Site icon Get In Marathi

Who Win Today IPL ?| कोण जिंकणार आज IPL ?

Who Win Today Ipl

Who Win Today IPL ?| कोण जिंकणार आज IPL ?

CSK VS RCB

Who Win Today IPL ?| कोण जिंकणार आज IPL ? :- आज पासून सुरु होत आहे IPL चा महासंग्राम आज भिडणार आहे दोन संघ. एक संघ आहे 2023 चा IPL विजेता आणि दुसरा संघ आहे प्ले ऑफ मधून माघे परतलेला.आज आपण  बघनार  कोणता संघ  कोणत्या संघावर सरस ठरेल

 CSK Vs RCB :- 22 मार्च पासून सुरु होत आहे इंडियन प्रीमियर लीग.17 व्या हंगामातील IPL हि खूप रोमांचक होणार आहे. एम.एस.धोनी. ची हि अंतिम IPL असून शेवटची IPL जिंकून निवृत्त होण्याचा धोनीचे ध्येय असेल. तसेच आरसीबी संघाचा कप्तान बदललेला असून 16 वर्षांचा इतिहास बदलण्याचा आरसीबीचा प्रयत्न असेल.

सर्व खेळाडू सराव करून आयपीएलच्या युद्धासाठी सज्ज आहे यावर्षी आपल्याला आयपीएल संघातील प्रत्येक संघामध्ये खूप मोठे बदल दिसले आहे. प्रत्येक संघामध्ये आपल्याला नवीन चेहरे बघावयास भेटणार आहेत काही खेळाडू दुखापतीमुळे संघातून माघारी परतले आहे तर काही खेळाडू दुखापतीतून सावरून आपल्या संघासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या सामन्यात आपल्याला चेन्नई विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर अशी लढत बघावयास भेटणार आहे.

Who Win Today Ipl ?| कोण जिंकणार आज Ipl:- चेन्नईचा संघ ऋतुराज गायकवाड च्या  नेतृत्वाखाली आपले प्रदर्शन करेल तर रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा कप्तान डुप्लेसीस आपल्या संघाचे नेतृत्व करेल मागील वर्षी विजेते असलेले टीम चेन्नई सुपर किंग आपल्या काही नवीन खेळाडू सोबत पुन्हा एकदा आय पी एल चषक जिंकण्यासाठी सज्ज आहे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी झालेल्या अंतिम लढतीत चेन्नई सुपर किंग ने गुजरात ला पराभूत करून आयपीएलचे चषक आपल्या नावावर केले होते आणि तसेच पाचव्यांदा आयपीएल चषक जिंकून चेन्नई ने मुंबई संघाची बरोबरी केली आहे मुंबई संघाने आतापर्यंत पाच चषक जिंकलेले आहे. ते आता रेकॉर्डची बरोबरी करत चेन्नईने 2023 मध्ये पाचव्यांदा चषक जिंकले आणि मुंबई संघाचे बरोबरी केली आहे.

    यंदा चेन्नईचे लक्ष असेल की सहाव्यांदा  चषक जिंकून आयपीएलच्या स्पर्धेत सर्वाधिक आयपीएल जिंकणारा संघ होणे. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा कप्तान असलेला फाफ डुप्लेसीस आपल्या नेतृत्वाखाली संघाला पहिल्यांदा आयपीएल मध्ये विजेते बनवणे आणि आतापर्यंत रॉयल चॅलेंजर बेंगलोर ने एकदाही आयपीएल चषक आपल्या नावावर केलेला नाही.Who Win Today IPL ?| कोण जिंकणार आज IPL जे काम विराट कोहली कप्तान असताना करू शकला नाही तेच डुप्लेसेसला करून दाखवायचे आहे प्रत्येक सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोर या संघाची कामगिरी सर्वोत्कृष्ट असते. आणि आयपीएल मध्ये एक सर्वात घातक संघ म्हणून  रॉयल चॅलेंजर बेंगलोर ची ओळख आहे हा संघ आयपीएल मध्ये सर्वाधिक बनवण्यासाठी ओळखला जातो तसेच खूप सारे रेकॉर्ड या संघाकडे आहे.

