Site icon Get In Marathi

Hyundai Exter : हि आहे Hyundai ची जबरदस्त SUV कार, कींमत फक्त 6 लाख

Hyundai Exter : हि आहे Hyundai ची जबरदस्त SUV कार, कींमत फक्त 6 लाख

Hyundai Exter : Hyundai मोटरची सर्वात लोकप्रिय कार सध्या भारतामध्ये Hyundai ची Exter ही कार आहे या कारला देशभरात प्रचंड अशी मागणी सध्या आहे. Hyundai ही कंपनी देशभरात आपल्या अनेक कार साठी प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या कार या मार्केटमध्ये मोजक्याच उपलब्ध आहे. परंतु त्यांची मार्केटमध्ये खूप मागणी आहे. काही दिवसांपूर्वीच Hyundai कंपनीने आपली Exter हि कार लॉन्च केली आहे. या नवीन डिझाईन केलेल्या कार मध्ये खूप सारे फीचर्स दिलेले असून ही एक कमी किंमत मध्ये मिनी SUV कार आहे.

Hyundai Exter

Hyundai Exter ; लक्झेरिअस लुक मध्ये असणारी ही कार सध्या देशभरात प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या कार चा लुक आणि डिझाईन हा अप्रतिम असून या कारची किंमत देखील कमी आहे. (Hyundai Exter) यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील ही कार खरेदी करू शकतो. या कारची स्पर्धा ही सध्या मार्केटमध्ये प्रसिद्ध असलेल्या Tata Punch या कार सोबत होणार आहे. Tata Punch या कार ची किंमत देखील कमी असल्याने या दोन्ही कारमध्ये स्पर्धा होणार आहे. 

Hyundai Exter Engine / इंजिन 

या कार मध्ये आपल्याला 1.2 L kappa इंजिन मिळणार असून या इंजिनची क्षमता ही 1197 CC इतकी आहे. हे एक पावरफुल इंजिन आहे, या इंजिनची पावर जनरेट करण्याची क्षमता ही 81.8 bhp@6000rpm इतकि आहे. त्याचबरोबर हे इंजिन 113.8nm@4000rpm एवढे टॉर्क जनरेट करू शकते, हे एक पावरफुल इंजिन असून यामध्ये 4 सिलेंडरचा वापर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या प्रत्येक सिलेंडरला 4 वाल देण्यात आलेले आहे. या कारमध्ये ट्रान्समिशन हे ऑटोमॅटिक असून कारमध्ये 5 स्पीड गिअर बॉक्स चा वापर करण्यात आलेला आहे. या इंजिनची पावर ही कारच्या पुढील चाकांना देण्यात आलेली आहे. 

Hyundai Exter Mileage / मायलेज 

Hyundaiची Exter ही कार पेट्रोलआणि CNG व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून पेट्रोल वर या कारचे मायलेज हे 19.2kmpl इतके आहे. त्याचबरोबर इंधन टाकीचे स्टोरेज करण्याची क्षमता ही 37 Litre इतकी आहे. त्याचबरोबर हे इंजिन BS VI 2.0 या इमिशन नॉर्म्स वर आधारित आहे. या कारचे मायलेज हे चांगले असून हे मायलेज शहर आणि हायवे या नुसार वेगळे असू शकते. 

Hyundai Exter Suspension Brakes / सस्पेन्शन आणि ब्रेक 

Hyundaiच्या Exter या कार मध्ये अत्याधुनिक पद्धतीचे सस्पेन्शन वापरले आहे. या कारमध्ये वापरण्यात आलेले ऑबजरवर हे गॅस टाईपचे आहे. त्याचबरोबर या कारच्या पुढील चाकांना मॅक फर्जंन या टाईपचे सस्पेन्शन वापरलेले आहे. त्याचबरोबर मागील चाकांसाठी कपल पोर्शन बिम एक्सल हे सस्पेन्शन वापरले आहे. तसेच कार मध्ये इलेक्ट्रिक टाईपचे स्टेरिंग व्हील देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर हे स्टेरिंग व्हील ऍडजेस्ट सुद्धा करता येते. हे स्टिअरिंग व्हील मागे किंवा पुढे सरकवून चालकाच्या गरजेनुसार सेट करता येते. कारच्या पुढील चाकांसाठी डिस्क ब्रेक वापरण्यात आले आहे तर मागील चाकांसाठी ड्रम ब्रेकचा वापर करण्यात आला आहे. या कार मधील सर्व चाक हे अलॉय व्हीलचे देण्यात आलेले आहे. त्यामुळे गाडी चा लूक एकदम जबरदस्त दिसतो. तसेच 4 ही व्हीलची साईज हि 15 इंच इतकी आहे. 

