Wings EV Robin : हि कार एम जी कॉमेट ला धूळ चारणार, जाणून घ्या कींमत

Wings EV Robin : हि कार एम जी कॉमेट ला धूळ चारणार, जाणून घ्या कींमत

Wings EV Robin : सध्या देशांमध्ये इलेक्ट्रिकल कारचा खूपच बोलबाला आहे. अनेक कंपनी आपल्या इलेक्ट्रिकल कार मार्केटमध्ये उतरते आहे. (Wings EV Robin) कमी रेंज पासून तर जास्त रेंज असणाऱ्या अनेक इलेक्ट्रिकल कार सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सध्या या सर्व इलेक्ट्रिकल कार कंपनीमध्ये स्पर्धा चालू आहे.

Wings EV Robin
Wings EV Robin

Wings EV Robin : प्रत्येक कंपनी ही जास्तीत जास्त रेंज देणारी कार मार्केटमध्ये उतरविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि कमी किंमत मध्ये ही कार सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या इलेक्ट्रिकल कंपन्या करत आहेत. (Wings EV Robin) परंतु जास्त रेंज देणाऱ्या कार यांची किंमत ही जास्त असल्याने ती सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाही.

त्यालाच पर्याय म्हणून कंपनीने कमी रेंज आणि कमी किंमत मध्ये इलेक्ट्रिकल कार देखील मार्केटमध्ये उतरविल्या आहे. ज्या किंमत मध्ये मोटरसायकल येते त्याच किंमत मध्ये आता कंपनीने फोर व्हीलर इलेक्ट्रिकल कार मार्केटमध्ये उतरवीली आहे. काही दिवसांपूर्वीच एमजी हेक्टर कंपनीची एमजी कॉमेट ईव्ही ही कार मार्केटमध्ये आली होती. या कारला प्रचंड असा प्रतिसाद जनतेकडून लाभला आहे. आणि अजून देखील या कारची प्रचंड मागणी मार्केटमध्ये आहे. (Wings EV Robin) हि कार कमी किंमत मध्ये चांगली रेंज देते आणि त्याचबरोबर लक्झिरेस फीचर्स देखील या कारमध्ये उपलब्ध आहेत.

या कारला टक्कर देणारी मार्केटमध्ये टाटा कंपनीची पंच ही कार उपलब्ध आहे. परंतु या कारच्या स्पर्धेमध्ये आता अजून एक कारची भर पडली आहे. विंग्स कंपनीची (Wings EV Robin) ही कार मार्केटमध्ये आली आहे. ही कार 2 सीटर असून या कारची किंमत ही अगदी कमी आहे. सध्या देशात वाढलेल्या ट्राफिकमुळे आता मोठ्या कार चालविणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर मोठ्या कार चा मेंटेनन्स खर्च देखील जास्त असतो आणि त्यांची किंमत ही देखील जास्त असते. पेट्रोल डिझेल चे दर गगनाला भिडले असून या इंधनावर चालणाऱ्या कार आता परवडनाऱ्या नाहीये.

त्यामुळे खुप सार्‍या कंपन्या आता इलेक्ट्रिकल कार वर भर देत आहे. त्याचबरोबर सरकार देखील इलेक्ट्रिकल कार कंपनींना प्रोत्साहन देत आहे. पेट्रोल डिझेलच्या कार मुळे खूप सारे प्रदूषण होते. त्याचबरोबर या कारचा नियंत्रण खर्च हा देखील जास्त असतो. त्यामुळे ग्राहक देखील आता इलेक्ट्रिकल कार घेण्याकडे वळले आहेत. Wings EV Robin या कारची प्री बुकिंग सध्या चालू झालेली आहे. या कारला बुक करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन कार बुक करता येईल.

Wings EV Robin
Wings EV Robin

Wings EV Robin Engine या कारचे इंजिन

ही कार इलेक्ट्रिकल असल्याने या कार मध्ये कुठलेही इंजिन वापरण्यात आलेले नाही. या कारमध्ये मोटर वापरलेली आहे आणि लिथियम फॉस्फरस बॅटरी वापरण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिकल सप्लाय द्वारे बॅटरी चार्ज होते आणि त्या बॅटरीच्या पावर चा वापर करून मोटर ही पावर तयार करते आणि त्याद्वारे चाकांना गती मिळते. ही मोटर जास्तीत जास्त 282nm पर्यंत टोर्क जनरेट करू शकते आणि पावर 6 kw पर्यंत जनरेट करू शकते.

