Ladki Bahin Yojana : आता या तारखेला जमा खात्यात जमा होणार 3000/- रुपये
Ladki Bahin Yojana : एक जुलैपासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 17 ऑगस्ट या तारखेला सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी एकाच वेळी 3000/- रुपये जमा होणार आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व लाभार्थी महिलांना या दिवशी 3000/- रुपये पाठवण्याचा निर्णय सरकारद्वारे घेण्यात आला आहे.
(Ladki Bahin Yojana) या योजनेमध्ये बहुतांश महिलांना लाभ होण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे. सरकारने आता या योजनेमध्ये खूप सारे बदल करत महिलांना अर्ज सोप्या पद्धतीने भरता येण्यासाठी खूप साऱ्या नियम व अटी कमी केले आहे. यामुळे महिलांना अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र देखील आता कमी झाले आहे.
आलेल्या नवीन माहितीनुसार 17 ऑगस्ट रोजी पहिला हप्ता हा महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि हा पहिला हप्ता 3000/- रुपयेअसणार आहे. हे 3000/- रुपये म्हणजे जुलै महिन्यातील एक हप्ता आणि ऑगस्ट महिन्यातील एक हप्ता असणार आहे. हे दोन्ही हप्ते एकाच वेळी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्रीनी दिली आहे. या दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे हे रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सध्या चालू आहे. या योजनेचा अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 ऑगस्ट पर्यंत आहे. आतापर्यंत राज्यभरातील लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. (Ladki Bahin Yojana) तसेच या अर्जाची पडताळणी देखील सुरू आहे. हा अर्ज भरण्यासाठी खूप साऱ्या अडचणी येत आहे सरकारद्वारे देण्यात आलेले पोर्टल आणि वेबसाईट जलद गतीने चालत नसल्याने फॉर्म भरण्यासाठी अडचण येत आहे. सरकारने यासाठी नवीन पोर्टल जाहीर केले आहे.
या नवीन पोर्टल द्वारे आता फॉर्म हा जलद गतीने भरता येणार आहे. राज्य सरकारचा एकच हेतू आहे की जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी या योजनेतील नियम व अटी देखील आता करण्यात आल्या आहे. जर 31 ऑगस्ट पर्यंत हे फॉर्म पूर्णपणे भरल्या गेले नाही, तर राज्य सरकार कदाचित मुदतवाढ देखील करू शकते. यावर अजून सरकारने निर्णय दिलेला नाही. (Ladki Bahin Yojana) परंतु फार्म भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेतात यावर राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल असे चिन्ह दिसत आहे.
हे देखील वाचा : Favarni Pump Yojana : फवारणी पंप वर मिळणार 100% अनुदान, असा करा अर्ज