SRH VS RCB : IPL 2024 रोमहर्षक सामन्यात हैदराबादचा आरसीबी वर विजय, अनेक विक्रम बनले.

SRH VS RCB : IPL 2024 रोमहर्षक सामन्यात हैदराबादचा आरसीबी वर विजय, अनेक विक्रम बनले.

SRH VS RCB

SRH VS RCB :- IPL 2024 च्या 30 सामन्यात आरसीबी आणि हैदराबाद हे दोन संघ आमने सामने आले होते बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळण्यात आला आरसीबी ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना तीन गडी गमावत 287 धावांचा डोंगर उभा केला या सामन्यात ट्रेविस हेडची शेतकी  खेळीच्या जोरावर हैदराबादने मोठे आव्हान आरसीबी संघाला दिले मात्र प्रत्युत्तरात  आरसीबी संघ 262 धावाच करू शकला आणि हैदराबाद संघाने 25 धावांनी आरसीबी संघावर विजय मिळविला.

IPL HIGHLIGHTS :- SRH VS RCB एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबी संघाने आक्रमक खेळी सुरुवातीपासूनच केली होती. आरसीबी संघाचा कप्तान फाफ डुप्लेसिस आणि दिनेश कार्तिक या दोघांनी झुंजार खेळी करत आरसीबी संघाला विजय मिळविण्याचा अतोनात प्रयत्न केला परंतु अखेरीस आरसीबी संघाला 25 धावांनी पराभव पत्करावा लागला.या सामन्यात एकूण एकूण 549 धावा झाल्या.दिनेश कार्तिक ने या सीजन मधील सर्वात  लांब षटकार मारला त्याने 108 मीटर लांबीचा षटकार मारत या सीजन मधील सर्वात लांब षटकार मारणारा तो एकमेव फलंदाज ठरला. RCB संघ  या सामन्यात पराभूत होऊन अंकतालिकेत दहाव्या स्थानावर कायम आहे.

तर हैदराबादने या सीझनमध्ये 6 पैकी 4 सामने जिंकले आणि 2 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला. हैदराबाद संघ 8 गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दिनेश कार्तिकने 35 चेंडू 5 चौकार आणि 7 षटकार मारत 83 धावांची आक्रमक खेळी केली परंतु त्याच्या या एकेरी लढतीला संघासाठी विजय मिळवता आला नाही. त्याला फाफ डुप्लेसिस चांगली साथ दिली दिनेश कार्तिकच्या धाडसी खेळीमुळे 1 वेळेस असे वाटत होते की आरसीबी संघ हा सामना सहज जिंकेल परंतु.

हैदराबाद संघाचा कप्तान असलेला पेट कमी याच्या धारदार गोलंदाजीमुळे आरसीबी संघाला या सामन्यात पराभव पत्करावा लागला या सामन्यात आरसीबी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु हा निर्णय हैदराबाद संघाने चुकीचा ठरवत प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाला विक्रमी आव्हान देत हा सामना आपल्या  करत संघाला विजय मिळवून दिला.

 हैदराबाद संघाची जोरदार सुरुवात :-  हैदराबाद संघाची सलामीची जोडी अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड या दोघांनी सुरुवातीपासूनच आरसीबी संघाच्या गोलंदाजांवर आपला प्रभाव दाखवत आक्रमकपणे खेळी केली भारताचा युवा फलंदाज असलेला अभिषेक शर्मा याने  22 चेंडू मध्ये 34 धावा केल्या यामध्ये त्याने 2 चौकार आणि 2 षटकार लगावले तो टॉपलेच्या गोलंदाजीवर बाद झाला त्याची  झेल लोकी फर्ग्युसन याने घेतली.SRH VS RCB आरसीबी संघाला पहिली विकेट मिळाली परंतु तोपर्यंत हैदराबाद संघ मजबूत स्थितीत आला होता.

