USA VS ENG : इंग्लंडची सेमी फायनल मध्ये एन्ट्री, यु एस ए वर 10 विकेट्स ने विजय

USA VS ENG : इंग्लंडची सेमी फायनल मध्ये एन्ट्री, यु एस ए वर 10 विकेट्स ने विजय

(USA VS ENG) United States vs England Highlights : इंग्लंड संघाने सुपर 8  मधील सामन्यात यूएसए विरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. आणि सेमी फायनल मध्ये एन्ट्री केली आहे.(USA VS ENG) विश्वकप विजेता इंग्लंड संघाचा कप्तान जॉस बटलर याच्या नेतृत्वाखाली आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 मधील स्पर्धेत इंग्लंड संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आहे. सेमी फायनल मध्ये पोहोचणारी इंग्लंड संघ हि टीम पहिली आहे. इंग्लंडने अमेरिका संघावर 10 विकेट्स दमदार विजय मिळविला आहे.

USA VS ENG
USA VS ENG

 USA VS ENG : इंग्लंडची सेमी फायनल मध्ये एन्ट्री, यु एस ए वर 10 विकेट्स ने विजय 

USA VS ENG इंग्लंड संघाला विजयासाठी 116 धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडने हे आव्हान पार करताना इंग्लंडने 9.4 ओव्हर मध्ये पूर्ण केले यामध्ये इंग्लंड संघाचा कप्तान जॉस बट्लर यानी नाबाद 83 धावा केल्या. त्याने 83 धावा फक्त 38 बॉल मध्ये पूर्ण केल्या. त्यामध्ये 7 षटकार आणि 6 चौकार लगावले. तर त्याच्या साथीला फिलिप्स सॉल्ट ने 21 चेंडूमध्ये नाबाद 25 धावा केल्या.

या पराभवामुळे यूएसए संघ टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 मधून बाहेर झाला आहे. सर्वप्रथम इंग्लंडने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.(USA VS ENG) यु एस ए संघाने सुरुवात चांगली केली होती. परंतु शेवटचे 3 गडी शून्य धावांवर बाद झाले. आणि 18.5 ओव्हर मध्ये यूएसए संघ पूर्ण बाद झाला. 115 धावसंख्या असताना इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस जॉर्डन यानी 19 व्या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये 4 विकेट्स घेऊन हॅट्रिक घेतली.

युएसए संघाकडून नितीश कुमार यानी 30 धावा केल्या आणि त्याला चांगली साथ देत कोरी अँडरसन यानी 29 धावा केल्या त्याचबरोबर हार्मित सिंग याने 21 धावा केल्या.(USA VS ENG) तर कॅप्टन एरोन जोन्स याने 10 धावा केले स्टीव्हन टेलर याने 12 धावा केल्या एरोन जोन्स 8 आणि मिलिंद कुमार याने 4 धावा केल्या इंग्लंड कडून गोलंदाजी मध्ये ख्रिस जॉर्डन याला सर्वाधिक 4 विकेट्स मिळाल्या तर सॅम करण आणि आदिल रशीद यांना 2 – 2 विकेट मिळाले.

टोपले आणि लिविंग स्टोन यांना 1-1 विकेट मिळाली. सुपर 8  सामन्यांमधील इंग्लंडचा हा दुसरा विजय ठरला आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यात विंडीत संघावर विजय मिळविला होता. आणि दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 7 धावांनी पराभव झाला होता. आणि आता यूएसए संघावर विजयी मिळत इंग्लंडने सेमी फायनल मध्ये एन्ट्री केली आहे. इंग्लंड संघ हा पहिला संघ ठरला आहे सेमी फायनल मध्ये खेळण्यासाठी. 

यु एस एस संघ : आरोन जोन्स कॅप्टन, नितीश कुमार, स्टीवन टेलर, कोरी अँडरसन, मिलिंद कुमार, हर्मीत सिंग,अन्द्रीस गौस, व्हॅन शाल्क्विक, केंजीगे ,अली खान, सौरभ नेत्रवणकर, 

इंग्लंड संघ :फिलिप्स साल्ट,जोस बट्लर,ह्यारी ब्रूक, जॉनी बियरस्टो, सॅम करण, ख्रिस जॉर्डन, मोईन अली, लियाम लिविंगस्टोन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, टोपले  

यूएसए संघाने सुपर 8 सामन्यांमध्ये दमदार एन्ट्री केली होती. परंतु सुपर 8  सामन्यांमध्ये सलग 3 पराभव झाले. आणि यूएसए संघ आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधून बाहेर झाला आहे.

