IPL 2024 : Mumbai Indians ला मोठा धक्का ! कोण होणार संघाबाहेर ?
IPL 2024 : Mumbai Indians ला मोठा धक्का ! कोण होणार संघाबाहेर ? : IPL 2024 ला २२ मार्च पासून सुरवात होत आहे. प्रत्येक टीम मध्ये घेतलेले player हे मोठ्या रकमेत मोजले आहे. गतवर्षी विजेती असलेली टीम चेन्नई सुपर किंग्स आणि तिला टक्कर देत असलेली टीम म्हणजे चेन्नई सुपर किन्स. या दोन्हीही टीम वर सर्वांचे लक्ष्य रोखून आहे. आणि या टीम मध्ये मोठे बदल देखील आपण बगीतले आहे. पण 2024 चे सामन्यांना सुरवात होण्या अगोदरच मुंबई इंडियन्स संघावर मोठे संकट उभे राहिले आहे.
Mumbai Indians संघामध्ये असलेले सर्वोत्कुष्ट खेळाडूवर सध्या मोठे संकट आहे. आताच्या नवीन बातमी नुसार श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका या खेळाडूला ह्यामस्ट्रिंग झाल्याने तो सुरवातीचे काही सामने नाही खेळू शकणार . दिलशान मदुशंका ला ह्यामस्ट्रिंग ची दुखापत झाली आहे.बांगलादेश विरुद्ध सुरु असलेल्या वनडे सामन्यादरम्यान हि दुखापत दिलशान मादुशांकाला झाली. त्यामुळे तो IPL सुरवातीचे काही सामने नाही खेळू शकणार .
4 कोटीच्या मोठ्या रकमेत घेतलेला दिलशान मदुशंकाची दुखापत मुंबई इंडियन्स संघासाठी मोठी चिंतेची बाब बनली आहे. बांगलादेश विरुद्ध दुसरा वनडे सामना सुरु असताना हि दुखापत त्याला झाली. दिलशान मादुशांकाच्या डाव्या ह्यामस्ट्रिंग हि दुखापत झाली आहे. दिलशान मदुशंका सामना सुरु असताना अचानक जमिनीवर पडला त्यानंतर त्याला stretcher वर उचलून नेण्यात आले. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितलेल्या माहितीनुसार आता दिलशान मदुशंका बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातुन् देखील बाहेर झाला आहे.
तसेच त्यावर शस्रक्रिया करण्यासाठी तो घरी परतला आहे. त्याला काही दिवस लागणार आहे दुखापतीतून बाहेर येण्यासाठी त्यामुळे तो IPL चे सुरवातीचे काही सामने नाही खेळू शकणार असे देखील श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने सांगितले ” दिलशान मदुशंका सुरु होणार्या दौर्यावर नाही येऊ शकत.त्याच्या ह्यामस्ट्रिंग च्या दुखापतीमुळे तो माघारी परतला आहे.दिलशान मदुशंकाने दुसर्या सामन्या दरम्यान मैदान सोडले. कारण त्याला ह्यामस्ट्रिंग ची दुखापत झाली होती.” आता तो माघारी परतला आहे आणि शास्र्क्रीयेनंतर त्याला आरमची गरज आहे.
Mumbai Indians संघाची चिंता : गतवर्षी 2023 मध्ये झालेल्या वर्ल्डकप मध्ये दिलशान मदुशंकाने श्रीलंका संघासाठी मोठी कामगिरी केली होती.त्याने वर्ल्डकप मध्ये 8 सामन्यामध्ये 23 विकेट घेतल्या होत्या. त्यामध्ये एका सामन्यात त्याने 5 विकेट देखील घेतल्या होत्या.श्रीलंकन संघ 2023 मध्ये झालेल्या वर्ल्डकप Semifinal साठी पात्र झालेला नसला.तरी दिलशान मदुशंकाने त्याच्या कामगिरीने सर्वांचे मन जिंकले. IPL 2024 च्या लिलाव मध्ये त्याने त्याची सुरवाती किमत फक्त 50 लाख ठेवली होती.परंतु त्याच्या वर्ल्डकप मध्ये केलेल्या कामगिरीमुळे तो खूप जास्त किमतीत विकला गेला. राजस्थान आणि मुंबई संघामध्ये दिलशान मदुशंकाला खरेदी साठी सुरु असलेल्या चढाओधीट मुंबई ने बाजी मारली आणि दिलशान मदुशंकाला 4 कोटी 60 लाखाला विकत घेतले.मोठ्या आशेने मुंबई इंडियन्स ने विकत घेतलेल्या दिलशान मदुशंकाला IPL सुरुवात होण्या अगोदरच नजर लागली आणि तो दुखापत ग्रस्त झाला.
