IND VS ZIM 5th T20 Highlights : अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाचा झिम्बाब्वे संघावर 42 धावांनी दणदणीत विजय,मालिकाही जिंकली
IND VS ZIM 5th T20 Highlights : भारताच्या यंग ब्रिगेड ने झिम्बाब्वे विरुध्द 42 धावांनी विजय मिळवीत 5 सामन्याच्या मालिकेमध्ये 4-1 अशी मालिका जिंकली आहे. 5 व्या सामन्यामध्ये भारतीय संघाने 42 धावांनी झिम्बाब्वेचा पराभव केला.
IND VS ZIM 5th T20 Highlights : भारताने अगोदरच 3 सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली होती. 5 व्या सामन्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 167 धावा काढल्या होत्या. त्या बदल्यात 6 गमावले होते. झिम्बाब्वे संघ हा 125 धावांवर सर्व बाद झाला आणि भारतीय संघाने 42 धावांनी दणदणीत विजय मिळविला.
भारतीय संघाची फलंदाजी (IND VS ZIM 5th T20 Highlights)
(IND VS ZIM 5th T20 Highlights) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आल्यानंतर भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल ही जोडी मैदानात उतरली. मागील सामन्यात या जोडीने नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. (IND VS ZIM 5th T20 Highlights) या सामन्यात देखील ही जोडी मोठी कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. भारतीय संघाला प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर या जोडीने आक्रमकपणे खेळण्याचा निर्णय घेतला होता. यशस्वी जयस्वाल यानी पहिल्या चेंडूपासूनच जोरदार टोले लावायला सुरुवात केली होती. यशस्वी जयस्वाल याला झिम्बाब्वे संघाचा कप्तान सिकंदर राजा याला पहिल्या ओवर मध्येच 2 षटकार ठोकले.
परंतु चौथ्या चेंडूवर यशस्वी जयस्वाल हा बाद झाला. राजा यानी यशस्वी जयस्वाल याला बोल्ड आऊट केले. यशस्वी जयस्वाल हा जोरदार खेळत असताना चेंडू सीमारेखे पार पाठविण्याच्या प्रयत्नात तो आऊट झाला. भारतीय संघाची 13 धावसंख्येवर पहिली विकेट पडली. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल या दोघांमध्ये 4 चेंडू मध्ये 13 धावांची भागीदारी झाली होती. (IND VS ZIM 5th T20 Highlights) यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी अभिषेक शर्मा हा मैदानात आला. या जोडीने देखील आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली होती. आज भारतीय संघाचे फलंदाज हे आक्रमकपणे खेळत होते. भारतीय संघांनी 5 सामन्यांची मालिका जिंकलेली होती त्यामुळे हा सामना 1 औपचारीक असल्याने भारतीय संघ हा आक्रमकपणे खेळत होता.
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी संघाला मोठे योगदान देऊ शकले नाही आणि संघाचे धावफलक 38 असताना अभिषेक शर्मा देखील बाद झाला. चौथ्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर अभिषेक शर्मा याला मुझरबनी याने क्लिव मदंडेच्या हाती झेल देत बाद केले. (IND VS ZIM 5th T20 Highlights) अभिषेक शर्माने 11 चेंडूमध्ये 14 धावा केल्या होत्या त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या दोघांमध्ये 25 धावांची भागीदारी झाली होती. आता भारतीय संघाची स्थिती 38 धावा 2 गडी बाद अशी झाली होती. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल च्या साथीला फलंदाजीसाठी भारतीय संघाचा एसटी रक्षक संजु सॅमसन हा मैदानात आला. ही जोडी ही जास्त वेळ मैदानात टिकली नाही.
संघाच्या धावफलकात 2 धावांची भर पडली आणि भारतीय संघाची तिसरी विकेट गेली. शुभमन गिल याला नगरवा याने राजा च्या हाती झेल देत बाद केले. (IND VS ZIM 5th T20 Highlights) शुभमन गिल याने 14 चेंडूंचा सामना करताना 13 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 2 चौकार लगावले होते आता भारतीय संघाची स्थिती 40 धावा 3 गडी बाद अशी नाजूक झाली होती. 5 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर शुभमन गिल हा बाद झाला होता. शुभमन गिल आणि संजू सॅमसन या दोघांमध्ये 2 धावांची भागीदारी झाली होती. शुभमन गिल बाद झाल्यानंतर संजु सॅमसनच्या साथीला फलंदाजीसाठी रियान पराग हा मैदानात आला या जोडीने संयमाने खेळत धावफलक पुढे नेले.
