Site icon Get In Marathi

IND VS ZIM 4th T20 Highlights : भारतीय संघाने तुफान फटकेबाजी करत 10 विकेट्सने सामना जिंकत, 3-1 अशी आघाडी घेत मालिकाही जिंकली

IND VS ZIM 4th T20 Highlights : भारतीय संघाने तुफान फटकेबाजी करत 10 विकेट्सने सामना जिंकत, 3-1 अशी आघाडी घेत मालिकाही जिंकली

IND VS ZIM 4th T20 Highlights : भारतीय संघाने तुफान फटकेबाजी करत 10 विकेट्सने सामना जिंकत, 3-1 अशी आघाडी घेत मालिकाही जिंकली.चौथ्या T20 सामनात भारतीय संघाने तुफानी कामगिरी करत हा सामना जिंकला. IND VS ZIM 4th T20 Highlights हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळण्यात आला होता. चौथ्या T20 सामन्या मध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. झिम्बाब्वे संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओवर मध्ये 7 विकेट गमावत 152 धावा काढल्या होत्या.

IND VS ZIM 4th T20 Highlights

IND VS ZIM 4th T20 Highlights भारताला मिळालेले 153 धावांचे आव्हान भारतीय संघाने एकही विकेट न गमावता हे आव्हान पूर्ण केले. भारतीय संघाने 15.2 ओवर मध्ये हे आव्हान सहजपणे पूर्ण करत हा सामना जिंकला त्याचबरोबर या मालिकेतील 3 सामने जिंकून भारतीय संघाने मालिकाही आपल्या नावावर केली आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाचे सलामीचे फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि भारतीय संघाचा कप्तान शुभमन गील या दोघांनी नाबाद खेळी केले. या जोडीने भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

या दोघांनी नाबाद खेळी करत यशस्वी जयस्वालने 93 धावा केल्या तर शुभमन गील यानी 58 धावा केल्या.  झिम्बाब्वे संघाने फलंदाजी करताना सुरुवात चांगली केली होती. परंतु सलामीची जोडी बाद झाल्यानंतर बाकी कोणताही खेळाडू जास्त वेळ मैदानात टिकू शकला नाही. झिम्बाब्वे संघाकडून मधेवेरे, T मारुमनी आणि सिकंदर राजा या तिघांनी चांगली फलंदाजी केली. (IND VS ZIM 4th T20 Highlights) संघाकडून सिकंदर राजा यानी सर्वोच्च 46 धावा केल्या. झिम्बाब्वे संघाने देखील चांगली कामगिरी केली होती. या संघाने प्रथम फलंदाजी करताना सन्मानजनक स्कोर उभा केला होता. 

झिम्बाब्वे संघाची फलंदाजी 

झिम्बाब्वे संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी मधेवेरा आणि T मारुमनी ही जोडी मैदानात आली होती. (IND VS ZIM 4th T20 Highlights) या दोघांनी संयमाने खेळी करत झिम्बाब्वे संघाला चांगली सुरुवात करून दिली. या जोडीने नाबाद 50 धावांची भागीदारी केली आणि झिम्बाब्वे संघाला 50 धावांचा पल्ला गाठून दिला. संघाचे धावफलक 63 असताना झिम्बाब्वे संघाची पहिली विकेट पडली. नवव्या ओवरच्या  चौथ्या चेंडूवर T मारुमनी हा बाद झाला. T मारुमनी याला अभिषेक शर्मा यानी रिंकू सिंग च्या हाती झेल देत बाद केले. T मारुमनी यानी 31 चेंडूमध्ये 32 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 3 चौकार लगावले होते झिम्बाब्वे संघाची स्थिती 63 धावा एक गडी बाद अशी झाली होती. T मारुमनी आणि मधेवेरे या दोघांमध्ये 63 धावांची भागीदारी झाली होती.

T मारुमनी बाद झाल्यानंतर मधेवेरेच्या साथीला फलंदाजीसाठी ब्रायन बेनेट हा आला. परंतु ही जोडी जास्त वेळ मैदानात टिकली नाही संघाचे धावफलक 67 असताना झिम्बाब्वे संघाची दुसरी विकेट पडली. 10 व्या ओवरच्या 6 व्या चेंडूवर मधेवेरे हा बाद झाला. (IND VS ZIM 4th T20 Highlights) मधेवेरे याला शिवम दुबे याने रिंकू सिंग च्या हाती झेल देत बाद केले. मधेवेरे यानी 24 चेंडू मध्ये 25 धावा केल्या त्यामध्ये 4 चौकार लगावले होते. ब्रायन बेनेट आणि मधेवेरे या दोघांमध्ये 4 धावांची भागीदारी झाली होती. मधेवेरे बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी  झिम्बाब्वे संघाचा कप्तान सिकंदर राजा हा मैदानात आला. या दोघांनी संयमाने खेळायला सुरुवात केली. परंतु संघाचे धावफलक 92 असताना ब्रायन बेनेट हा चुकीचा फटका मारून बाद झाला.

