WI vs ENG : फील सॉल्ट ची तुफान फटकेबाजी, या चुकीमुळे वेस्टइंडीज संघाचा सुपर 8 मध्ये झाला पराभव
WI vs ENG : T- 20 वर्ल्ड कप मधील 42 वा सामना हा वेस्टइंडीज आणि इंग्लंड या 2 संघा दरम्यान झाला. सुपर 8 मधील या सामण्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून सहज विजय मिळविला आहे. हा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सेमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम वर खेळविण्यात आला होता.(WI vs ENG) या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 15 चेंडू राखत आणि 2 गडी गमावत सहजपणे विजय मिळविला आहे.
WI vs ENG हा सामना वेस्टइंडीज साठी घरच्या मैदानावर असताना देखील वेस्टइंडीज हा सामना हरला आहे. T20 वर्ल्ड कप 2024 चा दुसरा टप्पा सुरू झालेला असून सेंट लुसिया येथे झालेल्या सामन्यात वेस्टइंडीज आणि इंग्लंड हे 2 संघ आमने सामने आले होते.
या सामन्यात वेस्टइंडीज ने इंग्लंड समोर 181 धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडने हे आव्हान 15 चेंडू राखून आणि 2 गडी गमावत सहजपणे पार केले या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या विजयाचा हिरो फील सॉल्ट हा ठरला त्याने वेस्टइंडीज गोलंदाजांची चांगली धुलाई करत फक्त 47 चेंडू मध्ये 87 धावांची तुफानी फटकेबाजी केली.(WI vs ENG) त्याच्याबरोबर जॉनी बेअरस्टो यानी देखील या सामन्यात चांगली फलंदाजी केली त्याने 26 चेंडू मध्ये नाबाद ते 40 धावा केल्या फील सॉल्ट याने नाबाद 87 धावा केल्या त्यामध्ये 7 चौकार आणि 5 सीक्स लगावले.
तर जॉनी बेस्ट बेअरस्टो याने नाबाद 48 धावा करत 5 फोर आणि 2 सिक्स मारले वेस्टइंडीज संघासाठी हा सामना घरच्या मैदानावर असून संघासाठी तेथील परिस्थिती ही अनुकूल होती.(WI vs ENG) इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला वेस्टइंडीज संघाकडून चांगली सुरुवात झाली होती. परंतु ब्रांडन किंग हा 23 धावांवर असताना रिटायर्ड हर्त झाला त्यानंतर वेस्टइंडीज च्या बाकी खेळाडूंनी चांगले योगदान देत संघाला 180 धावा पर्यंत नेऊन पोहोचविले यामध्ये चार्ल्स याने 38, पुरन 36, पॉवेल 36 आणि रुदरफोर्ड यानी 28 धावांचे योगदान दिले.
इंग्लंड संघाची आक्रमक सुरुवात
181 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. सलामीला आलेल्या फील सॉल्ट आणि जॉस बटलर या दोघांनी संघासाठी जोरदार सुरुवात करून दिली परंतु जॉस बटलर हा अडखळत खेळत होता. (WI vs ENG) अखेर तो रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर बाद झाला त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मोइन अली हा आला परंतु मोईन अली देखील जास्त वेळ मैदानात टिकू शकला नाही.
मोईन अली याने 10 चेंडूमध्ये 13 धावा केल्या आणि तो देखील बाद झाला. आता इंग्लंड संघाची स्थिती 2 गडी बाद अशी झाली होती त्यानंतर मैदानामध्ये जॉनीबेसट्रो आला आणि त्याने मैदानामध्ये येताच जोरदार फलंदाजी करण्यास सुरुवात केली त्याच्याबरोबर सलामीचा फलंदाज फील सॉल्ट यानी देखील आक्रमक पवित्र उचलला आणि या दोघांनी तुफानी फलंदाजी करत इंग्लंडला आरामात विजय मिळवून दिला.