भारतीय संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी आक्रमकपणे खेळी केली होती. परंतु झिम्बाब्वे संघाचे गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्याने भारतीय संघाचे फलंदाज हे जास्त वेळ मैदानात टिकले नाही. आता रियान पराग आणि संजू सॅमसन या जोडीने संयमाने खेळी करत भारतीय संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला. भारतीय संघाने 14 ओव्हर मध्ये 100 धावा पार केल्या. संघाचे धावफलक 105 असताना रियान पराग हा बाद झाला. (IND VS ZIM 5th T20 Highlights) रियान पराग याला ब्रँडन मावूटां याने नगरवाच्या हाती झेल देत बाद केले. रियान पराग यानी 24 चेंडू मध्ये 22 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 षटकार लगावला होता रियान पराग आणि संजू सॅमसन या दोघांमध्ये 65 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली होती.
रियान पराग बाद झाल्यानंतर संजू सॅमसनच्या साथीला फलंदाजीसाठी भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज शिवम दुबे हा आला. शिवम दुबे याने देखील आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली होती. संजु सॅमसन यानी आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर संजू सॅमसन यानी जोरदारपणे खेळण्यास सुरुवात केली होती. संजु सॅमसन आणि शिवम दुबे या दोघांनी भारतीय संघाला 135 धावा पर्यंत घेऊन पोहोचविले. (IND VS ZIM 5th T20 Highlights) संघाचे धावफलक 135 असताना 18 व्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसन हा बाद झाला. संजू सॅमसन याला मरूमनीच्या हाती झेल देत बाद केले. संजू सॅमसन यानी 45 चेंडू मध्ये 58 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 चौकार आणि 4 षटकार लगावले होते.
संजु सॅमसन बाद झाल्यानंतर शिवम दुबे च्या साथीला फलंदाजीसाठी रिंकू सिंग हा मैदानात आला. आता 21 चेंडू शिल्लक होते. (IND VS ZIM 5th T20 Highlights) ही जोडी देखील आक्रमकपणे खेळण्याचा प्रयत्न करत होते. परंतु झिम्बाब्वे संघाच्या चांगल्या गोलंदाजी समोर भारतीय संघाचे फलंदाज हे अपयशी ठरत होते. या जोडीने संयमाने खेळत भारतीय संघाला 150 धावांचा पल्ला गाठून दिला. संघाचे धावफलक 153 असताना शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर शिवम दुबे हा धाव बाद झाला. त्याला फराज अक्रम याने धावबाद केले.
आता भारतीय संघाची स्थिती 153 धावा 6 गडी बाद अशी झाली होती. आता 5 चेंडू शिल्लक होते शिवम दुबे बाद झाल्यानंतर रिंकू सिंग च्या साथीला वाशिंग्टन सुंदर हा आला. रिंकू सिंग याने 1 षटकार ठोकला आणि भारतीय संघ हा 20 ओव्हर मध्ये 6 गडी गमावत 167 धावा करू शकला. (IND VS ZIM 5th T20 Highlights) भारतीय संघाने पावर प्ले मध्ये 44 धावा काढल्या. झिम्बाब्वे संघाकडून गोलंदाजी मध्ये राजा नगरवा आणि ब्रँडन मावूटा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. तर मुझरबनी याला 2 विकेट मिळाल्या.
झिम्बाब्वे संघाची फलंदाजी
भारतीय संघाने 20 ओवर मध्ये 167 धावा काढल्या. झिम्बाब्वे संघाला जिंकण्यासाठी 168 धावांची गरज होती. झिम्बाब्वे संघाकडून सलामीला वेस्ली मधवेरे आणि मरूमनी ही जोडी मैदानात उतरली. मागील काही सामन्यामध्ये या जोडीने झिम्बाब्वे संघासाठी चांगली सुरुवात करून दिली होती. (IND VS ZIM 5th T20 Highlights) परंतु या सामन्यामध्ये ही जोडी जास्त वेळ मैदानात टिकली नाही. संघाचे धावफलक 1 असतानाच पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर वेस्ली मधवेरे बाद झाला.
