Force Gurkha 2024 : 7 सीटर ऑफ रोडिंग कार लॉन्च,आता Mahindra Thar ला विसरून जाल

Force Gurkha 2024 : 7 सीटर ऑफ रोडिंग कार लॉन्च,आता Mahindra Thar ला विसरून जाल

Force Gurkha 2024
Force Gurkha 2024

Force Gurkha 2024 : फोर्स मोटर्स ने महिंद्रा थार ला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये गुरखा नावाची नवीन 7 सीटर कार लॉन्च केली आहे फोर्स मोटर्स ही कंपनी ऑफ रोडींग कार बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे आता ही गुरखा कार बनवून महिंद्रा थार ला चांगलीच टक्कर देणार असे अपेक्षित आहे.

Force Gurkha 2024 Launched :-

सध्या भारतामध्ये खूपच कमी SUV  गाड्या ऑफरोडिंग साठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय महिंद्राची थार आहे महिंद्रा ने 7 सीटर गाडी मार्केटमध्ये आणली आणि तिला देखील चांगला प्रतिसाद मिळाला सध्या तरी मार्केटमध्ये खूप महिंद्राची थार खूप प्रसिद्ध आहे आता देशा मध्ये 70 टक्के  ऑफरोडिंग साठी महिंद्राची थार हीच प्रसिद्ध आहे. Force Gurkha 2024 ने यापूर्वी देखील गुरखा मार्केटमध्ये आणली होती परंतु तिला मार्केटवर जास्त ताबा मिळविता आला नाही कारण त्या गुरखा गाडीमध्ये खूप साऱ्या चुका होत्या त्या सर्व पूर्ण करत आता फोर्स  मोटर्स  ने नवीन डिझाईन केलेले गुरखा मार्केटमध्ये लॉन्च केली आहे.

आता मागील सर्व चुका सुधारून आणि गाडीमध्ये खूप सारे मोठे बदल करून तयार केली आहे.या गाडीमध्ये वापरलेले इंजिन हे मर्सिडीज कंपनीचे असून हे इंजिन खूप सारी ताकद तयार करते या इंजिनची पावर तयार करण्याची क्षमता हे महिंद्राच्या थार या गाडीपेक्षा देखील जास्त आहे या सेगमेंटमध्ये फोर्स मोटर्सने खूप सारे नवीन फीचर्स ऍड केले आहे.देशामध्ये फोर्स मोटर्स ही कंपनी खूप प्रसिद्ध आहे या कंपनीने आतापर्यंत खूप सारे ऑफरोडिंग गाड्या मार्केटमध्ये उतरविल्याआहे.

ऑफरोडिंग  साठी फोर्स मोटर्स ओळखली जाते ही कंपनी नवीन नवीन गाड्या मार्केटमध्ये लॉन्च करत असते. काही दिवसांपूर्वी फोर्स मोटर्स ने लॉन्च केलेली “Focre Citiline”  ही गाडी मार्केटमध्ये चांगली पसंतीस  उत्तरली होती. आता परत कंपनीने मोठा धमाका करत भारतीय बाजारपेठेत एक एसयूव्ही आणि ती देखील पाच दरवाजे असलेली गाडी लॉन्च केली आहे या  गाडीचे कॅपॅसिटी वाढवून ती आता 7 सीटर मध्ये झाली आहे.

 फोर्स मोटर्स ने अखेर आपली Force Gurkha 2024 पाच  दरवाजे असलेली SUV  भारतात लॉन्च केली त्याचबरोबर यापूर्वी  लाँच केलेली गुरखा तीन दरवाजे असलेली गाडी ही देखील नवीन बदल करून लॉन्च केली आहे या दोन्हींमध्ये डिझाईन जवळपास सारखीच आहे.काही नवीन फीचर्स ऍड केले आहे. चला तर  जाणून घेऊया. Force Gurkha 5 – Door आणि Force Gurkha 3 – Door  यांच्या डिझाईन, इंटेरियर, इंजिन, मायलेज, किंमत याबद्दल सविस्तर.