वेस्टइंडीज च्या या चुकीमुळे झाला पराभव
(WI vs ENG) वेस्टइंडीज संघ आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यांमध्ये विजय मिळवीत सुपर 8 मध्ये एन्ट्री केली होती. आतापर्यंतच्या झालेल्या चारही सामनात वेस्टइंडीज संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला होता. परंतु या सामन्यांमध्ये वेस्टइंडीज च्या पराभवाचे कारण हे डॉट बॉल ठरले. वेस्टइंडीज संघाकडून 20 षटकांमध्ये 51 चेंडू हे डॉट खेळण्यात आले म्हणजे जवळपास 9 ओवर या वेस्टइंडीज संघाने एकही धाव न करता खेळल्या तेच या पराभवाचे मुख्य कारण ठरले. वेस्टइंडीज संघाकडून जास्त धावा या चेंडू सीमा रेखा पार करून मिळाल्या आहे.
वेस्टइंडीज संघाने 1 आणि 2 धाव असे कमी धावा काढल्या आणि जास्त धावा या चेंडू सीमा रेखा पार कडून काढल्या. वेस्टइंडीज संघाच्या फलंदाजांनी 1आणि 2 धावा काढण्याचा प्रयत्न केला असता तर संघाच्या धावफलकावरती अजून भर पडली असती. वेस्टइंडीज संघाला 200 धावांपेक्षा जास्त आव्हान इंग्लंड संघाला देता आले असते. तर कदाचित वेस्टइंडीज संघ हा सामना जिंकला असता. वेस्टइंडीज संघाला पुढचा सुपर 8 मधील सामना जिंकणे आवश्यक आहे. सुपर 8 मधील स्थान मिळवण्यासाठी इंग्लंड संघाने चांगलीच कसरत केली होती. परंतु सुपर 8 सामन्यांमध्ये इंग्लंड संघाने चांगले कमब्याक केले आहे.
वेस्टइंडीज संघाची फलंदाजी
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्टइंडीज संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी ब्रांडन किंग आणि चारलस् ही जोडी मैदानात आली. या जोडीने संघाला चांगली सुरुवात देखील करून दिली. परंतु संघाचे धावफलक 40 असताना ब्रांडन किंग हा रिटायर्ड हर्ट झाला. ब्रांडन किंग यानी 13 चेंडूमध्ये 23 धावा केल्या होत्या त्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. (WI vs ENG) चारलस् च्या साथीला पुरण हा फलंदाजीसाठी आला या जोडीने संयमाने खेळी करत संघाचे धावफलक हलते ठेवले. बारावे ओवरच्या पहिल्या चेंडूवर चार्ल्स हा बाद झाला. चार्ल्स याने 34 चेंडू मध्ये 38 धावा केल्या त्यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकार लगावला होता.
चार्ल्स याला मोहीन अली यानी ब्रूकच्या हाती झेल देत बाद केले. आता फलंदाजीसाठी वेस्टइंडीज संघाचा कप्तान रोमन हा आला रोमन आणि पुरण या जोडीने चांगली खेळी करत संघाचे धावफलक 137 पर्यंत नेले.(WI vs ENG) पंधराव्या ओवरच्या सहाव्या चेंडूवर रोमन हा बाद झाला त्याला लिविंग स्टोन यानी मार्कक्रम च्या हाती झेल देत बाद केले. रोमन याने 17 चेंडूमध्ये 36 धावा केल्या होत्या त्यामध्ये 5 षटकार लगावले रोमन बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी रसेल हा आला परंतु संघाच्या धावफलकामध्ये 4 धावांची भर पडली आणि पुरण हा देखील बाद झाला.
पुरण यानी 32 चेंडू मध्ये 36 धावा केल्या त्यामध्ये 4 चौकार लगावले. आता संघाची स्थिती 141 धावा 3 गडी बाद अशी झाली होती. पुरण बाद झाल्या नंतर फलंदाजीसाठी रसेल हा आला परंतु रसेल देखील चेंडू सीमा रेखा पार पाठवण्याच्या प्रयत्नात बाद झाला. रसेल यानी 2 चेंडू मध्ये 1 धाव केली त्याला आदिल रशीद यानी सॉल्ट च्या हाती झेल देत बाद केले आता वेस्टइंडीज संघाची स्थिती 143 धावात 4 गाडी बाद आणि 17 ओवर अशी झाली होती. त्यानंतर फलंदाजीसाठी रोमारिओ हा आला. रोमारिओ आणि शेरफेन या जोडीने संयमाने खेळी केली.