या संघाच्या नावावर सर्वाधिक षटकार आणि एकाच सामन्यात सर्वाधिक धावा बनविण्याचा रेकॉर्ड आहे. विराट कोहलीच्या कप्तानी खाली हा संघ एकदाही चॅम्पियन बनला नाही.चेन्नई आणि बेंगलोर मध्ये पहिला सामना हा चेन्नईमध्ये होणार आहे घरच्या मैदानात हा सामना होणार असल्याने चेन्नई आपला दबदबा  ठेवत जिंकण्याचा प्रयत्न करेल.ऋतुराज गायकवाड सोबत सलामीला फलंदाजी करणारा डेवोन कोनवे पहिले काही सामने खेळू शकणार नाही त्यामुळे ऋतुराज गायकवाड सोबत रचीन रवींद्र सलामिला खेळणार आहे.यावर्षी संघात नवीन खेळाडू समीर रिजवी याला घेतले आहे समीर रिजवी याला तिसऱ्या क्रमांकासाठी खेळवण्यात येईल. संघाकडे सुरेश रैनाच्या नेतृत्वानंतर एक तुफान फलंदाज अजूनही भेटलेला नाही.

मधल्या फळीमध्ये खेळणारे शिवम दुबे,मोईन आली आणि रवींद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडू आहेत व हे तिघे केव्हाही सामना फिरवू शकतात.संघाकडे एक प्रश्न उभा राहतो की तीन नंबरला कुणाला खेळवायचे संघात नवीन स्थान मिळालेला समीर रिजवी की अजिंक्य रहाणे. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी कोणत्या क्रमांकावर खेळेन हा एक प्रश्न उभा राहतो. संघाकडे दीपक चहर हा वेगवान गोलंदाज आणि संघामध्ये पुन्हा एकदा स्थान मिळालेला शार्दुल ठाकूर असे दोन वेगवान गोलंदाज आहे त्याच बरोबर हे दोघेही वेळ आल्यास फलंदाजी ही चांगल्या प्रकारची करू शकतात 

चेन्नई सुपर किंग संघ :- 

आरसीबी संगत स्टार खेळाडूंची कमी नाही आरसीबी मध्ये विराट कोहली,फाफ दुप्लेसीस,ग्लेन मॅक्सवेल,कॅमेरा ग्रीन मोहम्मद सिराज असे धडाकेबाज खेळाडू आहेत तसेच आरसीबी संघाचा नवीन कप्तान  डुप्लेसेस हा देखील एक घातक फलंदाज आहे आरसीबी संघाकडे 16 वर्षाचा काळा इतिहास बदलण्याचा संधी आहे आता 17 व्या सीजन साठी हा संघ पूर्णपणे प्रयत्न करेन चषक आपल्या नावावर करणे साठी.

कोण कोणावर सरस :- पहिल्याच सीजनमध्ये हे दोन्ही संघ 28 एप्रिल 2008 रोजी भिजले होते त्यावेळेस चेन्नई ने सीएसके वर विजय मिळविला होता आत्तापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 31 सामने खेळवण्यात आले आहेत. या 31 सामन्यात सीएसके वरचढ ठरलेली  आहे. 31 सामन्यांपैकी २० सामने हे सीएसके ने जिंकलेले आहे तर आरसीबी ने 10 सामन्यात विजय मिळविला आहे.Who Win Today IPL ?| कोण जिंकणार आज IPL आणि एक सामना हा अनिर्णयित राहिला होता अशा प्रकारे असे दिसून येते की सीएसकेने आपले वर्चस्व टिकून ठेवले आहे.

सोळाव्या हंगामात या दोन्ही संघांमध्ये एकच सामना झाला होता. आणि हा सामना 17 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता या सामन्यात सीएसके ने आरसीबी च्या समोर विजयासाठी मोठे आव्हान उभे केले होते. आरसीबी ला विजयासाठी चेन्नैने 226 धावांचं आव्हान दिले होते या सामन्यात आरसीबीने कडवी टक्कर देत शेवटपर्यंत सामन्यात आपला जम ठेवला होता परंतु अखेरीस आरसीबी ला 8  धावांनी पराभव पत्करावा लागलेला. 

रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघ :-

 मैदानाचे रेकॉर्ड :- एम ए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे चेन्नई घरच्या मैदानावर खेळत असल्याने चेन्नई साठी ही एक फायद्याची बाब ठरेल या मैदानावर आतापर्यंत 76 सामने खेळले गेले आहेत. 76 सामन्यांपैकी 46 सामने हे प्रथम फलंदाजी करणारे संघाने जिंकले आहे तर 30  सामने हे क्षेत्ररक्षण करणारे संघाने जिंकले आहे. Who Win Today IPL ?| कोण जिंकणार आज IPL  त्यावरून असे दिसून येते की 60 टक्के सामने हे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहे या मैदानावर 170 ते 180 धावांचा पाठलाग करणे कठीण आहे .