Hyundai Exter Size / साईज 

Hyundai Exter ही एक कॉम्पॅक्ट SUV कार असून या कारची साईझ ही Tata Punch कार सारखी आहे. या कारची लांबी 3815 mm, रुंदी 1710 mm आणि उंची ही 1631 mm इतकी आहे. त्याचबरोबर गाडीचा व्हील बेस हा 2450 mm इतका आहे. या कारची सीटिंग कॅपॅसिटी ही 5 व्यक्तींची आहे. कारच्या उजव्या बाजूने दोन डाव्या बाजूने दोन दरवाजे देण्यात आलेले आहेत आणि मागे बूट स्पेस साठी एक दरवाजा देण्यात आलेला आहे. 

Hyundai Exter Price / किंमत 

Hyundai Exter ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल आणि सीएनजी हे दोन इंधन प्रकार मिळून Hyundai Exter ही कार एकूण 26 वेरीएंट मध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये कारची किंमत ही व्हेरिएंट नुसार वेगळी आहे. बेस व्हेरिएंट पासून तर टॉपच्या व्हेरिएंट पर्यंत या कारची किंमत वाढत जाते. या कारचे बेस व्हेरिएंट ची किंमत ही 6.13 लाख रुपये आहे. तर Hyundai Exter या कारमधील टॉप व्हेरिएंट ची किंमत ही 10.43 लाख रुपये इतकि आहे. तसेच ही कार EMI वर देखील उपलब्ध आहे. या कारला खरेदी करण्यासाठी EMI हा 17000/- रुपये चा असणार आहे.

Hyundai Exter / कम्फर्टेबल सुविधा 

या कारमध्ये Hyundai कंपनीने खूप सारे फीचर्स दिलेले आहेत. अगदी कमी किंमत मध्ये उच्च असे फीचर्स कार मध्ये उपलब्ध आहे. या कार मध्ये आपल्याला पावर स्टेरिंग त्याचबरोबर मागील आणि पुढील काचा या देखील पावर ऑपरेटेड आहे. तसेच कार मध्ये पावरफुल AC देण्यात आलेला आहे. आणि हीटर देखील दिलेले आहे. या कारचे स्टेरिंग हे ऍडजेस्टेबल आहे तसेच ड्रायव्हर सीट हे देखील ऍडजेस्टेबल देण्यात आलेले आहे.

ड्रायव्हर हा आपल्या गरजेनुसार सीट ची उंची कमी किंवा जास्त करू शकतो. तसेच गाडीतील वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल देण्यात आलेले आहे. हे क्लायमेट कंट्रोल सिस्टीम कार मधील टेंपरेचर सेन्स  करून त्यानुसार कार मध्ये वातावरण नियंत्रित ठेवते. हे पिक्चर्स अगदी लक्झरीयस कार मध्ये देण्यात येते. या कार मध्ये आपल्याला पावर आउटलेट, ट्रंक लाईट, व्हॅनिटी मिरर, पाठीमागे रीडिंग लॅम्प, पाठीमागच्या सीटाना ऍडजेस्टेबल हेड रेस्ट देण्यात आलेले आहे.

तसेच मागील सीटांसाठी पाठीमागे एसी वेन्ट दिलेले आहे. तसेच पुढील सीटाच्या मध्यभागी कप होल्डर दिलेले आहे. या कार मध्ये आपल्याला क्रूज कंट्रोल, पार्किंग सेंसर, इंजिन स्टार्ट स्टॉप बटन, ग्लो बॉक्स, यूएसबी चार्जर, बॅटरी सेव्हर, आयडियल स्टार्ट स्टॉप सिस्टीम, ऑटोमॅटिक हेड लॅम्प, फॉलो मी होम हेडल्याम्प, व्हाईस असिस्टंट सनरूफ असे असंख्य फीचर्स या कार मध्ये देण्यात आलेले आहे. या कारची तुलना केल्यास या किंमत मध्ये दुसरी कोणतीही कार एवढे फीचर्स देत नाही. 

Hyundai Exter Interior / इंटेरियर 

कार जशी बाहेरून आकर्षित करणारी आहेत तशीच आत मध्ये देखील डिझाईन करण्यात आलेले आहेत. या कार मध्ये आपल्याला डॅश बोर्डवर ट्याकोमीटर देण्यात आलेले आहे. तसेच ग्लोबॉक्स देखील दिलेले आहे. या कारमध्ये डिजिटल क्लस्टर दिलेले आहे. इन साईड रियर मिरर, पेंटेड एसी वेन्ट, फ्लोअर मॅट, गिअर नॉब, क्रोम फिनिश, मेटल फिनिश इन साईड डोअर हँडल, डिजिटल क्लस्टर असे खूप सारे फीचर्स या कार मध्ये उपलब्ध आहेत. 