आणि या दोघांनी 19 चेंडू मध्ये 37 धावांची भागीदारी केली. शेरफेन यानी 15 चेंडू मध्ये 28 धावा केल्या. त्या मध्ये 1 चौकार आणि 2 षटकार लगावले. (WI vs ENG) तर रोमारिओ यानी 7 चेंडू मध्ये 5 धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार लगावला वेस्टइंडीज ने 20 ओव्हर मध्ये 4 गडी गमावत 180 धावा केल्या. इंग्लंड संघाकडून जोफ्रा आर्चर यानी 1 विकेट घेतली. आदिल रशीद मोईन अली, लिविंग स्टोन यानी देखील 1,1विकेट घेतली. इंग्लंड संघाच्या गोलंदाजानी अचूक गोलंदाजी करत वेस्टइंडीज संघाच्या फलंदाजांना रोखून ठेविले.
हे देखील वाचा : Afg Vs Png, Super 8: अफगाणिस्तानचा विजय, सुपर 8 मध्ये दणक्यात एन्ट्री
इंग्लंड संघाची जोरदार सुरुवात
181 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेली इंग्लंडची सलामीची जोडी फील सॉल्ट आणि जॉस बटलर या जोडीने तुफान अशी फटकेबाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. या जोडीने पावर प्ले मध्ये 58 धावा चोपल्या. संघाचे धावफलक 67 असताना इंग्लंडची पहिली विकेट पडली आठव्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर जॉस बटलर हा बाद झाला. (WI vs ENG) बटलर यानी 22 चेंडूमध्ये 25 धावा केले त्यामध्ये 2 चौकार लगावले जॉस बटलर बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मोईन अली हा आला मोईन देखील जोरदार खेळी करत होता परंतु तो जास्त वेळ मैदानात टिकला नाही.
या दोघांमध्ये पंधरा चेंडू मध्ये 17 धावांची भागीदारी झाली आणि संघाचे धावफलक 84 असताना इंग्लंडची दुसरी विकेट पडली अकराव्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर मोईन अली बाद झाला. त्याला रसेल याने बाद केले मोईन अली याने 10 चेंडू मध्ये 13 धावा केल्या. त्यामध्ये 2 चौकार लगावले आता फलंदाजीसाठी इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जॉनी हा आला.या जोडीने देखील जोरदार फलंदाजी करत वेस्टइंडीज गोलंदाजांची धुलाई केली. इंग्लंडच्या फलंदाजांनी कोणतीही चूक न करता आक्रमक फलंदाजी केली या जोडीने 44 चेंडू मध्ये 97 धावांची भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
अठरा ओवर आणि फक्त 2 गडी गमावत इंग्लंड संघाने सहजपणे हा सामना जिंकला. या सामन्यात पराभव झाल्याने वेस्ट इंडिज चा विजय रथ थांबला. आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यात विजय मिळाला होता. सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिज संघाला पराभव पत्करावा लागला. वेस्टइंडीज संघा कडून झालेली चुकी ही या सामन्याच्या पराभवाचे मुख्य कारण आहे. (WI vs ENG) दुसरीकडे इंग्लंड संघासाठी हा मोठा विजय ठरला. कारण हा सामना वेस्टइंडीज मध्ये असून वेस्टइंडीज च्या संघासाठी हे घरचे मैदान होते. यापूर्वी झालेल्या घरच्या मैदानामध्ये वेस्ट इंडिज संघाने एकेरी विजय मिळविला होता. या वर्ल्डकप मध्ये हे 2 संघ पहिल्यांदाच भिडले होते.गोलंदाजी मध्ये वेस्टइंडीज संघाकडून आंद्रे रसेल आणि रॉस्टन चेस यांना 1,1 विकेट मिळाली.
हे देखील वाचा : USA VS SA : अटीतटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यूएसए संघावर 18 धावांनी विजय
सामन्याचा मानकरी
इंग्लंड संघाचा सलामीचा फलंदाज फिल सॉल्ट हा या सामण्याचा मानकरी ठरला. त्यानी 47 चेंडूमध्ये 87 धावा केल्या त्यामध्ये 5 षटकार आणि 7 चौकार लगावले. फील सॉल्ट यानी नाबाद 87 धावा करत संघाला विजय मिळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फील सॉल्ट आणि जॉनी बेअरस्टो यानी देखील चांगली साथ दिली.