Dhruv Rathee : एका भारतीय युवकाने जर्मनी मध्ये बसून BJP पक्षाला घाम फोडला आहे.

Dhruv Rathee : एका भारतीय युवकाने जर्मनी मध्ये बसून BJP पक्षाला घाम फोडला आहे.

Dhruv Rathee
Dhruv Rathee

Dhruv Rathee :- सध्या देशा मध्ये BJP पक्षाला जेवढी विरोधी पक्षाची भीती नाही तेवढी भीती एका Youtuber ध्रुव राठी ची आहे.ध्रुव राठी हा एक  भारतीय युवक आहे आणि तो काही वर्षांपासून युट्युब वर आपले चैनल बनवून भारतीय जनतेला देशातील घडामोडी बद्दल  तसेच शैक्षणिक व्हिडिओ बनवून माहिती देत असतो.निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ध्रुव राठी ने BJP पक्षाला घाम फोडला आहे.देशा मध्ये कोणीही BJP पक्षाच्या विरोधात बोलताना थोडस घाबरूनच बोलत असतो,परंतु भारतातील रहिवासी असलेला ध्रुव राठी हा Youtube च्या माध्यमातून मध्ये बसून BJP पक्षावर निशाना साधला आहे.

Dhruv Rathee ने आत्ताच अपलोड केलेला हुकुमशाही (The Dictatorship) हा विडीओ खूप व्हायरल होत आहे.जवळपास २ कोटी लोकांनी हा विडीओ बघितला आहे.त्यामुळे कुठे न कुठे BJP पक्षा मध्ये भीतीच वातावरण तयार झालेले आहे. सध्या निवडणुका जवळ येत असल्याने प्रचार करायला सुरवात झाली आहे. परंतु एकीकडे जोरदार प्रचार होत असताना ध्रुव राठी हा आपल्या विडीओ द्वारे लोकांमध्ये BJP सरकारचा खरा चेहरा समोर आणण्याचा प्रतन करत आहे.

Dhruv rathee vs BJP आपल्या विडीओ मध्ये BJP पक्षाने कसा भ्रष्टाचार केला आहे ते उघड करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने सध्या युट्युबवर विडीओ अपलोड करण्याचा धडाका लावला आहे. धुव राठी १,२ दिवसा नंतर BJP पक्षा च्या विरोधात विडीओ अपलोड करून BJP पक्षावर चांगलाच निशाना साधत आहे.ध्रुव राठीचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे.त्याचे युट्युबवर सध्या 19 million फोलोवर आहेत.आणि त्याच्या विडीओ ला खूप सारे views देखील येत असतात.त्यामुळे BJP पक्षाच्या कार्यकर्त्यावर तो जणू एक टांगती तलवारच आहे.त्याचे विडीओ लोक आवडीने बगतात त्याच बरोबर खूप सारे लोक त्याच्या विडीओ ला शेयर देखील करत आहे.

सध्या सोशल मिडिया वर ध्रुव राठी बद्दल एक मेसज व्हायरल होत आहे त्यामध्ये असे पोस्ट केले आहे कि, धुव राठी च नाव हे “रशीद लाहोरी” आहे आणि त्याची पत्नी ज्युली हि “पाकिस्तानी” आहे.या मेसज मुळे ध्रुव राठी चांगलाच भडकला आहे.त्या भडकाऊ मेसज मध्ये असे नमूद केले आहे कि ध्रुव राठी हा एक मुस्लीम समाजाचा असून त्याची पत्नी हि देखील मुस्लीम आहे.तसेच त्याची पत्नी हि पाकिस्तान मधील दाउद याच्या कराची मधील बंगल्यात ती राहते. आणि तिला पाकिस्तानची फौज संरक्षण देत आहे.

या मेसज नंतर ध्रुव राठी म्हणाला कि “माझ्या विरोधकांना माझ्या विडीओला देण्यासाठी उत्तर नाही म्हणून ते असले खोटे मेसज व्हायरल करत आहे.आणि आता तर त्यांनी हद्दच केली आहे. त्यांनी माझ्या पत्नीला देखील यात खेचले आहे.आणि तिच्या परिवाराला देखील यात खेचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावरून IT कर्मचारी यांची नैतिक दर्जाही दिसत आहे.” असे ध्रुव राठीने आपल्या प्रत्युत्तरात सांगितले आहे.