या मध्ये वापरण्यात आलेली मोटर ही 2 BLDC हब मोटर आहे. त्याचबरोबर या कारमध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमचा देखील वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे कार चे मायलेज हे वाढते आणि ट्रान्समिशन मध्ये सिंगल स्पीड ऑटोमॅटिक गेअर बॉक्स चा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये आपल्याला एकच मोड हा दिलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचे गिअर देण्यात आलेले नाही. 

Wings EV Robin Mileage कारचे मायलेज 

ही कार रहदारीच्या ठिकाणी जास्त फायद्याची ठरू शकते. अगदी कमी जागेत देखील हि कार चालू शकते. ही कार छोटी असून वजनाने कमी असल्यामुळे या कारची रेंज ही जास्त आहे. कंपनीने दिलेल्या नुसार या कारची रेंज ही 90 km / चार्ज आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 90 km चालू शकते असा कंपनीचा दावा आहे. Wings EV Robin या कारचा टॉप स्पीड हा 64kmph इतका आहे. तर या कारला 0 स्पीड पासून 40 kmph पर्यंत स्पीड मिळविण्यासाठी फक्त 5 सेकंद लागतात. अगदी कमी वेळेत कार चांगला स्पीड घेऊ शकते. 

Wings EV Robin Battery, Charging बॅटरी आणि चार्जिंग 

छोट्या आकाराच्या या कार मध्ये कंपनीने 5.6 किलो वॅट ची बॅटरी दिलेली आहे. ही बॅटरी लिथियम फेरस फॉस्फेट बॅटरी पॅक आहे. या बॅटरीला चार्जिंग करण्यासाठी कंपनीकडून एक पॉईंट 8 kw चे चार्जर मिळते आणि या कारला चार्जिंग करण्यासाठी 0% पासून 100% पर्यंत पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. 30 मिनिट जर बॅटरी चार्ज केली तर ही कार 10 किलोमीटर पर्यंत चालू शकते. तसेच या कारला चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पॉईंट हा 230v/16A  चे सॉकेट लागते. आपले घरगुती इलेक्ट्रिकल सॉकेट देखील बॅटरी चार्जिंग करण्यासाठी उपयोगात येऊ शकते.

Wings EV Robin Size कारची साईज 

विंग्स ईवी रॉबिन ही कार आकाराने छोटी आहे या कारमध्ये 2 लोकांची सीटिंग कॅपॅसिटी आहे. यामध्ये एक जण पुढे आणि एक जण मागे बसू शकतो. तसेच Wings EV Robin कारला 4 दरवाजे देण्यात आलेले आहे. अगदी छोटी कार असून देखील या कार ला कंपनीने 4 दरवाजे दिले आहे. ज्यामुळे ड्रायव्हर आणि पॅसेंजर हे दोन्ही बाजूने उतरू किंवा बसू शकतात. या कारची लांबी ही 2250mm आहे, रुंदी 945mm आणि उंची 1500mm इतकी आहे.

या कारची साईज ही टू व्हीलर पेक्षा थोडीशी जास्त आहे. त्यामुळे या कारला अगदी कमी जागा लागते. या कारचा व्हील बेस हा 1505mm आहे तर ट्रेक हा 770mm इतका आहे. या कारचे वजन हे 501 kg इतके आहे. तसेच या गाडीची जमिनीपासून उंची म्हणजेच ग्राउंड क्लिअरन्स हा 160mm इतका आहे. ही कार आकाराने जरी छोटी असली तरी या कार मध्ये सर्व सुविधा या 4 व्हीलर कार प्रमाणे आहेत. या कारला एकूण 4 चाकी देण्यात आलेले आहेत, या टायरची साईज ही 120/80R12 इतकि आहे. 

