MI vs SRH IPL 2024 Result : हैदराबादने केला 31 धावांनी मुंबईचा पराभव, षटकारांचा पडला पाऊस.
MI vs SRH IPL 2024 Result :- 2024 च्या आयपीएल मधील 8 वा सामना का सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स मध्ये खेळला गेला हा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियम वर खेळला गेला हैदराबादने मुंबई इंडियन्स वर 31 धावांनी विजय मिळविला या सामन्यांमध्ये आपल्याला मोठे रेकॉर्ड्स बघायला मिळाले चला तर जाणून घेऊया या सामन्यामधील सविस्तर वृत्त.
MI vs SRH IPL 2024 Result :- काल झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स मधील आठव्या सामन्यात मुंबईला सलग दुसऱ्यांदा आयपीएल मध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 277 धावा आणि 3 बाद असे मोठे धावफलक उभे केले.हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असणारी मुंबई इंडियन्सची टीम या सामन्यात देखील लाजीरवान्या पराभवाला सामोरी गेली. या सामन्यात सुरुवातीपासूनच हैदराबादने संघाने आपले वर्चस्व दाखविले होते. त्या बदल्यात मुंबई इंडियन्स ने देखील चांगली सुरुवात केली परंतु अखेरीस मुंबईला हा पराभव स्वीकारावा लागला.मुंबई इंडियन्स ने वीस षटकार मध्ये 5 बाद 246 धावा करू शकली.
या सामन्यात आपल्याला मोठे मोठे रेकॉर्ड्स बघायला मिळाले :- जे रेकॉर्ड्स मोडणे दुसऱ्या संघासाठी अवघड ठरेल या सामन्यात उत्तुंग षटकारांचा पाऊस पडला.या सामन्यात एकूण दोन्ही संघाकडून 38 षटकार लगावले या मॅचमध्ये गोलंदाजांची चांगली धुलाई झाली. who win today toss मुंबई इंडियन्स संघ सर्वाधिक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारण्याचा विक्रम केला सनरायझर्स हैदराबादला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स कडून चार धावांनी पराभव स्वीकारावर लागला होता त्यानंतर या दुसऱ्या सामन्यात हैदराबादला मोठा विजय मिळाला तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला यापूर्वी मुंबई इंडियन्सचा गुजरात कडून 6 धावांनी पराभव झाला होता मुंबई इंडियन्स ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला हा निर्णय मुंबई इंडियन्स साठी चुकीचा ठरला.
आतापर्यंत होम ग्राउंड वर हैदराबादने सात सामने खेळले आहे आणि त्या सातही सामन्यात हैदराबाद संघाला विजय मिळवता आला आहे.हा सामना देखील होम ग्राउंड वरच असल्यामुळे सनराइज् हैदराबाद साठी ही एक संधी होती रोहित शर्मा चा हा 200 वा सामना होता. यामध्ये 34 अर्धशतके आणि 1 शतकाचा समावेश आहे सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज नटराजन जखमी असल्यामुळे त्याच्या जागेवर जयदेव ला संघामध्ये स्थान मिळाले होते तर ट्रॅव्हिस हेड याला देखील संघामध्ये स्थान मिळाले होते तर मुंबई इंडियन्स मध्ये याच्या जागी वेंना मफाका याला संधी मिळाली होती दोन्ही संघात हे बदल झाले होते.
MI vs SRH IPL 2024 Result :- सुरुवातीला हैदराबादने सावधपणे खेळी केली सलामिला आलेली जोडी मयंक अग्रवाल आणि ट्रॅव्हिस हेड यांनी सावधपणे खेळण्यास सुरुवात केली या दोघांनी संघासाठी 25 चेंडूंमध्ये 45 धावांची भागीदारी केली मयंक अग्रवाल ने 13 चेंडूमध्ये 11 धावा करत एक चौकार लगावला मुंबईचा कप्तान हार्दिक पांड्याने मयंक अग्रवाल ची विकेट घेतले मयंक अग्रवाल ने टीम डेविडच्या हाती झेल देत बाद झाला. त्यानंतर ट्रेविस हेडला साथ देण्यासाठी अभिषेक शर्मा हा आला व या दोघांनी दुकान फटकेबाजी करत मोठे षटकार आणि चौकार लावले या दोघांनी तुफान फटकेबाजी करत संघाला 7 ओव्हर मध्ये 100 रन पार करून दिले.