Dhruv rathee सरकारच्या विरोधामध्ये  व्हिडिओ बनवून सांगत आहे की आत्ता आपण जर बीजेपी पक्षाच्या विरोधात म्हणजेच सरकारच्या विरोधात जर आवाज उठवला नाही तर लवकरच आपला देश हुकूमशाहीच्या जाळ्यात ओढला जाईल.जसे की रशियामध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की तेथील जनता सरकारच्या विरोधात एक शब्दही बोलू शकत नाही आणि त्याची हिंमतही कोणी करत नाही आणि सरकारच्या विरोधात कोणी आवाज जरी उठवला तर त्याला लगेच जेल ची सजा होती.

आपल्या भारत देशामध्ये देखील आपण सध्या आपल्या सरकार विरुद्ध आवाज देखील उठू शकत नाही न्यूज चैनल पत्रकार सोशल मीडिया हे सर्व सरकारने खरेदी केलेले आहे त्यामुळे आपण सरकारच्या विरोधात एक शब्द देखील बोलू शकत नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत सरकारचा खरा चेहरा पोहोचत नाही.सरकारने  लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या सर्व बातम्या यांच्यावर ताबा मिळवलेला आहे.कोणी सरकारच्या विरोधात एक शब्द लिहू शकत नाही. आणि समजा कोणी तसे लिहिले तर ते पेपरच्या सातव्या किंवा आठव्या पेजवर लिहून येते.देशातील सर्व मीडिया आणि न्यूज चैनल हे सरकारच्या ताब्यात आहे सरकार आपल्या मर्जीनुसार न्यूज चैनल चा वापर करून घेत आहे आणि स्वतःच्याच पक्षाचा  मोठेपणा दाखवत आहे आणि जर कोणी पक्षाच्या विरोधात आवाज उठवला तर त्याला पोलीस कोठडी होते किंवा त्याच्यावर ED चौकशी सुरू होते. 

Dhruv rathee आपल्या एका व्हिडिओ मध्ये सांगतो की नरेंद्र मोदी हे भाषण करताना देखील समाजामध्ये भेदभाव पसरविण्याचा प्रयत्न करतात. नरेंद्र मोदी हे हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजाचा आधार घेऊन भाषण करतात आणि मुस्लिम समाजाला टारगेट करतात नरेंद्र मोदी हे आपले भाषणात सांगतात की हिंदू समाज हा सुरवातीपासून मुस्लीम समाजाच्या दबावाखाली जगत आलेला आहे. प्रधानमंत्री ला असे बोलणे शोभत नाही. नरेंद्र मोदी कधी मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलतात तर कधी  मुस्लिम समाजाला पाठिंबा करताना दिसतात.

Whatsapp वर अशी अफवा पसरविली जाते कि हजारो वर्षापासून आपण हिंदू मुस्लिमांचा अत्याचार आणि त्यांच्या दबावाखाली जगत आलेलो आहे.तसे जर असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे काय मुसलमानांच्या दबावाखाली राहिले होते का ,छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे मोठे साम्राज्य उभे केले ते काय मुसलमानांचे दबावाखाली येऊन नाही महाराजांच्या काळात कधीही मराठ्यांवर अन्याय झाला नाही किंवा मुसलमानांकडून मराठ्यांवर अत्याचार झालेला नाही मग आपण कसे असे म्हणू शकतो की हिंदू मुसलमानांच्या दबावाखाली जगत आलेले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या  काळात त्यांनी कधीही हिंदू मुसलमान असा भेद भाव केलेला नाही छत्रपती शिवाजी महाराज देखील मुस्लिम समाजाचा आदर करत होते.

महाराज तर एका गावामध्ये  याकुत  बाबा होते हे मुस्लिम समाजाचे असताना देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असत.त्यांच्या काळात सैन्य  जेव्हा युद्धासाठी जात असत तेव्हा तेथील मज्जिद आणि आणि मुस्लिम समाजाचे कुठलेही धार्मिक स्थळाचे नुकसान करत नसत हा राजांच्या काळात नियम होता.हिंदू जनता ही मुस्लिमांच्या दबाव खाली जर जगत असती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या सैन्यांमध्ये मुस्लिम सैन्य  कसे असू शकते.स्वतः राजांच्या  मराठा सैन्यात देखील मुस्लिम सैन्य होते.जसे कि नूर खान बेग,शामा खान,दौलत खान,सिद्दी हिलाल,इब्राहीम खान,मौलाना हैदर अली.एवढेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक हे देखील मुस्लिम होते  “रुस्तम ए झामान”.

छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम समाजाच्या महिलांचा देखील खूप आदर करत असत एकदा युद्धामध्ये  मराठा सैनिकांनी मुस्लिम समाजाच्या महिलेला ताब्यात घेतले होते परंतु  छत्रपती शिवाजी महाराजांनी  तिचा आदर करून तिला परत तिच्या समाजात सुखरूप पोहोचविण्याचे  आदेश दिले होते.अशाप्रकारे त्या काळात शिवाजी महाराज आपले राज्य चालवत असे आणि  कुठलाही भेदभाव न करता सर्व जनतेवर प्रेम करत असत.आणि आताचे सरकार हे जे नेते महिलांवर अत्याचार करत आहे त्या नेत्यांना तिकीट देते आणि त्यांचा हार घालून सत्कार करण्यात करत आहे.. Dhruv rathee च्या त्या  मते  देशातील जनतेचा अंधविश्वासास व्हाट्सअप मुळे वाढत चाललेला आहे.

व्हाट्सअप वर दोन समाजामध्ये भेदभाव तयार होईल अशा प्रकारचे मेसेज हे पाठविण्यात येत असतात. आणि जनतेला संपूर्ण गोष्टीचे ज्ञान नसताना ते अशा फेक मेसेजला बळी पडतात. We the people of India. हा संदेश महात्मा गांधी यांनी दिला होता ते म्हणायचे की देशामध्ये हिंदू मुस्लिम हा भेदभाव कधीही केला जाणार नाही आणि प्रत्येक समाज हा देशांमध्ये स्वतंत्रपणे जगेल.परंतु सध्या देशांमध्ये चित्र काही वेगळेच आहे सध्याचे राजकारण हे जातीवादावर चालू आहे.BJP सरकार हे मुस्लिम  आणि हिंदू धर्माला धरून राजकारण करत आहे ज्यामुळे देशातील वातावरण सुधारण्याऐवजी आणखीनच खराब होत चालले आहे.

देशातील बहुतांश जनता ही बीजेपी ची अंधभक्त झालेली आहे जनता आता कुठला विचार न करता बीजेपी पक्षालाच मतदान करायचे असेल ठरवून आहे कारण बीजेपी  पक्षाने संपूर्ण देशावर आपले कंट्रोल मिळवले आहे आणि सर्वसामान्य जनतेचा ब्रेन वॉश करून जनतेला आपल्या ताब्यात  घेतले आहे. जनता आता सरकारच्या एवढी अधीन झाली आहे की कुठलाही विचार न करता बीजेपी पक्षाचाच पाठिंबा करत आहे. काही  जनता असे म्हणते की बीजेपी पक्षाकडून कोणीही उभे राहिले तरी आम्ही बीजेपीलाच मतदान करणार भलेही गॅस  सिलेंडर 5000 रुपयाला होऊ  किंवा पेट्रोल पाचशे रुपये होऊ. 

हे देखील वाचा !

Dhruv rathee  आपल्या भरपूर व्हिडिओमध्ये सरकारवर निशाणा साधत असतो सध्या ध्रुव राठी चे काही व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.  Dhruv rathee यूट्यूब चैनल हा फक्त हिंदी  भाषांमध्येच होता परंतु आता  त्याने पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये आपले यूट्यूब चैनल  सुरू केले आहे भारतातील ठराविक राज्यांमध्येच हिंदी भाषा जनतेला समजते परंतु काही राज्यांमध्ये हिंदी भाषा ही समजत नसल्याने त्याने आपले मुख्य चैनल चे भाषांतर करून ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू केले आहे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे की आपला आवाज हा संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे.

त्यासाठी तो  अनेक भाषांमध्ये यूट्यूब चैनल सुरू करून तेथील जनतेपर्यंत आपला संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्या नवीन सुरू झालेल्या सर्व यूट्यूब चैनल ला देखील चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे त्याने युट्युब चॅनेल सुरू केल्यानंतर एका दिवसातच 30 ते 40 हजार जनतेने त्याच्या यूट्यूब चैनल ला फॉलो केले आहे यावरून समजते की ध्रुवराधीचा देशामध्ये खूप चांगला प्रभाव असा आहे आणि त्याच्या या व्हिडिओमुळे  जनतेवर चांगलाच प्रभाव पडेल असे वाटत आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम सरकारवर होणार आहे 

Spread the love