अभिषेक शर्मा बाद झाला तेव्हा 8 षटकार मध्ये हैदराबादने 108 धावा चोपल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आलेला  हेन्रिक क्लासेन हा देखील आरसीबीच्या गोलंदाजांवर तुटून पडला एका बाजूने ट्रेविस हेड तर दुसऱ्या बाजूने क्लासेन हे दोघे एका मागोमाग चेंडू  सीमा रेषा पार पाठवत होते.क्लासेन हा प्रत्येक चेंडूवर जोरदार प्रहार करत होता हैदराबाद संघाने केवळ 12 षटकार मध्येच 150 धावांच्या पुढे धावफलक नेले होते.ट्रेविस हेड याने केवळ 41 चेंडू मध्येच आपले पहिले आयपीएल मधील शतक नोंदविले त्याने 41 चेंडू मध्ये 102 धावा केल्या आणि त्यामध्ये 8 षटकार आणि 9 चौकार लगावले तो बाद झाला तेव्हा संघाचे धावफलक 165 धावा 2 बाद असे होते.

Klassen and Markram :- आता क्लासेनच्या सोबतीला मार्क्रम हा देखील जोरदार टोले लगावत  क्लासेनला साथ देत होता क्लासेन याने 31 चेंडू मध्ये 67 धावा चोपल्या त्यामध्ये 2 चौकार आणि 7 उत्तुंग षटकार लगावले.SRH VS RCB क्लासेन आणि मार्क्रम या दोघांमध्ये केवळ 27 चेंडू मध्ये 66 धावांची भागीदारी झाली तो बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर अब्दुल सामद हा फलंदाजीसाठी आला संघाचा स्कोर 231 असताना हैदराबाद संघाचा तिसरा गडी बाद झाला 17 षटकार मध्ये हैदराबादने 231 धावा चोपल्या होत्या आणि आता 3 षटकार बाकी होते. क्लासेन बाद झाला आणि आरसीबी संघाने मोकळीचा श्वास सोडला तोच अब्दुल सामत हा आरसीबी गोलंदाजांवर तुटून पडला तो एका माग 1 चौकार षटकार लगावतच होता.

त्याने केवळ 10  चेंडू मध्येच 37 धावा चोपल्या आणि 4 चौकार आणि 3 मोठे षटकार लगावले मार्क्रम ने देखील जोरदार खेळी करत 17 चेंडूमध्ये 32 धावा केल्या त्यामध्ये 2 चौकार आणि 2  षटकार समाविष्ट आहे या दोघांनी केवळ एकोणा20 चेंडू मध्ये 56 धावांची भागीदारी केली.SRH VS RCB आणि संघाला 287 धावांपर्यंत नेऊन पोहोचविले आरसीबी संघाच्या टॉपले  गोलंदाजाला 17 धावाच्या इकॉनोमीने चोपत 24 चेंडूंमध्ये 68 धावा ठोकल्या यश दयाला 4 ओवर्स मध्ये 51 धावा काढल्या.फर्ग्युसनला 4 ओवर्स मध्ये 52 धावा काढल्या त्यामध्ये त्याला 1  विकेट मिळाली.

विजयकुमारला 4  षटकार मध्ये 64 धावा लगावल्या लोमरोर  याने 1 ओवर टाकत 18 धावा दिल्या तर विल जॅकनी 3 ओवर्स टाकत 32 धावा दिल्या यामध्ये लोकी फरगुशन ला 1 विकेट तर टोपलेला 1 विकेट मिळाली अभिषेक शर्मा आणि  ट्रॅव्हल्स हेड यांनी 108 धावांची भागीदारी केली आता आरसीबी संघाला जिंकण्यासाठी 288 धावांची गरज होती.