Hyundai Exter Exterior / एक्सटेरियर 

कारच्या समोर ऍडजेस्टेबल हेड लॅम्प दिलेले आहे. हेडलाईट प्रोजेक्टर प्रकाराचे आहे. तसेच हेडलाईटच्या खाली आपल्याला डीफॉगर लॅम्प देण्यात आलेले आहे. तसेच पावर ऑपरेटेड ऍडजेस्टेबल रियर व्ह्यू मिरर दिलेला आहे. रियर व्ह्यू मिरर हा इलेक्ट्रिकली फोल्ड होतो. या कारच्या मागील काचेला वायपर आणि वाशर दिलेले असून त्यासोबतच डीफॉगर देखील दिलेले आहे. या कारला सर्व व्हील हे अलॉय व्हील देण्यात आलेले आहे.

त्यामुळे कारच्या लुक मध्ये अजूनच भर पडते. तसेच कारच्या पाठीमागे वरती स्पॉयलर देण्यात आलेले आहे. कारच्या दोन्ही मिररला टर्न इंडिकेटर दिलेले आहे. तसेच कारच्या वरती शार्क फिन अँटिना दिलेला आहे. कारच्या वरती देण्यात आलेला सनरूफ हा सिंगल फेन मध्ये उपलब्ध आहे. या कारच्या टायरची साईझ ही 17/65R15 आहे. या कारचे सर्व टायर हे रेडियल ट्यूबलेस आहे. कारच्या समोर आणि मागे दोन्ही बाजूने एलईडी डीआरएल देण्यात आलेले आहे. तसेच कारच्या मागे देण्यात आलेला टेल लाईट हा देखील एलईडी स्वरूपाचा आहे. 

हे देखील वाचा : IND Vs SL 3rd T20 Highlights : अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा लाजिरवाणा पराभव, सुपर ओव्हर मध्ये भारताने सामना जिंकला

Hyundai Exter Safety / सेफ्टी 

या कार मध्ये जसे डिझाईन आणि फीचर्स दिलेले आहे तसेच सेफ्टी साठी देखील या कार मध्ये उच्च सुरक्षा फीचर्स चा वापर करण्यात आलेला आहे. या कार मध्ये आपल्याला अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टीम मिळते तसेच सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, अँटिथ अलार्म अशा अनेक सुविधा देण्यात आलेल्या आहे. या कारमध्ये एकूण 6 एअर बॅग दिलेल्या आहेत. ज्या की ड्रायव्हर साईड आणि पॅसेंजर साईडने उपलब्ध आहे. तसेच साईडने देखील एअर बॅग देण्यात आलेल्या आहे. सेफ्टीसाठी या कारमध्ये डे नाईट रियर व्ह्यू कॅमेरा दिलेला आहे. Hyundai Exter तसेच कर्टन एअरबॅगचा देखील वापर करण्यात आलेला आहे.

या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. सीट बेल्ट जर लावलेला नसेल तर त्यासाठी वार्निंग देणारी सुविधा देखील उपलब्ध आहे. डोअर अजर वार्निंग देखील उपलब्ध आहे. कारच्या टायर मधील प्रेशर मोजण्यासाठी देखील अत्याधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आलेला असून त्यामुळे टायर मधील प्रेशर हा मोजता येऊ शकतो. इंजिन इमोबलाइजर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हाय स्पीड अलर्ट, स्पीड सेन्सिंग, हिल असिस्ट, इम्पॅक्ट सेंसिंग अशा अनेक सुविधा या कार मध्ये उपलब्ध आहेत. 15-20 लाख रुपयांच्या कार मध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधा या 6 लाखाच्या कार मध्ये कंपनीने दिल्या आहे. 

हे देखील वाचा : IND Vs SL 2nd T20 Highlights : भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव भारताची 2-0 अशी आघाडी

Hyundai Exter Entertainment / एंटरटेनमेंट 

कारमध्ये एंटरटेनमेंट साठी रेडिओ देण्यात आलेला आहे त्याचबरोबर 8 इंच मोठा इन्फोटेनमेंट डिस्प्ले दिलेला आहे. हा डिस्प्ले टच स्क्रीन असून त्यामध्ये ब्लूटूथ कनेक्शन सुविधा उपलब्ध आहे. या कारमध्ये पुढे आणि मागे स्पीकर देण्यात आलेले आहेत. तसेच कार मध्ये वायरलेस फोन चार्जिंग सुविधा देखील उपलब्ध आहे. अँड्रॉइड आणि एप्पल कार प्ले या सुविधा देखील उपलब्ध आहेत. तसेच मोबाईल चार्जिंग करण्यासाठी यूएसबी पोर्ट दिलेले आहे.

हे देखील वाचा : Tata Punch CNG : Tata ची CNG व्हेरियंट मधील सर्वात बेस्ट कार, जाणून घ्या कींमत

Spread the love
Exit mobile version