Force Gurkha 2024 (5-Door) 

Force Gurkha 2024 5 – Door  या गाडीला मर्सिडीज बेंज या कंपनीच्या G -Wagon या गाडीसारखा लुक देण्यात आला आहे. या गाडीचा लुक एकदम वेगळा आहे आणि आपण जर ही गाडी रोडवर बघितली तर बाकी गाड्यांपेक्षा ही गाडी उंच  रुबाबदार आणि  भरगच्च अशी वाटते.या गाडीसोबत देण्यात आलेले ॲक्सेसरीज  हे देखील गाडीच्या  रुबाबदार दिसण्यात महत्त्वाचा वाटा आहे.फोर्स  मोटर्स ने ही गाडी महिंद्रा कंपनीच्या थार या गाडीला टक्कर देण्यासाठी डिझाईन केली आहे कारण महिंद्रा ने आपली पाच सीटर गाडी लॉन्च केली आहे आणि त्या गाडीला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. फोर्स मोटर्स ने यापूर्वी देखील आपली गाडी लॉन्च केली होती

परंतु या कंपनीला महिंद्रा कंपनी सारखे यश आले नाही त्याच बरोबर फोर्स मोटर्सने यापूर्वी मार्केटमध्ये आणलेली गाडी तीन दरवाजे आणि चार सीट असे होते परंतु आता नवीन पाच दरवाजे आणि सात सीटर ही गाडी लॉन्च केली आहे त्याचबरोबर या गाडीमध्ये खूप सारे नवीन पिक्चर्स देखील समाविष्ट केले आहे त्यामुळे आता गुरखा ही गाडी महिंद्राच्या  थार या  गाडीच्या कॉम्पिटिशन मध्ये उतरली आहे.या गाडीमध्ये वापरलेले इंजन हे मर्सिडीज कंपनीचे आहे.आता या गाडीमध्ये 7 सीट बसण्याची कॅपेसिटी करण्यात आली आहे. त्याचबरोबर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स देखील वाढविला आहे.

Force Gurkha Exterior (5-Door,7 Seater ) 

Force Gurkha 2024
Force Gurkha 2024

ॲक्सेसरीज मध्ये आपल्याला या गाडीसोबत  कॅरिअर,इयर इंटेक हे मिळते,या  गाडीला पाच दरवाजे असल्यामुळे गाडीची लांबी देखील वाढलेली आहे. टायरमध्ये आपल्याला 18 इंच चे ड्युअल कलर व्हील मिळते.गाडीच्या समोर बाजूस बोनेटच्यावर दोन हेडलाईट देण्यात आले आहे.हे हेडलाईट मर्सिडीज बेंज या कंपनीच्या G -Wagon या गाडी सारखे देण्यात आले आहे.समोरच्या बाजूला दोन गोल हेडलाईट देण्यात आले आहे. हेडलाईटच्या बाहेर  बाजूस DRL  देण्यात आले आहे. आणि त्या हेडलाईट च्या खाली दोन फोग  लॅम्प  देण्यात आले आहे.तसेच समोर गाडीच्या संरक्षणासाठी बंपर हे काळ्या  कलर मध्ये देण्यात आले आहे.बंपरच्या खाली प्रोटेक्शन साठी एक लोखंडी फ्रेम देण्यात आलेली आहे.लोखंडी फ्रेम मुळे गाडीला घासण्यापासून संरक्षण होते.

गाडीच्या दोन्ही बाजूला दोन साईड इंडिकेटर देण्यात आले आहे. तसेच  बाहेरील बाजूस दोन आरसे देण्यात आले आहे हे दोन्हीआरसे मॅन्युअल ऍडजेस्टेबल आहेत. गाडीच्या बाजूला 4*4*4 असा लोगो  देण्यात आला आहे.4*4  म्हणजे फोर व्हील ड्राईव्ह आणि शेवटचा 4 म्हणजे गुरखा ही गाडी चार वेगवेगळ्या  भागात चालू शकते जसे की  डोंगराळ, पाणी, जंगल, बर्फ अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी ही गाडी चालू शकते.. गाडीच्या मागील बाजूस फोर्स नावाचा लोगो देण्यात आला आहे गाडीवर कुठेही जास्त कंपनीच्या नावाचा लोगो देण्यात आलेला नाही.