 आरसीबी संघाची आक्रमक सुरुवात :-  गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर असून देखील आरसीबी संघाने आपली लढाव वृत्ती कायम ठेवत 287 धावांचे मोठे आव्हान पार करण्यासाठी हैदराबाद संघाचा गोलंदाजांवर हल्ला चढवत सलामीच्या जोडीने आक्रमक खेळी केली विराट कोहली आणि फाफ डुप्लेसीस या दोघांनी आरसीबीच्या गोलंदाजांना सळोकी पळू केले होते एका बाजूने विराट कोहली तर दुसऱ्या बाजूने डुप्लेसीस हा मोठे फटके लगावत.SRH VS RCB आपण या सामन्यात जिवंत  असल्याचे दाखवून देत होते. विराट कोहलीने 20  चेंडू मध्ये 42 धावा केल्या त्यामध्ये 2  षटकार आणि 6  चौकार लगावले त्याची विकेट मार्कंडे ने घेतली तो बॉल सीमारेषेपार पाठवण्याच्या धुंदीत बाद झाला.

SRH VS RCB आरसीबी संघाची पहिली विकेट विराट कोहलीच्या रूपाने पडली संघाचे धावफलक ८० असताना विराट कोहली हा बाद झाला.परंतु त्याने संघाला  चांगली सुरुवात करून दिली होती केवळ 6 ओवर्स मध्ये आरसीबीने 80 धावा पार केले होते.SRH VS RCB तो बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी विल ज्याक आला त्यानेही येताच 1 चौकार लगावला परंतु तो 7  धावांवर असताना धावबाद झाला. जय देव उनादकट ने त्याला धावबाद केले. आणि संघाचे  धावफलक 100 असताना विल जॅक बाद झाला आता डुप्लेसीच्या साथीला रजत पाटीदार हा भारतीय युवा फलंदाज आला त्यानेही आक्रमकपणा दाखवत जोरदार फटके लगावत होता परंतु तोही मार्कंडे च्या गोलंदाजीवर झेल देत बाद झाला.

त्याने 5 चेंडूमध्ये 9 धावा केल्या त्यामध्ये 1 षटकाराचा समावेश आहे पाचव्या क्रमांकावर सौरव चव्हाण हा फलंदाजीसाठी आला परंतु त्यालाही एकही बोल न खेळता पेट कमिंग स्ने बाद केले तो शून्य धावांवर झाला. 111 धावफलक असताना आरसीबी संघाची तिसरी विकेट गेली आरसीबी संघ सावध होण्याअगोदरच एकापाठोपाठ 1 विकेट जातच होत्या  फाफ डुप्लेसीस हा चुकीचा फटका मारून क्लासेन च्या हाती झेल देत बाद झाला त्याची विकेट कमिन्सने घेतली डुप्लेसीसने 28 चेंडू मध्ये 62 धावा केल्या त्यामध्ये 4 षटकार आणि 7  चौकार समाविष्ट आहे.6 व्या क्रमांकावर आरसीबी संघाचा एसटी रक्षक दिनेश कार्तिक हा आला त्याने संघाला सावरत चांगली सुरुवात केली.

आरसीबी संघाची स्थिती 122   धावांवर 5 बाद अशी झाली होती आरसीबी संघ विजयापासून खूप दूर असल्याचे दिसत होते परंतु दिनेश कार्तिक आणि माहीपाल लोमरोर या दोघांनी चांगली खेळी करत संघाला सावरले दिनेश कार्तिकने कुठलाही  चेंडू न सोडता प्रत्येक चेंडूवर जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या बाजूने माहीपाल चांगली साथ देत संघाला सावरले या दोघांमध्ये 25 चेंडू मध्ये 59 धावांची भागीदारी झाली त्यानंतर माहीपाल हा कमिन्स्च्या गोलंदाजीवर चीत बाद झाला माहीपालणे 11 चेंडूमध्ये 19 धावा केले.SRH VS RCB त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार लावले तो बाद झाल्यानंतर अनुज रावत हा दिनेश कार्तिकच्या साथीला आला या दोघांनी चांगले फटकेबाजी करत आरसीबी संघ अजून सामना जिंकू शकतो अश्या आशा पुन्हा जागृत केल्या.