हैदराबाद संघाने मुंबईच्या गोलंदाजांना सळोकी पळू करून सोडले :- या दोघांनी केवळ 23 चेंडू मध्ये 68 धावा ठोकल्या त्यानंतर ट्रॅव्हल्स हेड हा बाद झाला तो बाद झाला तेव्हा संघाचा स्कोर 113 धावा आणि दोन विकेट असे होते. गेराल्ड ने हेडला बाद केले ट्रेविसिड याने नमन च्या हाती झेल देत बाद झाला परंतु एके बाजूने अभिषेक शर्माने फटकेबाजी चालू ठेवली होती. मुंबई इंडियन्सने दुसरी विकेट मिळवल्यानंतर मोकळीचा श्वास घेते तोपर्यंत अभिषेकच्या जोडीला मायक्रम हा आला आणि परत दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
बुमराह ची भेदक गोलंदाजी :- बुमरह व्यतिरिक्त दुसरा कोणताही गोलंदाज हैदराबादच्या फलंदाजासमोर टिकू शकला नाही सर्व गोलंदाजांची धुलाई करत हैदराबादने आपले इरादे स्पष्ट केले होते ट्रीवीस हेड बाद झाला परंतु त्याने संघासाठी मोठे योगदान दिले.MI vs SRH IPL 2024 Result ट्रीवीस हेडणे 24 चेंडू मध्ये 62 धावा केल्या त्यामध्ये 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता त्यानंतर अभिषेक शर्माला साथ देण्यासाठी आलेला मार्क्रम यानेही सुरुवातीलाच मोठे टोले लगावत मुंबई इंडियन्स संघाला घाम फोडला. हैदराबाद संघाचा प्रत्येक फलंदाज हा खूप वेगाने खेळत होता कोणताही फलंदाज संथपणे खेळत नसल्याने मुंबईसाठी मोठी डोकेदुखी झाली होती.
बुमरा देखील चांगली कामगिरी करू शकत नसल्याने हैदराबाद संघाचे धावफलक हे मोठ्या वेगाने वाढत होते अभिषेक शर्मा हा प्रत्येक गोलंदाजांची चांगली धुलाई करत होता अभिषेक शर्माने केवळ 23 चेंडूमध्ये 63 धावा केल्या आणि उत्तुंग असे 7 षटकार लगावले आणि 3 चौकार लावले अभिषेक शर्माला पियुष चावलाने बाद केले त्याचा झेल नमन धीर ने घेतला अभिषेक शर्मा बाद झाला परंतु तोपर्यंत खूप वेळ झालेली होती.
अभिषेक शर्मा :- बाद झाला त्यावेळेस हैदराबाद संघाने केवळ 11 ओव्हर्स मध्ये 161 धावा केल्या होत्या तो बाद झाला तेव्हा संघाचा स्कोर 161 धावा 3 बाद आणि 11 ओवर्स असा होता अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर मुंबई इंडियन्स सुटकेचा श्वास घेतीच तोच सनरायझर हैदराबाद चा तुफान फलंदाज फॅन्ड्री क्लासेस मैदानात उतरला क्लासेन याने क्लास खेळी करत मागेपुढे न बघता येता क्षणी षटकार लगावत मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजांचे स्वागत केले.
मारकरम आणि क्लासेस हे दोघेही तुफान फटकेबाजी करत मोठे षटकार लगावत होते मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्या च्या नेतृत्वाखाली खेळत असताना गोलंदाजीत बदल करून संघासाठी विकेट मिळवण्याचा प्रयत्न करत होती परंतु संघाचे सगळे निर्णय चुकीचे ठरवत हैदराबाद संघ वेगाने धावा बनवत होता.MI vs SRH IPL 2024 Result हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्स ला मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी एकही संधी दिली नाही. मुंबई इंडियन्स संघ क्षेत्ररक्षण करताना फक्त चेंडू कडे बघतच होता संघाला एकदाही संधी मिळत नव्हते 11 ते 15 ओवेर्स मध्ये हैदराबाद संघाचा स्कोर थोडासा संथ झाला होता परंतु 15 ओव्हर नंतर संघाने पुन्हा फटकेबाजी केली आणि संघाचा स्कोर वाढता ठेवला मारकरम आणि क्लासेन यांनी मुंबई संघासाठी एकही संधी दिली नाही व दोघांनी तुफान फटकेबाजी चालूच ठेवले.