14 व्या ओवरच्या चेंडूवर ब्रायन बेनेट याला वाशिंग्टन सुंदर याने यशस्वी जयस्वालच्या हाती झेल देत बाद केले. ब्रायन बेनेट यानी 14 चेंडूंचा सामना करताना 9 धावा केल्या होत्या. (IND VS ZIM 4th T20 Highlights) ब्रायन बेनेट आणि सिकंदर राजा या दोघांमध्ये 25 धावांची भागीदारी झाली होती. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 92 धावा 3 गडी बाद अशी झाली होती. ब्रायन बेनेट बाद झाल्यानंतर सिकंदर राजाच्या साथीला झिम्बाब्वे संघाचा आक्रमक फलंदाज जोनॅथन कॅम्पबेल हा फलंदाजीसाठी मैदानात आला. परंतु तोही जास्त वेळ सिकंदर राजाला साथ देऊ शकला नाही. संघाच्या धावफलकामध्ये 4 धावांची भर पडली आणि जोनॅथन कॅम्पबेल देखील बाद झाला. 2 धावा काढण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. जोनॅथन कॅम्पबेल याने 3 चेंडू मध्ये 3 धावा केल्या होत्या.

त्याला रवी बिश्नोई याने धाव बाद केले. (IND VS ZIM 4th T20 Highlights) आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 96 धावा 4 गडी बाद अशी झाली होती. जोनॅथन कॅम्पबेल बाद झाल्यानंतर सिकंदर राजाच्या साथीला झिम्बाब्वे संघाचा आक्रमक फलंदाज डीऑन मायर्स हा आला. या दोघांनी चांगली खेळी करत संघाला सावरले. भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीचा सामना करत या दोघांनी संयमाने खेळ करत झिम्बाब्वे संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचविले. संघाचे धावफलक 141 असताना झिम्बाब्वे संघाचा कप्तान सिकंदर राजा हा बाद झाला तो जोरदार टोला लगावण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याला तुषार देशपांडे यानी शुभमन गील च्या हाती झेल देत बाद केले. सिकंदर राजा यानी 28 चेंडू मध्ये 46 धावा केल्या. त्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार लगावले होते.

IND VS ZIM 4th T20 Highlights

सिकंदर राजा यानी तुफान फटकेबाजी करत झिम्बाब्वे संघाला मोठे योगदान दिले. सिकंदर राजा आणि डीऑन मायर्स या जोडीमध्ये 45 धावांची भागीदारी झाली होती. 19 व्या ओवरच्या  तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला होता. सिकंदर राजा बाद झाल्यानंतर डीऑन मायर्सच्या साथीला फलंदाजीसाठी क्लीव मदंडे हा आला. आता 9 चेंडू शिल्लक राहिले होते. त्यामुळे झिम्बाब्वे संघाचे फलंदाज हे आक्रमकपणे खेळत होते. 20 व्या ओवरच्या  पहिल्या चेंडूवर डीऑन मायर्स हा झेलबाद झाला. (IND VS ZIM 4th T20 Highlights) डीऑन मायर्सला खलील अहमद याने झेलबाद केले. डीऑन मायर्स याने 13 चेंडू मध्ये 12 धावा केल्या होत्या. डीऑन मायर्साने आणि क्लीव मदंडे या दोघांमध्ये 6 धावांची भागीदारी झाली होती. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 147 धावा 6 गडी बाद अशी झाली होती.

शेवटचे 5 चेंडू शिल्लक होते डीऑन मायर्स बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी फराज हा आला. 20 व्या ओवरच्या शेवटच्या चेंडूवर क्लीव मदंडे हा बाद झाला. त्याला खलील अहमद याने रिंकू सिंग च्या हाती झेल देत बाद केले. क्लीव मदंडे याने 5 चेंडू मध्ये 7 धावा केल्या होत्या. (IND VS ZIM 4th T20 Highlights) त्यामध्ये 1 चौकार लगावला होता. अशा प्रकारे झिम्बाब्वे संघाने 20 ओव्हर मध्ये 7 गडी गमावत 152 धावा केल्या. फराज आणि क्लीव मदंडे या दोघांमध्ये 5 धावांची भागीदारी झाली होती. फराज याने नाबाद 3 चेंडूंचा सामना करताना 4 धावा केल्या.

झिम्बाब्वे संघाने या सामन्यात चांगली फलंदाजी करताना 152 धावा केल्या आणि भारतीय संघाला जिंकण्यासाठी 153 धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाकडून गोलंदाजी मध्ये खलील अहमद याला 2 विकेट मिळाल्या आणि तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, शिवम दुबे यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. झिम्बाब्वे संघाने पावर प्ले मध्ये 44 धावा केल्या. 

