Youtuber Dhruv Rathee : ध्रुव राठी पुन्हा एकदा अडचणीत, दिल्ली कोर्टाने 6 ऑगस्टला उपस्थित होण्याचे दिले आदेश

Youtuber Dhruv Rathee : ध्रुव राठी पुन्हा एकदा अडचणीत, दिल्ली कोर्टाने 6 ऑगस्टला उपस्थित होण्याचे दिले आदेश

Youtuber Dhruv Rathee : भारतीय youtuber ध्रुव राठी याला दिल्ली कोर्टाने नोटीस पाठविली आहे. ध्रुव राठी विरुद्ध मानहानी च्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दिल्ली कोर्टाने युट्युबर ध्रुव राठी ला 6 ऑगस्टला कोर्टात उपस्थित होण्याचे आदेश दिले आहे. 

Youtuber Dhruv Rathee
Youtuber Dhruv Rathee

ध्रुव राठी विरुद्ध गुन्हा का दाखल झाला ? 

(Youtuber Dhruv Rathee) भाजप पक्षाचे नेते सुरेश नखुआ यांनी असा दावा केला आहे, की युट्युबर ध्रुव राठी याने त्याच्या व्हिडिओ मध्ये आपल्या विरुद्ध हिंसक आणि अपमानास्पद वाक्यांचा उपयोग केला आहे. ध्रुव राठी आणि आपल्या मध्ये कुठलाही वाद नसतानाही ध्रुव राठी हा युट्युबर व्हिडिओ बनवत असताना आपल्या विरुद्ध खोटे आरोप करून मानहानी पोहोचवीत आहे. हा गुन्हा दाखल केल्यानंतर दिल्ली कोर्टाचे न्यायाधीश गुंजन गुप्ता यांनी 19 जुलैला सुनावणी केली आहे. (Youtuber Dhruv Rathee) आणि आता 6 ऑगस्ट रोजी या गुन्ह्याचे पुढील सुनावणी होणार आहे. त्यासाठी युट्युबर ध्रुव राठी याला कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. 

काय आहे खरे प्रकरण ?

सुरेश नखुआ हे भाजप पक्षाच्या युनिटचे प्रवक्ते असून त्यांनी असा आरोप केला आहे, की ध्रुव राठी हा त्याच्या यूट्यूब चैनल वर राजकीय व्हिडिओ बनवत असतो आणि त्यामध्ये आपल्या विरुद्ध खोटे आरोप करून आपले वर्णन हे हिंसक असे स्वरूपाचे करतो. 7 जुलै 2024 ला ध्रुव राठी यानी युट्युब वर व्हिडिओ पोस्ट केला होता. (Youtuber Dhruv Rathee) या व्हिडिओचे शीर्षक “माय रिप्लाय टू गोदी यूट्यूबर्स” असे केले होते. या व्हिडिओ वरूनच हा वाद सुरू झाला आहे. सुरेश नखुआ यांचे वकील राघव अवस्थी आणि मुकेश शर्मा हे या खटल्याचे वकील असून त्यांनी कोर्टामध्ये सुरेश नखुआ यांची बाजू मांडत त्यांच्या प्रतिष्ठेला मानहानी होत असल्याचा दावा केला आहे. 

Youtuber Dhruv Rathee
Youtuber Dhruv Rathee

सुरेश नखुआ यांचा आरोप 

भाजप पक्षाचे नेते सुरेश नखुआ यांच्या मते youtuber ध्रुव राठी आपल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या विरुद्ध हिंसक आणि अपमानास्पद शब्दांचा वापर करत असतो. (Youtuber Dhruv Rathee) त्यामुळे समाजामध्ये त्यांच्याबद्दल संशय आणि अविश्वास पसरत आहे. त्यामुळे त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. सुरेश नखुआ यांच्या मते आपण कष्टाने आपले नाव समाजात कमवले आहे. परंतु ध्रुव राठी हा त्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याविरुद्ध खोटे दावे करून आपले समाजात नाव कमी करत आहे. त्यामुळे या खोट्या आरोपामुळे त्याचे अनेक परिणाम होऊ शकतात. व्हिडिओद्वारे पसरणाऱ्या खोट्या माहितीमुळे समाजाचा दृष्टिकोन हा बदलत असतो. या व्हिडिओमुळे फक्त व्यावसायिक नाही तर वैयक्तिक देखील त्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असा दावा सुरेश नखुआ यांनी केला आहे.