मारकरम आणि क्लासेन :- या दोघांनी फक्त 55 चेंडूंमध्ये 116 धावा केल्या मार्करने 28 चेंडूंमध्ये 42 धावा करत 1 षटकार आणि 2 चौकार लगावले तर दुसऱ्या बाजूने क्लासेन यांनी 34 चेंडू मध्ये 80 धावा केल्या यामध्ये सात मोठे षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे वीस ओवर मध्ये हैदराबाद संघाने 270 धावा केल्या त्या बदल्या त्यांनी 3 गडी गमावले.यापूर्वी सर्वाधिक स्कोर हा RCB संघाने केला होता आरसीबी संघाने 263 धावा केल्या होत्या परंतु हा विक्रम मोडीस काढत हैदराबाद संघाने 277 धावांचा डोंगर उभा केला आरसीबी संघाचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हादराबाद संघाने अकरा वर्षानंतर मोडीत काढला हैदराबाद संघासाठी घरचे मैदान असल्याने आणि फलंदाजीसाठी अनुकूल असे मैदान असल्याकारणाने संघाने संधीचा फायदा घेत आक्रमक खेळी केली.
मुंबई संघाला विजयासाठी 278 गावांचे मोठे आव्हान हैदराबाद संघाने उभे केले मुंबई इंडियन्स संघासाठी हे आव्हान सोपे नव्हते.कारण हैदराबाद संघाकडे अनुभवी असे गोलंदाज होते हैदराबाद संघाकडे भुवनेश्वर कुमार जयदेव उनदकट, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, उमरान मलिक, मयंक मार्कंडे असे गोलंदाज होते मुंबई इंडियन्स संघाला कुठलाही वेळ न घालवता सुरुवातीपासूनच जोरदार फलंदाजी करावी लागणार होती.
MI vs SRH IPL 2024 Result :- मुंबई इंडियन्स संघाची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि ईशान किशन मैदानात उतरली आणि दोघांनी जोरदार सुरुवात देखील केली परंतु ईशान किशन हा शहाबाद अहमदच्या गोलंदाजीवर मार्करांच्या हाती झेल देत बाद झाला त्याने 13 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या आणि 4 षटकार आणि 2 चौकार लगावले या दोघांनी सलामीला येऊन संघासाठी 56 धावांची भागीदारी केली त्यानंतर रोहित शर्माच्या साथीला नमंन धीर हा युवा फलंदाज आला आणि त्याने देखील सुरुवात चांगली केली परंतु रोहित शर्मा हा चुकीच्या शॉट मुळे अभिषेक शर्माच्या हाती झेल देत बाद झाला’
रोहित शर्मा :- ची विकेट हैदराबाद संघाचा कप्तान पेट कमीन्स याने घेतली रोहित शर्मा ने 12 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या आणि 3 षटकार आणि 1 चौकार लगावला रोहित शर्मा बाद झाला तेव्हा संघाचा स्कोर 66 धावा 2 बाद असे होते त्या नंतर नमंन धीर च्या साथीला तिलक वर्मा हा आला आणि दोघांनी चांगली खेळी केली. मुंबई इंडियन्स देखील आक्रमकपणे खेळत असल्याने मुंबई इंडियन्स संघ 278 धावांचे आव्हान सहजपणे पार करेल असे वाटत होते.
MI vs SRH IPL 2024 Result तिलक वर्माने देखील जोरदार सुरुवात केली तिलक वर्मा कुठलाही वेळ न घालवता तुफान फटकेबाजी करत होता तिलक वर्मा हा मोठमोठे षटकार लगावत संघासाठी मोठे योगदान देत होता. नमनधीर आणि तिलक वर्मा या दोघांनी मुंबई इंडियन्स संघासाठी 84 धावांची भागीदारी केली आणि ती फक्त 37 चेंडूंमध्ये मुंबई इंडियन्स संघाने देखील आपले इरादे स्पष्ट करत केवळ 10 ओवरमध्ये 150 धावांचा पल्ला गाठला.