संघाकडे उपलब्ध पर्याय :- Mumbai Indians संघाकडे वेगवान गोलंदाज आक्रमक आहे. आता संघामध्ये गोलंदाज जसप्रीत बुमाराह,जेसन बेहेन्डोर्फ,आकाश मधवाल,अर्जुन तेंदुलकर आणि नवीन तुषार हे वेगवान गोलंदाज आहे.गोलंदाजी मध्ये दिलशान मदुशंका दुखापातिने बाहेर झालाअसता असता संघाला अजून एक खेळाडूची चिंता आहे तो म्हणजे गेराल्ड कोएत्ज़ि . गेराल्ड कोएत्ज़ि भारता विरुद्धच्या सामन्यात दुखापत ग्रस्त झाला आहे. 24 मार्च ला मुंबई इंडियन्स आणि Gujrat Titans मध्ये सामना अहमदाबादला खेळला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये खेळला जाणार आहे.
Mumbai indians संघ :
- 1) टीम डेविड
- 2) रोहित शर्मा
- 3) नेहाल वढेरा
- 4) ईशान किशन
- 5) विष्णू विनोद
- 6) सुर्याकुमार यादव
- 7) हार्दिक पंड्या
- 8) पियुष चावला
- 9) अंशुल काम्बोज
- 10) शम्स मुलांनी
- 11) तिलक वर्मा
- 12) डीवल्ड ब्रेवीस
- 13) श्रेयश गोपाल
- 14) मोहम्मद नबी
- 15) रोमरिओ शेफर्ड
- 16) जेसन बेहेर्न्डोर्फ
- 17) गेराल्ड कोएत्ज़ी
- 18) आकाश माधवाल
- 19) अर्जुन तेंडूलकर
- 20) जसप्रीत बुमराह
- 21) कुमार कार्तिकेय
- 22) दिलशान मधुशंका
- 23) नुवान तुषारा
- 24) नमन धीर
- 25) शिवालिक शर्मा
सुर्याकुमार यादव खेळणार कि नाही ? :- Mumbai Indians संघावर एक संकट म्हणजे एक वेगवान गोलंदाज संघाबाहेर गेला आहे. त्यात अजून एक फलंदाज संघ बाहेर जाण्याची भीती आहे आणि तो म्हणजे सुर्याकुमार यादव.सुर्याकुमार यादव 2024 मध्ये दुखापतीमुळे एकही सामना खेळला नाही.त्यामुळे तो आता IPL 2024 च्या सामन्यांमध्ये खेळतो कि नाही एक मोठे प्रश्न्चींह उभे आहे.
सुर्याकुमार यादव मागील काही दिवसांपासून एका सर्जरी मधून बरा होत आहे. परंतु डॉक्टरच्या माहिती नुसार त्याला अजुनारामाची गरज आहे. तो सध्या T-20 मध्ये क्रमांक 1 वर आहे.सुर्याकुमार यादव देखील दुखापतीतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. संघाचे कोच मार्क बाऊचर यांनी देखील या समस्येवर चिंता व्यक्त केली आहे.मार्क बाऊचर म्हणाले कि BCCI कडून जो पर्यंत सुर्याकुमार यादव फिट असल्याचे सांगण्यात येत नाही. तोपर्यंत त्याची संघासाठी उपस्थिती हि एक चिंता आहे. सुर्याकुमार हा आतापर्यंत T-20 सामन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आला आहे. त्याची उपस्थिती संघामध्ये खूप मोठी भूमिका आहे.
दिलशान मधुशंका हा वेगवान गोलंदाज संघाबाहेर गेला असता आता संघासमोर एक धडाकेबाज फलंदाजाची चिंता भेडसावत आहे. सुर्याकुमार यादव ची Mumbai Indians संघामध्ये एक विस्फोटक फलंदाज म्हणून खूप मोठी भूमिका राहिली आहे.रोहित शर्मा नंतर संघाची बाजू सांभाळणे हे त्याच्यावर अवलंबून असायचे.
आतापर्यंत सुर्याकुमार यादव हा 60 T -20 सामने खेळला असून त्यामध्ये ४ शतकांचा समावेश देखील आहे. त्याने या सामन्यांमध्ये 170 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहे. आणि त्यामध्ये एकूण 2132 धावा देखील आहे. या व्यतिरिक्त त्याने IPL मध्ये 131 सामने खेळला आहे. त्याने 32 च्या स्ट्राईक रेटने 3250 धावा काढल्या आहे. आणि त्या मध्ये 1 शतक आहे.