मागील दोन्ही  बाजूस दोन हॅलोजन लाईट देण्यात आले आहे. तसेच मागील दरवाजाला एक स्टेफनी म्हणजेच एक स्पेअर व्हील देण्यात आले आहे. मागील बाजूस देखील बंपर आहे आणि बंपरच्या वरती रिव्हर्स कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर देण्यात आले आहे. तसेच गाडीवर चढण्यासाठी मागील बाजूने एक लोखंडी सीडी देण्यात आली आहे. दरवाजाच्या वरती एक वायपर देण्यात आले आहे तसेच दरवाजाच्या वरील बाजूस स्टॉप लाईट देण्यात आला आहे.मागील दरवाजाच्या आतल्या बाजूस वायपर साठी लागणारे पाणी स्टोअर करण्यासाठी छोटासा टॅंक दिला आहे.

Force Gurkha 2024 Interior (5-Door)  

Force Gurkha 2024
Force Gurkha 2024

Interior  टोटल 7 सीटर गाडी असल्याने पुढच्या बाजूस दोन सीट त्यामागे 3 सीटआणि शेवटी 2 सीट देण्यात आले आहे. सर्व सीटांची दिशा समोरच्या बाजूस आहे.गाडीच्या मागचे दोन सीट हे फोल्ड होऊ शकतात तसेच या दोन सीटांच्या मागे थोडीशी जागा वापरण्यासाठी  दिलेली आहे. गाडीच्या मधले सीट हे 3 सीटर आहे.तसेच या गाडीमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आला आहे तसेच यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोल साठी तीन वेगळे मोड देण्यात आले आहे यामध्ये 2H,4H आणि 4L  हे  मोड देण्यात आले आहे.गेअर बॉक्स शेजारी दोन लॉक बटन देण्यात आले आहे हे  लॉक बटन मागील आणि पुढे टायरच्या स्पीड लॉक साठी दिले आहे.

स्टेअरिंगच्या बाजूला 9 इंच चा HD डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे.आणि स्टेरिंग च्या समोर देखील डिजिटल क्लस्टर देण्यात आला आहे यापूर्वी  हा क्लस्टर Analog  होता. त्यामुळे गाडीचा आतील लुक  हा खूप छान झालेला आहे. मुलींसाठी गाडीमध्ये एसी देण्यात आलेला आहे एसीचे दोन आउटलेट देण्यात आलेले आहे हे आउटलेट  गोलाकार आकाराचे आहेत तसेच मागील प्रवाशांना करिता देखील एसीची आउटलेट हे हुडच्या मधोमध देण्यात आलेले आहे.

Force Gurkha 2024 Exterior (3-Door,4 Seater ) 

Force Gurkha 2024
Force Gurkha 2024

Force Gurkha 3 – Door या गाडीला 3 दरवाजे  आहेत  दोन्ही बाजूने दोन दरवाजे आणि मागील बाजूस एक दरवाजा आहे. पॅसेंजर बसण्याची कॅपॅसिटी ही चार आहे.Force Gurkha 2024 गाडीसोबत देण्यात आलेल्या ॲक्सेसरीज ची किंमत ही 65 हजार रुपये आहेत. ॲक्सेसरीज मध्ये कॅरिअर,आलाय व्हील आणि  फ्रंट ला  ग्लास गार्ड  देण्यात आले आहे. आलाय व्हील मुळे गाडीच्या चाकाला शाईन येते त्याचबरोबर समोरील काचेला प्रोटेक्शन  साठी लोखंडी  फ्रेम  देण्यात आली आहे. आणि गाडीच्या वरती सामान ठेवण्यासाठी  कॅरिअर देण्यात आले आहे. हे कॅरिअर खूप भक्कम देण्यात आले आहे कॅरिअरची कॅपॅसिटी ही चार क्विंटल इतकी आहे.गाडीच्या समोर  बोनेटवर दोन इंडिकेटर देण्यात आले आहे इंडिकेटर G -Wagon  या गाडी सारखे देण्यात आले आहे.