नमनधीर हा जयदेवच्या गोलंदाजीवर पेट कमिंग च्या हाती झेल देत बाद झाला :- नमन धीर यांनी 14 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे तिलक वर्माच्या साथीला मुंबई इंडियन्स संघाचा कप्तान हार्दिक पांड्या हा आला हार्दिक पांड्याने सुरुवातीपासूनच मोठमोठे टोले लगावले त्यानंतर तिलक वर्मा बाद झाला लक वर्मा 34 चेंडू मध्ये 64 धावा केल्या यामध्ये त्याने 6 उत्तुंग षटकार लगावले आणि यामध्ये 2 चौकारांचा देखील समावेश आहे तो बाद झाला तेव्हा संघाचा स्कोर 182 धावा आणि 14 ओवर असे होते.
तिलक वर्मा :- रूपात संघाची चौथी विकेट पडली आणि हार्दिक पांड्या च्या साथीला टीम देवीड हा आला मुंबई इंडियन्स संघाला 36 चेंडूंमध्ये शंभर धावांची गरज होती टीम डेविड ने हार्दिक पांड्याला चांगली साथ दिली टीम डेविड ने देखील मोठे टोले लगावले मुंबई इंडियन्स संघ प्रत्येक चेंडूवर मोठे धाव घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्यांचे प्रयत्न हे कमी पडले टीम डेविड ने मोठे षटकार लगावले होते परंतु हार्दिक पांड्याला चांगले टोले लगावण्यात यश येत नव्हते.
5 व्या विकेटच्या रूपात हार्दिक पांड्या हा बाद झाला :- संघाचे धाव धावफलक 224 असताना हार्दिक पांड्या बाद झाला. आता जिंकण्यासाठी बारा चेंडूंमध्ये 54 धावांची गरज होती सहाव्या क्रमांकावर आलेला रोमारिओ शेफर्ड यांनेही मोठे टोले लावण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही फलंदाजांचे प्रयत्न अपुरे पडले आणि मुंबई इंडियन्स संघाला 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
टीम डेविड ने 22 चेंडूंमध्ये 42 धावा केल्या :- यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे आणि रोमारीऑ शेफर्ड यांनी 6 चेंडूमध्ये 15 धावा केल्यायामध्ये 1 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे एवढे मोठे आव्हान देखील मुंबई इंडियन्स संघ सहजपणे पार करेल असेल एक वेळेस वाटत होते.MI vs SRH IPL 2024 Result परंतु हैदराबाद संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला आणि हैदराबाद संघाने आपला पहिला विजय मिळविला तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा कप्तान असलेला हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली संघाला सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला आहे.
FAQ’s :-
- हा सामना मुंबई इंडियन्स किती धावांनी पराभूत झाली ?
हा सामना मुंबई इंडियन्स 31 धावांनी पराभूत झाले
- या सामन्यात एकूण किती षटकार लावल्या गेले ?
या सामन्यात एकूण 38 षटकार लावले गेले
- सनरायझर हैदराबादने किती धावांची लक्ष उभे केले ?
सनरायझर हैदराबादने मुंबई समोर जिंकण्यासाठी 278 गावांचे लक्ष उभे केले
- सनरायझर हैदराबादच्या एकूण किती विकेट गेल्या ?
सनरायझर्स हैदराबादचे एकूण तीन विकेट गेल्या होत्या
- सनरायझर्स चा कप्तान कोण आहे ?
सनरायझर्स हैदराबादचा कप्तान पॅट कमीन्स आहे
- रोहित शर्मा चा हा आयपीएल मधील कितवा सामना आहे ?
रोहित शर्मा चा हा आयपीएल मधील दोनशे वा सामना आहे
- मुंबई इंडिया संघाचा कप्तान कोण आहे ?
मुंबई इंडियन संघाचा कप्तान हार्दिक पांडे आहे
- नाणी फेक कोणत्या संघाने जिंकली होती ?
मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकली होती.