Wings EV Robin Price या कारची किंमत 

या छोट्याशा कार मध्ये कंपनीने 3 व्हेरिएंट उपलब्ध केले आहेत. ज्यामध्ये इ, एस आणि एक्स असे 3  व्हेरिएंट आहे. या 3 व्हेरिएंट मध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आलेले आहेत Wings EV Robin कारचे बेस व्हेरियंट विंग्स ईव्ही रॉबिन एस या कारची किंमत ही 2 लाख रुपये आहे, या व्हेरिएंट मध्ये एसीची सुविधा देण्यात आलेली नाही. यापेक्षा वरचे व्हेरिएंट विंग्स ईव्ही रॉबिन एस या कारची किंमत कंपनीने 2.5 लाख रुपये ठेवली आहे. तर या कारचे सर्वात टॉपचे मॉडेल विंग्स ईव्ही रॉबिन एक्स या कारची किंमत 3 लाख रुपये इतकी आहे. या टॉपच्या व्हेरियंटमध्ये एसीची सुविधा देण्यात आलेली आहे. 

Wings EV Robin Competition एमजी कॉमेट ईव्ही सोबत करणार स्पर्धा 

इलेक्ट्रिकल कार मध्ये सर्वात कमी किंमत असलेली एमजी हेक्टर कंपनीची एमजी कॉमेट ईव्ही या कार सोबत विंग्स ही कार स्पर्धा करणार आहे. सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिकल कार मध्ये एमजी कंपनीची कार ही सर्वात स्वस्त अशी होती. या कारणांमध्ये आपल्याला 17.3 kw ची बॅटरी देण्यात आलेली होती. त्याचबरोबर या बॅटरीची वारंटी ही 8 वर्षाची होती आणि या कारची रेंज ही 230 km पर्यंत देण्यात आली होती. एमजी कंपनीच्या कार ची किंमत 7 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत आहे. एमजी कंपनीच्या कारशी तुलना करत या विंग्स कार ची किंमत अगदी कमी आहे. त्याचबरोबर या कारमध्ये फीचर्स देखील चांगले देण्यात आलेले आहेत.

हे वाचा : Maruti Suzuki Ignis Launched : या कार ने केली आहे दणक्यात एन्ट्री, टाटा च्या Punch कारला बसणार फटका

Wings EV Robin Safety सेफ्टी 

कंपनीने ही कार 2 पॅसेंजर साठी बनवलेली असून ही कार मोटरसायकलला चांगली पर्याय ठरु शकते. या कारची किंमत देखील ही मोटर सायकल च्या किमती एवढी असून या कारमध्ये आपल्याला उन, वारा आणि पाऊस यापासून संरक्षण होऊ शकते आणि सुरक्षेच्या दृष्टीने देखील हि कार योग्य ठरू शकते. कंपनीने Wings EV Robin कार मध्ये मजबूत स्टील वापरले असून या कार ने क्र्याश टेस्ट देखील पास केली आहे. तसेच या कार मध्ये आपल्याला ड्रायव्हर आणि पॅसेंजर या दोघांसाठी सीट बेल्ट भेटतात. या कारमध्ये थर्मल मॉनिटरिंग चा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे कारचे टेंपरेचर आपण बघू शकतो तसेच या कारमध्ये ऑडिओ अलर्टची सुविधा देण्यात आलेली आहेत.

Wings EV Robin ही कार फायद्याची कशी ठरू शकते? 

सध्या देशभरात ट्राफिक वाढल्यामुळे रोडवर खूपच गर्दी झालेली दिसते. शहरांमध्ये तर प्रचंड अशी ट्राफिक वाढलेली आहे आणि अपघात देखील त्याच प्रमाणात वाढलेले आहेत. (Wings EV Robin) देशातील एकूण अपघातांपैकी बाईक अपघातांमध्ये मृत्युदर हे जास्त असते. बाईक ला बाहेरून कुठल्याही प्रकारचे संरक्षण नसल्याने एक्सीडेंट मध्ये जीवितहानी होण्याची शक्यता ही जास्त असते. परंतु बाईक ला पर्याय म्हणून ईव्ही रॉबिन हि कार चांगले पर्याय ठरू शकते. Wings EV Robin या कारची सीटिंग कॅपॅसिटी ही देखील 2 लोकांचीच आहे. त्याचबरोबर या कारची साईज ही देखील बाईक एवढीच असल्याने बाईक ऐवजी ही कार घेणे योग्य ठरू शकते. तसेच अपघात प्रसंगी या कारमध्ये संरक्षण होण्याची शक्यता जास्त असेल.

हे देखील वाचा : Maruti Suzuki Brezza : हि आहे मारुतीची सर्वात Best Suv कार, जाणून घ्या कींमत

Spread the love