये प्रति क्विंटल एवढे मिळाले. पिंपळगाव बसवंत-सायखेडा येथील बाजार समितीमध्ये उन्हाळा कांद्याची आवक ही 6490 क्विंटल एवढी होती. (Today Onion Rate) या उन्हाळी कांद्यांना प्रतिक्विंटल दर हे किमान 2500 रुपये कमाल 3511 रुपये तर सरासरी 3450 /- रुपये प्रतिक्विंटल इतके दर मिळाले.

(Today Onion Rate) बाजार समितीमध्ये आता लाल कांदा देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. तरी देखील उन्हाळ कांद्याचे दर हे टिकून असल्याने शेतकऱ्यांना उन्हाळ कांद्याला चांगले दर मिळत आहे.

हे देखील वाचा : Soyabean Subsidy : सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5000 रुपये अनुदान, सरकारचा मोठा निर्णय

Spread the love
Exit mobile version