Ladki Bahin Yojana 3ra Hapta : लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता 4500 रुपये या दिवशी होणार जमा

Ladki Bahin Yojana 3ra Hapta : लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता 4500 रुपये या दिवशी होणार जमा

Ladki Bahin Yojana 3ra Hapta :

Ladki Bahin Yojana 3ra Hapta
Ladki Bahin Yojana 3ra Hapta

Ladki Bahin Yojana 3ra Hapta : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना राज्यातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांसाठी एक प्रकारचे वरदान ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार गरीब कुटुंबातील महिलांना प्रति महीना 1500/- रुपये देत आहे. या आर्थिक मदतीमुळे गरीब महिलांना आपल्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या मदत करता येत आहे.

तसेच आपल्या मुलांसाठी देखील या पैशांद्वारे त्यांच्या गरजा पूर्ण करता येतात. आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने या योजनेचे 2 हप्ते वितरित केलेले आहे. या 2 हप्ते मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे लाखो महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000/- रुपये जमा करण्यात आलेले आहेत. हे 3000/- रुपये म्हणजे पहिल्या 2 महिन्यांच्या हप्त्याची एकत्रित रक्कम आहे. जी प्रति महिना 1500/- रुपये अशी आहे. (Ladki Bahin Yojana 3ra Hapta)

तिसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर 

आतापर्यंत लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये 3000/- रुपये आले आहे. परंतु आता सप्टेंबर महिन्याचे 1500/- रुपये येणे बाकी आहे. यामध्ये ज्या महिलांना पहिल्या 2 हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत. त्यांना एकत्रित 4500/- रुपये असा हप्ता दिला जाणार आहे. सरकारने जाहीर केले आहे की 14 ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. ज्या महिलांना या अगोदर 3000/- रुपये मिळालेले आहे. त्या महिलांना आता 1500/- रुपये मिळणार आहे. (Ladki Bahin Yojana 3ra Hapta) 

लाभार्थी वितरण सोहळा 

(Ladki Bahin Yojana 3ra Hapta) या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी सरकारने विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 14 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे या लाभार्थी हप्त्याचे वितरनासाठी सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात तिसऱ्या टप्प्याचे औपचारिक वितरण आणि योजनेचा फायदा याबद्दल आढावा घेतला जाणार आहे. 

योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल 

लाडकी बहिणी योजनेचा अर्ज करताना सुरुवातीला हा अर्ज लाभार्थी स्वतः ऑनलाईन पद्धतीने किंवा सेतूमध्ये जाऊन करू शकत होता. परंतु सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या गैर व्यवहारानंतर राज्य सरकारने यामध्ये आता मोठा बदल केला आहे. या योजनेचा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

नवीन नियमानुसार आता फक्त अंगणवाडी केंद्रांना या योजनेचा अर्ज स्वीकारता येणार आहे आणि मंजूर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या मोठ्या निर्णयाबद्दल राज्य सरकारने एक GR काढला आहे. या नवीन निर्णयाचे उद्दिष्ट म्हणजे या योजनेचा फायदा अधिक पारदर्शक आणि योग्य असा झाला पाहिजे. 

अर्ज कसा करायचा? 

ज्या महिलांनी अजून या योजनेसाठी अर्ज केलेला नाही. त्या महिलांना आता अर्ज करण्यासाठी आपल्या गावातील अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. यासाठी त्यांनी अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांची भेट घेणे गरजेचे आहे. सोबतच या अर्जासाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची पूर्तता करणे देखील गरजेचे आहे. 

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या एका सभेमध्ये मोठी घोषणा केली आहे. या सभेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की लाडक्या बहिणींचा आशीर्वाद जर आमच्या सरकारसोबत राहिला तर आम्ही या योजनेच्या मासिक रकमेत वाढ करणार आहोत. आता तुम्हाला मिळत असणारी रक्कम 1500/- वाढवून आम्ही ही रक्कम प्रति महिना 3000/- रुपये करणार आहे असे त्यांनी म्हटले आहे. (Ladki Bahin Yojana 3ra Hapta)

या योजनेसाठी आता विरोधी पक्षाने ही प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांचे सरकार जर सत्तेत आले तर ते “महालक्ष्मी योजना” नावाची योजना सुरु करणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 3000/- रुपये दिले जातील आणि या रकमेमध्ये दरवर्षी 1000/- रुपयांनी वाढ केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे. 

लाडकी बहिन योजनेचे महत्त्व 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक दृष्ट्या आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या योजनेतून होणाऱ्या आर्थिक लाभांमुळे महिलांना आपले जीवन मान सुधारण्यास मदत होईल. तसेच या योजनेमुळे महिलांना आर्थिक निर्णय घेण्याचे देखील स्वातंत्र्य मिळेल. ज्यामुळे समाजात लैंगिक समानता साठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. 

या योजनेतील आव्हाने आणि भविष्यातील मार्ग 

(Ladki Bahin Yojana 3ra Hapta) या योजनेमुळे सर्वसामान्य जनतेला लाभ होत आहे. परंतु या योजनेला आव्हाने देखील तेवढेच आहे. या योजनेसाठी गैर व्यवहार थांबविणे, दीर्घकालीन शास्वता, लाभार्थी पर्यंत लाभ मिळणे हे काही महत्त्वाचे आव्हाने आहेत. सोबतच सरकारने अर्ज प्रक्रियेत बदल केल्याने हे देखील आव्हान आता उभे आहे. 

(Ladki Bahin Yojana 3ra Hapta) या योजनेचा विस्तार जास्तीत जास्त करून, अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा. हे सरकारचे उद्दिष्टे असेल सोबतच आर्थिक मदतीसोबत महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. ज्यामुळे त्यांना दीर्घकाळ आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होता येईल.

हे देखील वाचा : Crop Insurance : अतिवृष्टी मुळे नुकसान झाले, शेतकऱ्यांनो 72 तासांच्या आत करा हे काम 

Spread the love