भारतीय संघाची फलंदाजी (IND VS ZIM 4th T20 Highlights)

153 धावांची आव्हान मिळाल्यानंतर भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी यशस्वी जयस्वाल आणि भारतीय संघाचा कप्तान शुभमन गील हि जोडी फलंदाजीसाठी आली होते. या जोडीने सुरुवातीपासूनच आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली होती. या दोघांनी आपली विकेट न गमावता पावर प्ले मध्ये तब्बल 61 धावा ठोकल्या शुभमन गील हा थोडा सावकाशपणे खेळत होता. (IND VS ZIM 4th T20 Highlights) परंतु दुसऱ्या बाजूने यशस्वी जयस्वाल हा झिम्बाब्वे संघाच्या गोलंदाजाची चांगलीच धुलाई करत होता. या जोडीने कुठलीही चूक न करता जोरदार खेळी केली. या जोडीने 10 ओव्हर मध्ये भारतीय संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला. यशस्वी जयस्वाल यानी आपले अर्धशतक पूर्ण केले होते.

हे देखील वाचा : IND VS ZIM 5th T20 Highlights : अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाचा झिम्बाब्वे संघावर 42 धावांनी दणदणीत विजय,मालिकाही जिंकली

त्यानंतरही ही जोडी संयमाने खेळी करत कुठलीही चूक न करता धावसंख्या पुढे नेत राहिले. 15 ओवर मध्ये भारतीय संघाने एकही विकेट न गमावता 150 धावा पूर्ण केल्या आणि झिम्बाब्वे संघाच्या गोलंदाजांना कुठलेही यश मिळवता आले नाही. भारतीय संघाने मिळालेले 156 धावांची आव्हान हे फक्त 15.2 ओव्हर मध्ये पूर्ण केले. (IND VS ZIM 4th T20 Highlights) त्या बदल्यात एकही विकेट गमावली नाही. भारतीय संघाने हा सामना 10 विकेट्सनी जिंकला. यशस्वी जयस्वाल यानी तुफान पटकेबाजी करत 53 चेंडूमध्ये 93 धावा केल्या.

त्यामध्ये 13 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. तर दुसऱ्या बाजूने भारतीय संघाचा कप्तान शुभमन गील याने देखील चांगली खेळी केली. (IND VS ZIM 4th T20 Highlights) शुभमन गील याने 39 चेंडू मध्ये 58 धावा केल्या. त्यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. यशस्वी जयस्वाल याचे 7 धावांवरून शतक हुकले. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गील या दोघांमध्ये 92 चेंडू मध्ये 156 धावांची भागीदारी झाली होती. झिम्बाब्वे संघाकडून गोलंदाजी मध्ये सर्व गोलंदाजांनी चांगली अशी गोलंदाजी केली. परंतु त्यांना यश मिळाले नाही अशाप्रकारे भारतीय संघाने हा सामना एकहाती जिंकत मालिकाही आपल्या नावावर केली.

हे देखील वाचा : IND VS ZIM 2nd T20 Highlights : पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेत भारतीय संघाने झिम्बाब्वेचा केला दारुण पराभव

यापूर्वी झालेल्या 3 सामन्यांमध्ये भारतीय संघाने 2 सामने जिंकले होते. तर झिम्बाब्वे संघाने 1 सामना जिंकला होता. भारतीय संघाला मालिका जिंकण्यासाठी फक्त 1 सामना जिंकण्याची गरज होती आणि तो 1 सामना भारतीय संघाने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. 3-1 अशी आघाडी घेत भारतीय संघाने मालिका जिंकली आहे. आता 5 वा सामना बाकी आहे भारतीय संघाने पहिला T-20 सामना पराभूत झाल्यानंतर चांगली खेळी करत बाकीचे सर्व सामने जिंकले. आता सर्वांचे लक्ष असेल की 5 वा सामना भारताने जिंकत सलग 4 सामन्यांमध्ये विजय मिळविने.

सामन्याचा मानकरी 

भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल हा या सामन्याचा मानकरी ठरला. यशस्वी जयस्वाल यानी सलामीला फलंदाजी करताना नाबाद 53 चेंडू मध्ये 93 धावा काढल्या. (IND VS ZIM 4th T20 Highlights) त्यामध्ये 13 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. T20 वर्ल्ड कप सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही त्यानंतर झिम्बाब्वे विरुद्ध पहिले 2 सामन्यांमध्ये देखील यशस्वी याला संधी मिळाली नव्हती. परंतु या सामन्यांमध्ये संधी मिळाल्यानंतर त्यानी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली.

हे देखील वाचा : IND VS ZIM 3rd T20 Highlights : भारताने झिम्बाब्वेला 23 धावांनी चारली धूळ, 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने घेतली आघाडी

Spread the love
Exit mobile version