मुंबई इंडियन्स संघाकडे पर्याय ! :- जर सुर्याकुमार यादव हा खेळू शकला नाही तर त्याची उणीव पूर्ण करणारा असा एकही विस्फोटक फलंदाज संघाकडे उपलब्ध नाहीये. परंतु त्याच्या अनुपुस्थित 4 त्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज दिवाल्ड ब्रेवीस आहे.एबी दिविलिअर्स च्या अंदाजात खेळणारा साउथ आफ्रिकेचा फलंदाज दिवाल्ड ब्रेवीस हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. आता पर्यंत दिवाल्ड ब्रेवीस ला जास्त संधी मिळालेली नसली तरी जेव्हा संधी भेटली त्या संधीचे त्याने सोने केले आहे. उत्तुंग षटकार ने त्याने आपली ओळख संघामध्ये बनवली आहे.सन 2022 च्या लिलावात खरेदी केलेला दिवाल्ड ब्रेवीस अजूनही मुंबई इंडियन्स संघासोबत आहे.2022 च्या IPL मध्ये त्याला संधी देण्यात आली होती आणि त्याने चांगली खेळी देखील केली होती.
2023 च्या IPL मध्ये त्याला एकही सामन्यात संधी भेटली नाही. परंतु अजूनही मुंबई इंडियन्स ने अजूनही संघात समावेश करून घेतला आहे. दिवाल्ड ब्रेवीस ने सर्वात वेगवान म्हणजे 35 चेंडू मध्ये शतक केलेले आहे.सन 2022 मध्ये CSA T-20 मध्ये त्याने फक्त 35 चेंडू मध्ये शतक केले होते.दिवाल्ड ब्रेवीस ने 57 चेंडू मध्ये एकूण 162 धावा काढल्या होत्या. 20 वय वर्ष असलेल्या साउथ आफ्रिकन फलंदाज ला चांगले वेगवान गोलंदाज देखील घाबरतात.मुंबई इंडियन्स चा पहिला सामना हा Gujrat Titans विरोधात 24 मार्च ला बेंगलोर येथील नरेंद्र मोदी स्टेडियम ला खेळला जाणार आहे.
मुंबई इंडियन्स ची कमान हि हार्दिक पंड्या कडे आहे तर Gujrat Titans ची शुभमन गिल कडे आहे.हार्दिक पंड्या समोर Mumbai indians चे कप्तान म्हणून नेतृत्व करण्याची मोठी भूमिका आहे. कारण मुंबई इंडियन्स चे कप्तान म्हणून नेतृत्व करणारा रोहित शर्मा या वेळेस फक्त एक फलंदाज च्या रूपाने खेळणार आहे. Gujrat Titans चा कप्तान हार्दिक पंड्या याने सलग दोन वर्ष IPL मध्ये आपल्या संघाला अंतिम सामन्यात घेऊन गेला होता त्यातील एका सामन्यात IPL चे विजेता हि ठरला होता.
त्याची हीच उत्तम कप्तानी आता Mumbai Indians चे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष्य आता हार्दिक पंड्या च्या कप्तानी वर आहे तसेच कप्तानीचे ओझे नसलेला रोहित शर्मा देखील आहे. रोहित शर्माच्या IPL मधील सातत्याने खराब कामगिरीमुळे त्याच्या कप्तानी वर प्रश्न चिन्ह उभे राहिले होते. IPL 2024 मध्ये पुन्हा एकदा Mumbai Indians पुन्हा एकदा एक बलाढ्य टीम म्हणून समोर आली आहे.
मागील 2023 IPL सीजन मध्ये Gujrat Titans ने पूर्ण सीजन मध्ये आपला दबदबा बनवून ठेवला होता.दोन्ही संघामध्ये एकूण ३ सामने खळले गेले होते त्यातील 2 समले हेGujrat Titans जिंकले होते. प्ले ऑफ मध्ये जागा मिळवण्यासाठी झालेल्या अंतिम सामन्यात Gujrat Titans ने Mumbai indians वर विजय मिळवून आपली जागा हि अंतिम सामन्यात मिळवली होती. आता त्याची परतफेड म्हणून Mumbai indiansकडे संधी आहे. पहिला सामना Gujrat Titans सोबत होणार आहे तर दुसरा सामना हा 27 मार्च ला Sunriser Hyderabad सोबत होणार आहे.