दिनेश कार्तिक हा प्रत्येक गोलंदाजाला चांगलाच जोडपत होता पूर्णपणे सामन्यातून बाहेर गेलेला आरसीबी संघ पुन्हा विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता आणि संघ विजय होऊ शकतो असे वाटू लागले होते परंतु 244 धावा फलक असताना दिनेश कार्तिक हा क्लासेन च्या हाती झेल देत बाद झाला त्याची विकेट नटराज यानी घेतली दिनेश कार्तिकने फक्त 35 चेंडू मध्ये 83 धावा झोपल्या त्यामध्ये 7  षटकार आणि 5 चौकार समाविष्ट आहे.

दिनेश कार्तिक बाद झाल्यानंतर आठव्या विकेटसाठी विजयकुमार फलंदाजीसाठी आला परंतु आता सामना हातातून निसटला होता.SRH VS RCB अनुज रावत एकेरी झुंज करत होता परंतु अखेरीस 25 धावांनी आरसीबी संघाचा पराभव झाला आरसीबी संघ २० षटकार मध्ये 7  गडी गमावून 262 धावा करू शकला 1 वेळेस दिनेश कार्तिकच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर आरसीबी संघाने कमबॅक केले होते परंतु ते थोड्या धावांवरून अपुरे राहिले आणि आरसीबी संघाचा पराभव झाला.

हे वाचा !

या सामन्यात बनलेले विक्रम SRH VS RCB :- 

  •  हैदराबाद संघाने याच सीझनमध्ये दुसऱ्यांदा सर्वोच्च स्कोर नोंदविला यापूर्वी हैदराबादने मुंबई विरुद्ध सर्वोच्च स्कोर उभा केला होता परंतु तो विक्रम पुन्हा स्वतः मोडीत काढत 287  धावांचा डोंगर उभा करत पुन्हा नवीन विक्रम आपल्या नावे केला
  • दिलेल्या धावांचा पाठलाग करताना आरसीबीने सर्वोच्च धावसंख्या आपल्या नावे करत नवा विक्रम स्थापित केला आरसीबी संघाने 20 षटकार मध्ये दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना 262 धावा केल्या.
  • या सामन्यांमध्ये दोन्ही संघ मिळून 38 षटकार लगावले गेले हा 1 नवा विक्रम या सामन्यात नोंदविण्यात आला.
  •  या सामन्यांमध्ये दोन्ही संघाकडून एकूण 81 चौकार लगावले गेले. आतापर्यंतच्या सर्व विक्रमांना मोडीत काढत सर्वात जास्त चौकार या सामन्यात बघायला मिळाले.
  • या सामन्यात दोन्ही संघ मिळून एकूण 20 षटकामध्ये  549 धावा  चोपण्यात आल्या हा देखील नवा विक्रम स्थापित झाला 
  • या सामन्यात हैदराबाद संघाने एकूण 22 षटकार लगावत आतापर्यंतच्या आयपीएल मधील सर्व विक्रम मोडीत काढत सर्वोच्च षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला.
  •  आरसीबी संघाने या सामन्यात एकूण 16 षटकार मारले आणि आव्हानाचा पाठलाग करताना 16 षटकार मारण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर  नोंदविला. 
  • हैदराबाद संघाचा सलामीचा फलंदाज ट्रेविस हेड याने चौथे सर्वात जलद आयपीएल मधील शतक झळकावले त्याने केवळ 39 चेंडू मध्येच त्याचे शतक पूर्ण केले. 
  • या सामन्यात हैदराबादने फलंदाजी करत असताना शेवटच्या 5 षटकांमध्ये 82 धावा चोपल्या शेवटच्या 5 षटकांमध्ये सर्वोच्च धावसंख्या नोंदवत हैदराबादने नवा विक्रम नोंदविला.