वेस्ली मधवेरे याने 3 चेंडूमध्ये शून्य धावा केल्या होत्या. त्याला मुकेश कुमार यानी बोल्ड आऊट केले. वेस्ली मधवेरे बाद झाल्यानंतर मरूमनीच्या साथीला फलंदाजीसाठी ब्रायन बेनेट हा आला. या जोडीने आता सावकाशपणे खेळण्यास सुरुवात केली होती. परंतु संघाचे धावफलक 15 असताना ब्रायन बेनेट देखील बाद झाला. तिसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर मुकेश कुमार यानी ब्रायन बेनेट याला शिवम दुबे च्या हाती झेल देत बाद केले. ब्रायन बेनेट यानी 8 चेंडू मध्ये 10 धावा केल्या होत्या त्यामध्ये 2 चौकार लगावले होते. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 15 धावा 2 गडी बाद अशी झाली होती.ब्रायन बेनेट आणि मरूमनी या दोघांमध्ये 14 धावांची भागीदारी झाली होती.
ब्रायन बेनेट बाद झाल्यानंतर मरूमनीच्या साथीला फलंदाजीसाठी झिम्बाब्वे संघाचा आक्रमक फलंदाज डीओन मायर्स हा आला. डीओन मायर्स यानी चांगली खेळी करत संघाला सावरले. या जोडीने झिम्बाब्वे संघाला 50 धावांचा पल्ला गाठून दिला. (IND VS ZIM 5th T20 Highlights) संघाचे धावफलक 59 असताना झिम्बाब्वे संघाची तिसरी विकेट पडली. मरूमनी हा 27 धावांवर बाद झाला. त्याला सुंदर यानी पायचीत बाद केले. नवव्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. मरूमनी यानी 24 चेंडू मध्ये 27 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 5 चौकार लगावले होते. मरूमनी आणि डीओन मायर्स या दोघांमध्ये 44 धावांची भागीदारी झाली होती. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर राजा हा मैदानात आला.
या जोडीने संयमाने खेळी करत धावफलकामध्ये थोडी धावांची भर पाडली. परंतु ही जोडी देखील जास्त वेळ मैदानात टिकू शकली नाही. (IND VS ZIM 5th T20 Highlights) भारतीय संघाच्या आक्रमक गोलंदाजी समोर झिम्बाब्वे संघाचे फलंदाज हे अपयशी ठरत होते. संघाचे धावफलक 85 असताना झिम्बाब्वे संघाचा आक्रमक फलंदाज डीओन मायर्स हा बाद झाला. डीओन मायर्स याला शिवम दुबे यानी अभिषेक शर्माच्या हाती झेल देत बाद केले. डीओन मायर्स याने 32 चेंडू मध्ये 34 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. डीओन मायर्स आणि राजा या जोडीमध्ये 24 धावांची भागीदारी झाली होती. 13 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर डीओन मायर्स हा बाद झाला.
आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 85 धावा 4 गाडी बाद अशी झाली होती. अजूनही संघाला जिंकण्यासाठी 90 धावांची गरज होती. डीओन मायर्स बाद झाल्यानंतर झिम्बाब्वे संघाचा कोणताही फलंदाज मैदानात जास्त वेळ टिकवू शकला नाही. एकापाठोपाठ 1 विकेट पडतच राहिल्या. डीओन मायर्स बाद झाल्यानंतर राजाच्या साथीला जोनाथन कॅम्पबेल हा फलंदाजीसाठी आला. परंतु संघाच्या धावसंख्येत 2 धावांची भर पडली आणि झिम्बाब्वे संघाचा कप्तान सिकंदर राजा हा देखील बाद झाला. (IND VS ZIM 5th T20 Highlights) संघाचे धावफलक 87 असताना झिम्बाब्वे संघाची 5 वी विकेट पडली. 14 व्या ओवरच्या चौथ्याच चेंडूवर सिकंदर राजा बाद झाला. त्याला शिवम दुबे याने धाव बाद केले राजा यानी 12 चेंडूंचा सामना करताना 8 धावा केल्या होत्या. राजा बाद झाल्यानंतर जोनाथन कॅम्पबेलचा साथीला फलंदाजीसाठी क्लिव मदंडे हा आला.