यूएसए संघाची फलंदाजी 

इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यूएसए संघाला प्रथम फलंदाजी मिळाल्या नंतर यु एस ए संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी स्टीवन टेलर आणि अन्द्रीस गौस ही जोडी मैदानात उतरली. ही जोडी संघासाठी चांगली सुरुवात करून देत असते. (USA VS ENG) परंतु या सामन्यामध्ये ही जोडी फेल ठरली. सलामिचे फलंदाज संघाला चांगली सुरुवात करून देण्यास अपयशी ठरले. यूएसए संघाची पहिली विकेट ही पहिल्या ओवरच्या शेवटच्या चेंडूवर पडली. संघाचे धावफलक 9 असताना इंग्लंड संघाची पहिली विकेट पडली. अन्द्रीस गौस हा टोपल्याच्या गोलंदाजीवर सॉल्टच्या हाती झेल देत बाद झाला.

त्याने 5 चेंडूमध्ये 8 धावा केल्या त्यामध्ये 1 षटकार देखील लगावला. अन्द्रीस गौस याने पहिल्या ओवर पासुनच आक्रमक पवित्रा उचलला होता. त्यानी पहिल्या ओव्हर मध्येच 1 षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले होते. परंतु इंग्लंडच्या भेदक गोलंदाजी पुढे तो अपयशी ठरला. आणि संघाचे धावफलक 9 असताना अन्द्रीस गौस बाद झाला. टेलर आणि अन्द्रीस गौस या दोघांमध्ये 6 चेंडू मध्ये 9 धावांची भागीदारी झाली होती.

अन्द्रीस गौस बाद झाल्यानंतर टेलरच्या साथीला नितेश कुमार हा आला. (USA VS ENG) या जोडीने चांगली खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणले संघाचे धावफलक 43 असताना टेलर देखील बाद झाला. सहाव्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर स्टीवन टेलर हा बाद झाला स्टीवन टेलर याला सॅम करण याने मोईन अलीच्या हाती झेल देत बात केले.

टेलर यानी 13 चेंडू मध्ये 12 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 2 चौकार लगावले होते. स्टीवन टेलर ने नितेश कुमार ला चांगली साथ दिली होती. या जोडीने 27 चेंडू मध्ये 34 धावांची भागीदारी केली होती. आणि संघाचे धावफलक हे 43 पर्यंत नेऊन पोहोचविले होते. परंतु सॅम करण याच्या भेदक गोलंदाजी पुढे टेलर टिकू शकला नाही. आणि तो स्वस्तात बाद झाला आता इंग्लंड संघाची स्थिती 43 धावा 2 गडी बाद अशी झाली होती.

(USA VS ENG) टेलर बाद झाल्यानंतर नितेश कुमारच्या साथीला यूएसए संघाचा कर्णधार आणि आक्रमक फलंदाज आरोन जोन्स हा आला. संघाचा स्फोटक फलंदाज आरोन जोन्स हा या सामन्यात जास्त काही करू शकला नाही. त्याने नितेश कुमारला साथ देण्याचा प्रयत्न केला परंतु तोही लवकर बाद झाला. संघाचे धावफलक 56 असताना तो बाद झाला.

आरोन जोन्स च्या रूपात युएसए संघाची तिसरी विकेट पडली. नवव्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर आरोन जोन्स बाद झाला. आता इंग्लंड संघाची स्थिती ही 56 धावा 3 गडी बाद अशी झाली होती.आरोन जोन्स याला आदिल रशीद यानी बोल्ड केले. युएसए संघाचा कप्तान आरोन जोन्स यानी 16 चेंडूमध्ये 10 धावा केल्या. त्यामध्ये 2 चौकार लगावले होते.आता नितीश कुमारच्या साथीला कोरी अँडरसन आला होता.

नितेश कुमार हा एकेरी झुंज देत होता त्याला कोणताही फलंदाज जास्त वेळ साथ देत नव्हता. आरोन जोन्स बाद झाल्या नंतर कोरी अँडरसन यानी नितेश कुमार याला चांगली साथ दिली. युएसए संघाने 10 ओव्हर मध्ये 60 धावांचा पल्ला गाठला नितेश कुमार हा आक्रमकपणे खेळत होता. परंतु त्यालाही आदिल रशीद याने बाद करत यूएसए संघाची नाजूक स्थिती केली.