हेड लॅम्प हे  एल इ डी  वापरण्यात आले आहे.आत मध्ये डी आर एल युज करण्यात आले आहे आणि साईडला दोन  फॉग लॅम्प देण्यात आले आहे. फ्रंट ला  बंपर हे काळ्या  कलर मध्ये देण्यात आले आहे.ही गाडी ऑफरोडिंग साठी असल्यामुळे समोर बंपर च्या खाली एक लोखंडी गार्ड देण्यात आले आहे. समोरील सस्पेन्शन हे दोन्ही टायर साठी वेगवेगळे देण्यात आले आहे यामुळे गाडी आबडधोबड रोडवर किंवा खड्ड्यात जरी गेले तरी  गाडी पलटी  होण्यापासून संरक्षण होते. गाडीला देण्यात आलेले व्हील  हे 16 इंच चे आहे.व्हील ची साईज जरी कमी असली तरी देखील टायरचे साईज मोठी असल्याने गाडी उंच दिसते. टायरचे साईज 245 70/ R 16 आहे.जमिनीपासून  गाडीचे उंची हि 210 MM इतकी आहे उंची जास्त असल्याकारणाने गाडी कुठेही सहजासहजी टेकत नाही.

गाडीला देण्यात आलेले साईडला दोन आरसे हे मॅन्युअल ते आपल्याला हाताने ऍडजेस्ट करावे लागतात. गाडीला देण्यात आलेले ऐर इंटेक  हे वरती देण्यात आलेले आहेत.ऑफरोडिंग  साठी गाडी वापरणार असल्याने जर गाडी पाण्यात गेली तर हवा खेचण्याचे इंटेक हे जर पाण्यात  गेले तर गाडी लगेच बंद पडेल त्यासाठी गाडीचे इयर  इंटेक हे वर देण्यात आले आहे त्यामुळे गाडी कितीही खोल पाण्यात गेली तरी बंद पडणार नाही.

या गाडीची पाण्यात चालण्याची खोलीतील 700 MM  देण्यात आले आहे.मागील सस्पेन्शन हे देखील वेगवेगळे देण्यात आले आहे. गाडीच्या मागील बाजूस 4*4*4 असा लोगो देण्यात आला आहे. फोरव्हील ड्राईव्ह असल्याने4*4  हा लोगो देण्यात आला आहे आणि शेवटचा चार हा म्हणजे गाडी ही पाण्यात, डोंगरावर,जंगलामध्ये, बर्फामध्ये चालू शकते हे दर्शवते.Force Gurkha 2024 गाडीच्या मागील बाजूस फोर्स कंपनीचा नावाचा लोगो आहे.

कंपनीच्या नावाचा लोगो हा फक्त गाडीच्या मागे एकाच ठिकाणी देण्यात आला आहे. मागील बाजूस एका बाजूला गाडीच्या वरती चढण्यासाठी लोखंडी शिडी देण्यात आली आहे. गाडीच्या मागील बाजूस दरवाज्याच्या खाली गाडीच्या चेसीला लोखंडी हुक  देण्यात आले आहे. जर कुठे गाडी फसली तर  गाडी ओढण्यासाठी या हुकचा उपयोग होतो.डिझेल भरण्यासाठी गाडीच्या डाव्या बाजूला डिझेल टॅंक देण्यात आला आहे आणि डिझेल टॅंक चे झाकण उघडण्यासाठी मॅन्युअल फंक्शन देण्यात आले आहे.Mileage या गाडीचे मायलेज हे 9  ते 10  पर्यंत मिळू शकते. या गाडीमध्ये मर्सिडीजचे इंजन वापरण्यात आले आहे.

हे देखील वाचा : शेतकऱ्याने कोणता Tractor खरेदी करावा,किती HP चा घ्यावा ?

Force Gurkha 2024 Interior Design डिझाईन :-

 Force Gurkha 2024 या गाडीमध्ये टोटल 4 सीट देण्यात आले आहे दोन सेट पुढे आणि दोन सीट मागे मागील दोन सीटाची दिशा ही देखील समोर देण्यात आली आहे. या सीटांच्या मागे थोडीशी जागा वापरण्यासाठी मिळते. मागील दरवाजाला काचेवर वायपर देण्यात आले आहेत काचेच्या वरती स्टॉप लाईट देण्यात आला आहे.गाडीचे स्टेरिंग होईल हे हायड्रोलिक  पावर देण्यात आले आहे तसेच स्टेरिंग  हे ऍडजेस्टेबल आहे. गाडीचे टायर्स मध्ये हवा किती आहे हे दाखविण्यासाठी एक डिजिटल इंडिकेटर देण्यात आले आहे. तसेच सहा इंच स्क्रीन देण्यात आली आहे.

Spread the love