आरसीबी कडे असणारे भेदक गोलंदाज यामुळे चेन्नईला खडतर आव्हान मिळू शकते आरसीबी कडे मोहम्मद सीराज,अल्झारी जोसेफ आणि आकाशदीप यांच्या भेदक गोलंदाजीचा मारा आहे तर फिरकी मध्ये करण शर्मा हा देखील एक तरुण गोलंदाज संघासाठी फायद्याचा ठरू शकतो मोहम्मद सिराज याचे आयपीएल च्या कारकिर्दीत चांगले रेकॉर्ड आहे.

आरसीबी हा संघ मोठी धावसंख्या उभारू शकतो आतापर्यंत आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा आरसीबी संघाने केले आहे. 263 धावांचे मोठे धावफलक हे आरसीबी संघाने केले आहे आतापर्यंत हे रेकॉर्ड कोणत्या संघाने मोडले नाही.आरसीबी कडे मधल्या फळीत खेळणारे फलंदाज ग्लेन मॅक्सवेल,कॅमेरामन ग्रीन,दिनेश कार्तिक ही एक मजबूत भिंत आहे वर्ल्ड कप मध्ये   200 धावा करणारा ग्लेन मॅक्सवेल हा कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता ठेवतो त्याचप्रमाणे संघात नवीन स्थान मिळालेला कॅमेरा ग्रीन हा एक आक्रमक फलंदाज आहे. 

Who Win Today IPL ?| कोण जिंकणार आज IPL काही काळापूर्वी आरसीबी संघात असणारे ख्रिस गेल आणि ए बी डी विलर्स या दोघांच्या फलंदाज वर पूर्ण संघ उच्च स्कोर गाठीत होता या दोघांच्या जोडीने समोरच्या संघाला घाम फुटत असेल, आता हे दोघेही फलंदाज संघात समाविष्ट नसल्याने आता त्यांच्या अनुपस्थितीत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचे काम हे आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहली, कॅमेरामन ग्रीन यांच्या खांद्यावर ही जबाबदारी असेल.

आरसीबी संघाने आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा धावांचा पल्ला गाठलेला आहे आणि या संघाने सर्वाधिक जास्त वेळा  200 धावांचे आव्हान देखील पार केलेली आहे आतापर्यंत आयपीएल मध्ये सर्वाधिक जास्त धावा देखील ही आरसीबी संघाने केल्या आहेत. 

आयपीएलच्या 17 व्या सीजन ला सुरुवात झालेली आहे. क्रिकेटचा महापुर्व 22 मार्चपासून सुरू होत आहे ऋतुराज गायकवाड हा चेन्नई संघाचे नेतृत्व करेल तर फाफ दुप्लेसीस आरसीबी संघाचे नेतृत्व करेल. आरसीबी आपला प्रथम आयपीएल चषक जिंकण्याच्या तयारीने मैदानात उतरेल तर चेन्नई आयपीएल मध्ये सर्वात जास्त आयपीएल चषक जिंकण्याचे रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी मैदानात उतरेल.

हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम मध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सामना रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे. हा सामना टीव्हीवर आणि मोबाईलवर देखील बघू शकतात टीव्हीवर स्पोर्ट नेटवर्कच्या चैनल वर हा सामना बघता येईल तर मोबाईलवर बघण्यासाठी जिओचे जिओ सिनेमा ऑप इन्स्टॉल करावे लागेल आणि फ्री मध्ये IPL बघू शकता. 

निष्कर्ष :-

           दोन्ही संघ नवीन खेळाडूंच्या समावेशानंतर खूप मजबूत स्थितीत आहे. दोन्ही संघांकडे भेदक गोलंदाजी तसेच तुफानी फटकेबाजी करणारे फलंदाज उपलब्ध आहेत परंतु आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार चेन्नई सुपर किंग ही आरसीबी वर एक तर्फे सरस ठरलेली आहे.त्यामुळे चेन्नई या सामन्यात वरचढ ठरू शकते. 2024 च्या आयपीएल संघामध्ये फेरबदलामुळे कोणताही संघ समोरच्या संघावर विजय मिळवू शकतो.

हे वाचा !

Spread the love
Exit mobile version