आता संघाची स्थिती 67 धावा 4 गाडी बाद अशी झाली होती. अकराव्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर नितेश कुमार हा बाद झाला नितीश कुमार आणि कोरी अँडरसन या दोघांमध्ये १२ चेंडू मध्ये 11 धावांची भागीदारी झाली होती. नितेश कुमार बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मिलिंद कुमार हा आला.(USA VS ENG) या जोडीने सावकाशपणे खेळत धावफलक हलते ठेविले मिलिंद कुमार हा कोरी अंडरसनला स्ट्राइक देत जास्तीत जास्त चेंडू खेळवण्याचा प्रयत्न करत होता. संघाचे धावफलक ८८ असताना मिलिंद कुमार बाद झाला. चौदाव्या ओवरच्या शेवटच्या चेंडूवर यूएसए संघाची पाचवी विकेट पडली आणि संघर्ष तिची स्थिती 88 धावा पाचगडी बाद अशी नाजूक झाली.

मिलिंद कुमार आणि कोरी अँडरसन या दोघांमध्ये 20 चेंडू मध्ये 21 धावांची भागीदारी झाली होती मिलिंद कुमार बाद झाल्यानंतर कोरि अँडरसन च्या साथीला हर्मीत सिंग हा फलंदाजीसाठी आला हर्मीत सिंगने कोरी अंडरसनला चांगली साथ दिली. आणि तो देखील आक्रमकपणे खेळी करत होता.या जोडीने संघाला सावरले आणि संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला.संघाचे धावफलक 115 झाले होते. 2 ओव्हर बाकी होत्या आता युएसए संघ हा 140 पर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा होती.परंतु अठराव्या ओवरच्या शेवटच्या चेंडूवर हर्मीत हा बाद झाला.

संघाचे धावफलक 115 असताना युएसए संघाची सहावी विकेट पडली. हर्मीत सिंग याला सॅम करण यानी जॉर्डनच्या हाती झेल देत बाद केले, हर्मीत सिंग याने चांगली खेळी करत 17 चेंडू मध्ये 21धावा केल्या त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. आता हर्मीत बाद झाल्या नंतर कोरी अँडर्स याच्या साथीला शालकविक हा आला परंतु 19 व्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर कोरियांडरसन हा स्ट्राइक वर होता आणि गोलंदाजीसाठी जॉर्डन हा आला होता. 19 व्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर कोरी अंडरसॅन हा ब्रुक् च्या हाती झेल देत बात झाला. कोरियांडर सन यानी 28 चेंडू मध्ये 29 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 षटकार लगावला होता. यूएसए संघाची स्थिती 115 धावा 7 गडी बाद अशी झाली होती.कोरियांडर सन यानी संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते.

कोरियांडर बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी अली खान हा आला परंतु 19 व्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर अली खान हा बाद झाला.जॉर्डन याने त्याला बोल्ड आऊट केले. अली खान यानी 2 चेंडू मध्ये शून्य धाव केल्या होत्या.आणि संघाचे धावफलक 115 असताना यूएसए संघाची आठवी विकेट पडली. अली खान बाद झाल्या नंतर शालकवीच्या साथीला केजीघे हा फलंदाजीसाठी आला परंतु पुढच्या चेंडूवर केंजिगे देखील बाद झाला त्याला जॉर्डन यानी पायचीत बाद केले. आता युएसए संघाची स्थिती 115 धावा 9 गाडी बाद आणि 18.4 ओवर अशी झाली होती.

आता जॉर्डन हा हॅट्रिकवर होता आणि फलंदाजीसाठी युएसए संघाचा शेवटचा फलंदाज सौरभ नेत्रवळकर हा आला जॉर्डनने 2 चेंडू मध्ये 2 विकेट घेतल्या होत्या. आणि आता त्याचा हॅट्रिकचा बॉल होता.क्रिश जॉर्डन याने 19 व्या ओव्हरचा पाचवा चेंडू टाकला आणि स्ट्राइक वर नेत्रवळकर हा होता. (USA VS ENG) नेत्रवळकर याला बोल्ड आऊट करत क्रिस जॉर्डन यानी आपली हॅट्रिक पूर्ण केली.जॉर्डन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पहिल्यांदा हॅट्रिक घेतली आणि यू एसए संघ 115 धावांवरच आटोपला.संघाने 18.5 ओवर मध्ये 115 धावा केल्या आणि त्या बदल्यात 10 गडी गमावले. यू एस ए संघाने 115 धावांवर 5 घडी गमावले यूएसए संघाने पावर प्ले मध्ये 48 धावा काढल्या होत्या.