ध्रुव राठी बद्दल Who Is Dhruv Rathee

ध्रुव राठी हा भारतीय युट्युबर असून तो जगभरात प्रसिद्ध झाला आहे, ध्रुव राठी याचे युट्युब वर अनेक चॅनल आहेत. परंतु त्यापैकी एक प्रसिद्ध चैनल त्याच्या नावाने “ध्रुव राठी” या नावाने आहे. (Youtuber Dhruv Rathee) या चैनल वर त्याचे करडो ने  चाहते आहेत. या यूट्यूब चैनल वर त्याचे दोन कोटी तीस लाख पेक्षा जास्त सदस्य आहेत. त्याच्या यूट्यूब चैनल वर सबस्क्राईबर फक्त भारत देश नाही तर पाकिस्तान मधून देखील आहेत.

त्याच्या या यूट्यूब चैनल वर तो राजकीय, शैक्षणिक आणि पर्यावरण संबंधित अनेक व्हिडिओ बनवत असतो. त्याचे इंस्टाग्राम वर देखील 1 कोटी 20 लाख फॉलोवर आहेत. त्याच बरोबर टाईम मॅक्झिनच्या इमर्जिंग लीडर्स यादीमध्ये देखील त्याचे नाव आहे. ध्रुव राठी हा सध्या जर्मनी मध्ये आहे आणि तो तिथे राहून व्हिडिओ बनवत असतो गेल्या अनेक वर्षांपासून तो जर्मनीमध्ये स्थायी झाला आहे. 

Youtuber Dhruv Rathee
Youtuber Dhruv Rathee

हरियाणा चा ध्रुव राठी 

ध्रुव हा मूळचा हरियाणा राज्यातील रोहतक गावचा आहे ध्रुव राठी हा जाट समुदायाचा आहे. त्याचे बालपण हे दिल्लीमध्ये गेले असून त्याचे प्राथमिक शिक्षण देखील दिल्लीमध्ये झाले आहे. (Youtuber Dhruv Rathee) दिल्लीमधील आर के पूर मधील पब्लिक स्कूलमध्ये त्याचे शिक्षण झाले होते. त्यानंतर उच्च शिक्षण त्याने जर्मनीमध्ये पूर्ण केले त्यानी इंजिनिअरिंग ही जर्मनी मधून पूर्ण केली आणि डिग्री मिळवली इंजीनियरिंग झाल्यानंतर त्याने अक्षय ऊर्जा या विषयावर आपली मास्टर डिग्री पूर्ण केली. ध्रुव राठी हा जर्मनीमध्ये सध्या वास्तव करत असला तरी तो अनेक वेळा भारतामध्ये त्याच्या हरियाणा येथील गावी तो जात असतो. त्याचे अनेक व्हिडिओद्वारे समजते की तो भारतामध्ये वारंवार येत असतो. 

ध्रुव राठीचा यूट्यूब प्रवास 

ध्रुव राठी याचे शिक्षण चालू असतानाच तो युट्युब वर व्हिडिओ बनवत होता. ध्रुव राठी याला सुरुवातीपासूनच व्हिडिओ एडिटिंग मध्ये आवड होती. (Youtuber Dhruv Rathee) तो दिल्लीमध्ये असतानाच व्हिडिओ बनवत होता आणि व्हिडिओ एडिटिंग चे काम देखील करत होता. सुरुवातीला तो ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत होता. तो ट्रॅव्हल वर व्हिडिओ बनवून शेअर करत असे त्यानंतर 2013 पासून त्याने देशातील अनेक विषयावर जसे की शिक्षण, पर्यावरण यावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.

हळूहळू त्याचे चाहते वाढत गेले आणि त्याने दिलेली माहिती ही लोकांना आवडू लागली. त्यामुळे त्याचे फॉलोवर्स मध्ये झपाट्याने वाढू लागले. त्यानंतर त्याने राजकीय व्हिडिओ करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याने शैक्षणिक, राजकीय, पर्यावरण आणि जागतिक घडामोडी या सर्व विषयांवर व्हिडिओ बनविण्यास सुरुवात केली. त्याचे व्हिडिओ या देशभरात प्रसिद्ध झाले आणि त्याच्या फॉलोवर्स मध्ये खूप वाढ झाली. 