मागील काही सामन्यामध्ये क्लिव मदंडे याने चांगली फलंदाजी केली होती परंतु ही जोडी देखील जास्त वेळ मैदानात टिकली नाही. संघाचे धावफलक 90 असताना झिम्बाब्वे संघाची 6 वी विकेट पडली. 15 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर जोनाथन कॅम्पबेल बाद झाला जोनाथन कॅम्पबेल याला शिवम दुबे यानी तुषार देशपांडे च्या हाती झेल देत बाद केले. जोनाथन कॅम्पबेल यानी 7 चेंडूंचा सामना करताना 4 धावा केल्या होत्या.(IND VS ZIM 5th T20 Highlights) आता झिम्बाब्वे संघाची स्थिती नाजूक झाली होती. अवघ्या 90 धावांवर झिम्बाब्वे या संघाच्या 6 विकेट गेल्या होत्या. जोनाथन कॅम्पबेल बाद झाल्यानंतर क्लिव मदंडेच्या साथीला फलंदाजीसाठी फराज अक्रम हा आला.
परंतु पुढच्या ओव्हर मध्ये क्लिव मदंडे देखील बाद झाला. संघाचे धावफलक 94 असताना क्लिव मदंडे याला अभिषेक शर्मा यानी संजू सॅमसनच्या हाती झेल देत बाद केले. आता फराज अक्रमच्या साथीला फलंदाजीसाठी ब्रँडन मावूटा हा आला. या दोघांनी सावकाशपणे खेळण्यास सुरुवात केली. आता झिम्बाब्वे संघाचा विजय शक्य नव्हता. संघाचे धावफलक 120 वर पोहोचल्यावर ब्रँडन मावूटा हा देखील बाद झाला. 18 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर ब्रँडन मावूटा याला तुषार देशपांडे यानी बाद केले. ब्रँडन मावूटा याचा झेल तुषार देशपांडे यानी घेतला. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 120 धावा 8 गडी बाद अशी झाली होती.
ब्रँडन मावूटा बाद झाल्यानंतर फराज अक्रमच्या साथीला फलंदाजीसाठी मुझरबनी हा मैदानात आला. फराज अक्रम हा एकटा जोरदार खेळी करत होता. परंतु आता झिम्बाब्वे संघाचा विजय शक्य नव्हता संघाचे धावफलक 123 असताना आक्रम देखील बाद झाला. आक्रम याला मुकेश कुमार यानी संजू सॅमसन च्या हाती झेल देत बाद केले. फराज अक्रम याने 13 चेंडू मध्ये 27 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. 19 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर फराज अक्रम हा बाद झाला.
फराज अक्रम बाद झाल्यानंतर शेवटचा फलंदाज नगरवा हा फलंदाजीसाठी आला परंतु पुढच्याच चेंडूवर नगरवा बाद झाला. झिम्बाब्वे संघ हा 18.3 ओव्हर मध्ये सर्व गडी बाद 125 धावा करू शकला. आणि भारत हा सामना 42 धावांनी जिंकला. (IND VS ZIM 5th T20 Highlights) भारतीय संघाने 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 4-1 अशी आघाडी घेऊन मालिका आपल्या नावावर केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी मध्ये मुकेश कुमार यानी 4 विकेट घेतल्या. शिवम दुबे यानी 2 विकेट घेतल्या, तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. झिम्बाब्वे संघाने पावर प्ले मध्ये 47 धावा काढल्या होत्या.
सामन्याचा मानकरी
शिवम दुबे हा या सामन्याचा मानकरी ठरला. शिवम दुबे यानी अष्टपैलू खेळी केली. त्याने फलंदाजी मध्ये 12 चेंडू मध्ये 26 धावा ठोकल्या होत्या. (IND VS ZIM 5th T20 Highlights) त्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. त्याच बरोबर गोलंदाजी मध्ये देखील त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 ओव्हर मध्ये 25 धावा देत झिम्बाब्वे संघाचे 2 गडी बाद केले.