इंग्लंड संघाची फलंदाजी : 

116 धावांचे आव्हान दिल्यानंतर इंग्लंड संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी फिलिप्स आणि इंग्लंड संघाचा घातक फलंदाज जॉस बटलर ही जोडी मैदानात उतरली. 116 धावांचे आव्हान हे खूप छोटे होते परंतु T-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये झालेल्या सामन्यांमध्ये 100 धावांचा पाठलाग करताना देखील चांगले संघ पराभूत झालेले आहेत.(USA VS ENG) त्यामुळे 116 धावांचे आव्हान हे देखील चांगले आव्हान होते. परंतु इंग्लंड संघाच्या सलामीच्या जोडीने सुरुवातीपासूनच आक्रमकपणे खेळी करण्यास सुरुवात केली होती.

हे देखील वाचा : IND Vs AFG Highlights : भारतीय संघाची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल, अफगाणिस्तान संघाचा 47 धावांनी केला पराभव

इंग्लंड संघाच्या सलामीच्या जोडीने यू एस ए संघाच्या प्रत्येक गोलंदाजावर अटॅक करत जोरदार टोले लगावले. युएसए संघाचा भेदक गोलंदाज सौरभ नेत्रवळकर याला देखील इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी चांगल्या धावा काढल्या. फिलिप्स सॉल्ट आणि जॉस बटलर या जोडीने पावर प्ले मध्ये 60 धावा ठोकल्या. त्याच वेळेस यूएसए संघाचा हा सामना हातातून गेल्याचे दिसत होते फिलिप्स सॉल्ट हा एका बाजूने संयमी खेळी करत होता. तर दुसऱ्या बाजूने इंग्लंड संघाचा कप्तान जॉस बटलर हा धुवाधार खेळी करत प्रत्येक चेंडूवर जोरदार टोला लगावत होता. या जोडीने कुठल्याही प्रकारची चुकी न करत धुवाधार फलंदाजी केली आणि युएसए संघाला सामन्यात परतण्याची कोणतीही संधी दिली नाही.

यू एस ए संघ गोलंदाजी मध्ये बदल करून इंग्लंड संघाची सलामीची जोडी फोडण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्यांना अपयश आले. आव्हान कमी असल्या कारणाने यू एस ए संघाला इंग्लंड संघाची विकेट घेणे गरजेचे होते. परंतु या जोडीने कोणतीही चूक न करत आपली विकेट गमावली नाही. (USA VS ENG) जॉस बटलर यानी 32 चेंडू मध्येच आपली फिफ्टी पूर्ण केली. त्यानंतर या जोडीने युएसए संघाचा गोलंदाज हरमित सिंग याला एका ओव्हर मध्ये 32 धावा कुटल्या. यु एस ए संघाला इंग्लंड संघाची विकेट मिळवणे कठीण झाले होते. त्याचबरोबर इंग्लंड संघाची जोडी ही आक्रमकपणे खेळी करत होती.

या जोडीने कोणतीही चूक न करत दहाव्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर हे आव्हान पूर्ण केले. इंग्लंड संघाचा कर्णधार बटलर यानी शालकविक च्या ओवर मध्ये चौथ्या चेंडूवर चौकार मारत हे आव्हान पूर्ण केले. आणि हा सामना 10 विकेट्स ने जिंकला हा सामना जिंकत इंग्लंड संघ हा T-20 वर्ल्ड कप 2024 मधील सेमी फायनल सामन्यांसाठी पात्र झाला. सेमी फायनल मध्ये जागा मिळवणारा इंग्लंड संघ हा पहिला संघ ठरला आहे. त्याचबरोबर सुपर 8  मधील हा सलग तिसरा पराभव आहे. या पराभवास सोबतच यू एस ए T-20 World Cup 2024 सामन्यांमधून बाहेर झाला आहे.

हे देखील वाचा : SA VS ENG Highlights : दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड वर 7 धावांनी विजय, ब्रूक ची अर्धशतकी खेळी व्यर्थ

सामन्याचा मानकरी

इंग्लंड संघाचा स्पिनर गोलंदाज आदिल रशिद हा या सामन्याचा मानकरी ठरला.आदिल रशीद यानी 4 ओव्हर टाकत 13 धावा दिल्या. त्यामध्ये युएसए संघाचे महत्त्वाचे फलंदाज बाद केले. (USA VS ENG) आदिल रशीद यानी यूएसए संघाचा आक्रमक फलंदाज नितेश कुमार याला 30 धावांवर आउट केले. आणि यू एस ए संघाचा कप्तान आरोन जोन्स याला देखील 10 धावांवर बोल्ड आउट केले. आदिल रशीद यानी 4 ओव्हर मध्ये 3.2 च्या सरासरीने 13 धावा देत 2 गडी बात केले होते.

Spread the love