ध्रुव राठीचे लग्न Dhruv Rathee Wife

भारतामध्ये ध्रुव राठी ने आपले प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो जर्मनीमध्ये गेला होता. जर्मनीमध्ये त्याने आपले इंजिनिअरिंग पूर्ण केले. (Youtuber Dhruv Rathee) त्याचबरोबर आपली मास्टर डिग्री देखील तिथेच पूर्ण केली. तो शिक्षण घेत असताना जर्मनीच्या एका मुलीच्या प्रेम संबंधात आला. 2014 साली तो जर्मनीमधील “जुली” नावाच्या मुलीच्या संपर्कात आला तेथूनच त्यांचे संबंध पुढे लग्नामध्ये झाले.

त्याने 2021 मध्ये जुली सोबत जर्मनी मध्ये लग्न केले. त्यानंतर त्यांनी परत 2022 मध्ये भारतीय परंपरेने लग्न केले. त्यानंतर ध्रुव राठीचा ट्रॅव्हल्स संबंधित एक वेगळा युट्युब चॅनेल असून त्या यूट्यूब चैनल वर तो त्याच्या पत्नीसोबत जगातील अनेक देश फिरत असतो आणि त्या देशातील माहिती यूट्यूब चैनल द्वारे देत असतो. (Youtuber Dhruv Rathee)

ध्रुव राठी याची संपत्ती Dhruv Rathee Net Worth

ध्रुव राठि याचे मुख्य इन्कम स्रोत हे यूट्यूब चैनल आहे, त्याचे अनेक youtube चैनल आहे. सुरुवातीला त्याचा एकच यूट्यूब चैनल होता. सध्या त्याचा ध्रुव राठी नावाने youtube चैनल हा मुख्य चैनल असून या चैनल वर त्याचे 2 कोटी पेक्षा जास्त सबस्क्राईबर आहेत. त्याचा ट्रॅव्हल संबंधित देखील युट्युब चॅनेल आहे आणि त्यासोबतच त्याचे इंस्टाग्राम वर 1 कोटी पेक्षा जास्त फॉलोवर आहे, ट्विटर वर देखील त्याचे खूप फॉलोवर आहेत.

सर्व सोशल मीडियावर त्याचे करोडो चाहते आहे आणि त्याचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत हे सोशल मीडिया हेच आहे. त्याचबरोबर तो युट्युब वर त्याने बनवलेले कोर्स देखील विकत असतो. (Youtuber Dhruv Rathee) तेथूनही त्याला इन्कम होते. एका वेबसाईटच्या दाव्यानुसार ध्रुव राठी याची संपत्ती 60 कोटी रुपये इतकी आहे आणि युट्युबरून तो महिन्याला 40 लाख रुपये पर्यंत कमवतो आणि वार्षिक तो 12 कोटी रुपये पर्यंत कमवतो अशी या वेबसाईटच्या दाव्या नुसार त्याचे इन्कम आहे. 

राजकीय पक्ष 

ध्रुव राठी वर या अगोदर देखील खूप सारे आरोप झाले होते. तो भाजप पक्ष आणि मोदी सरकार विरोधात चुकीचे व्हिडिओ बनवत असल्याचा त्यावर आरोप वारंवार होत आहे. यापूर्वी ध्रुव राठी याने खूप सारे व्हिडिओ बनविलेले आहेत. या व्हिडिओ मध्ये त्याने स्पष्ट पणे सरकार विरोधात खूप सारे मुद्दे मांडले आहेत आणि ध्रुव राठी हा आम आदमी पार्टीला पाठिंबा देतो असा दावा देखील केला जात आहे. (Youtuber Dhruv Rathee) मागील काही व्हिडिओमध्ये बघितल्यावर समजते की ध्रुव राठी याने निवडणुका जवळ आल्या नंतर सरकार विरोधात खूप व्हिडिओ बनविले होते.

त्यामुळे त्याचे व्हिडिओ हे सरळ सरकारच्या विरोधात आणि एक पक्षी असतात असा देखील दावा केला जात आहे. ध्रुव राठी हा आपल्या व्हिडिओद्वारे भारतीय जनतेला भ्रमित करत असल्याचे आरोप देखील होत आहे. ज्यावेळेस निवडणुकांना सुरुवात झाली होती. त्याच वेळेस ध्रुव राठी यानी सरकार विरोधात आवाज उठवत व्हिडिओ बनविण्यास सुरुवात केली होती. अनेक मुद्द्यावरून त्याने भारतीय जनता पार्टीला टोकावर धरले होते. त्यापैकी त्याचे काही गाजलेले व्हिडिओ म्हणजे मणिपूर, हुकूमशाही आणि इलेक्ट्रॉल बोंड घोटाळा असे अनेक व्हिडिओ त्याचे देशात प्रसिद्ध झाले होते. 

हे वाचा : Maruti Suzuki Brezza : हि आहे मारुतीची सर्वात Best Suv कार, जाणून घ्या कींमत

विरोधी पक्षांचा पाठिंबा 

ध्रुव राठी व्हिडिओद्वारे सरकारला टारगेट करत असून त्याला विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे असा आरोप देखील वारंवार झालेला आहेत. देशांमधील विरोधी पक्ष हे ध्रुव राठी याला पाठिंबा देतात आणि त्याच्या व्हिडिओचा आधार घेऊन राजकारण करत असल्याचे आरोप देखील आपल्याला बघायला मिळाले आहेत. (Youtuber Dhruv Rathee) निवडणुकी दरम्यान अनेक विरोधी पक्षांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ध्रुव राठी याचे व्हिडिओचा वापर केला होता. मोठे मोठे स्क्रीनचा वापर करून अनेक ठिकाणी शहरांमध्ये जास्त रहदारीच्या ठिकाणी त्याचे व्हिडिओ लावण्यात आले होते. त्यामुळे अनेकदा विरोधी पक्षांवर देखील आरोप झाले होते. 

ध्रुव राठी वर होणारे आरोप 

ध्रुव राठी वर या अगोदर देखील खूप सारे आरोप झालेले आहेत निवडणुकीदरम्यान त्याचे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मधून त्याने सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. (Youtuber Dhruv Rathee) त्याचे प्रत्येक व्हिडिओ हे व्हायरल होत होते. त्यामुळे त्याचे व्हिडिओ हे भारतीय जनतेला भ्रमित करत असून चुकीची माहिती त्या व्हिडिओद्वारे तो देत आहे असे आरोप त्यावर झाले होते. तसेच ध्रुव राठीची पत्नी ही पाकिस्तानची आहे असा आरोप देखील करण्यात आला होता. त्याबरोबरच ध्रुव राठी हा दाऊद इब्राहिमच्या बंगल्यामध्ये राहतो असा आरोप झाला होता.

पाकिस्तान कडून मराठी याला पाठिंबा मिळत आहे आणि भारतामधून विरोधी पक्षांकडून देखील त्याला पाठिंबा मिळत असल्याचा दावा केला जात होता. (Youtuber Dhruv Rathee) या आरोपांवर उत्तर देताना ध्रुव राठी म्हणाला की माझ्याकडून व्हिडिओ बनविण्यात आले होते त्यांचे उत्तर सरकारकडे नसल्याने त्यामुळे ते असे खोटे आरोप माझ्यावर करत आहे, असे ध्रुव राठीचे म्हणणे होते. ध्रुव राठीने दावा केला आहे की तो पाकिस्तानी नसून तो फक्त भारतीय आहे. तसेच त्याची पत्नी ही जर्मनीची आहे आणि त्याच्या कुटुंबाचा कुठल्याही दुसर्या देशा सोबत किंवा पक्षा सोबत संबंध नाहीये.आपल्यावर होणारे सगळे आरोप हे खोटे असल्याचा दावा ध्रुव राठी याने केला होता.

हे देखील वाचा : Mahindra Thar Roxx Launch : Thar चाहत्यांसाठी आनंदाची बातमी या तारखेला होणार Thar Roxx लॉन्च, जाणून घ्या कींमत

Spread the love