Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : माझी लाडकी बहीण योजने मध्ये महिलांना मिळणार 1500/- रुपये प्रति महिना, जाणून घ्या अर्ज कसा भरायचा

Table of Contents

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : माझी लाडकी बहीण योजने मध्ये महिलांना मिळणार 1500/- रुपये प्रति महिना, जाणून घ्या अर्ज कसा भरायचा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्र राज्यातील सर्वेनुसार राज्यात पुरुषांची रोजगारी ही 59 % आहे तर स्त्रियांची रोजगारी ही 29 % आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन योजना राबविले आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) राज्य सरकार हे महिलांसाठी अनेक नवीन योजना राबवित असते त्यापैकी ही एक योजना आहे. या योजनेमध्ये महिलांना आर्थिक दृष्ट्या मदत करणे हे सरकारचे उद्देश असणार आहे. महिलांना आरोग्य व पोषण आणि त्याना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

माझी लाडकी बहीण योजना काय आहे ? 

माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकार द्वारे महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना प्रति महा 1500/- रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांचे उत्पन्न हे 250000 /- रु कमी असणे आवश्यक आहेत. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) महाराष्ट्र सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पानुसार माझी लाडकी बहीण योजना राबविण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबातील महिलांना प्रति महिना 1500 /- रुपये देण्यात येणार आहेत. या महिला स्वावलंबी करण्यासाठी सरकारचे उद्देश असणार आहे. 

या योजने संदर्भात संपूर्ण माहिती घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही महाराष्ट्र सरकारने पात्रता व अटी दिले आहे. त्या पात्रता व अटी जाणून घेणे महत्त्व चे आहे. त्याचबरोबर आवश्यक असणारी कागदपत्रे हे सुद्धा लागणार आहेत. या लेखामध्ये आज आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेऊया या योजनेची पात्रता काय आहे. आवश्यक असणारी कागदपत्रे, तसेच योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात आपण या लेखात बघुयात. 

या योजनेचा हेतू

  • राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करणे 
  • राज्यातील महिलांना आर्थिक मदत करून रोजगार निर्मितीसाठी संधी उपलब्ध करून देणे. 
  • महिला आणि महिलांच्या मुलांचे आरोग्य आणि पोषण यामध्ये सुधारणा व्हावी. 

माझी लाडकी बहीण या योजनेचे स्वरूप 

राज्य सरकारने दिलेल्या कालावधीमध्ये पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर दरमहा रुपये 1500 /- इतकी रक्कम जमा होईल. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) जर ती महिला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर काही योजनेचा लाभ घेत असेल आणि त्या योजनेची रक्कम ही 1500 पेक्षा कमी असेल तर त्या फरकाची रक्कम योजनेद्वारे पात्र महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी असणाऱ्या लाभार्थी ची वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील सर्व महिला, विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार त्या  महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

कोणत्या पात्र महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता? 

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यात रहिवासी असणे आवश्यक आहेत. 
  • महाराष्ट्र राज्यातील विधवा विवाहित घटस्फोटीत निराधार महिला. 
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांचे वय हे किमान 21 वर्षे पूर्ण व कमाल 60 वर्ष असणे आवश्यक आहे. 
  • लाभार्थी महिलेचे बँक मध्ये अकाउंट असणे गरजेचे आहे. 
  • लाभार्थी महिलाचे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 250000 जास्त नसावे.

अपात्रता या महिला अपात्र राहतील 

  • ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) म्हणजेच ज्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर ते कुटुंब या योजनेसाठी अपात्र राहील. 
  • ज्या कुटुंबातील सदस्य कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार किंवा राज्य सरकार या संस्थेमध्ये कार्य करत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत असेल तर ते कुटुंब या योजनेसाठी अपात्र राहणार आहेत. 
  • लाभ घेणाऱ्या महिलेने शासनाच्या इतर कोणत्याही योजनेद्वारे 1500/- रुपये पेक्षा जास्त प्रतिमा हा लाभ घेतलेला असेल.
  • ज्या कुटुंबातील सदस्य वर्तमान किंवा माझी खासदार किंवा आमदार असेल तर त्या कुटुंबालाही योजनेचा लाभ घेता येणार नाही. 
  • ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांची एकत्रित जमीन ही पाच एकरापेक्षा जास्त असेल तर त्या कुटुंबालाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 
  • ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहेत (ट्रॅक्टर व्यतिरिक्त) आणि ते चार चाकी वाहन कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी कृत आहे. त्यांच्या कुटुंबाला देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे 

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे. 
  • लाभार्थी महिलेचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी दाखला किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. 
  • सक्षम प्राधिकारी अधिकारी यांनी दिलेला कुटुंबातील सदस्याचा उत्पन्नाचा दाखला. 
  • उत्पन्न दाखल्यामध्ये वार्षिक उत्पन्न 250000 रु च्या आत असणे अनिवार्य आहे. 
  • बँक खाते पासबुक च्या पहिल्या पानाची कॉपी/ झेरॉक्स.
  • पासपोर्ट साईज चे दोन फोटो. 
  • रेशन कार्ड आणि रेशन कार्ड चे झेरॉक्स 
  • दिलेल्या अटी व नियमाचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. 

अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • अर्ज करण्यासाठी पोर्टल मोबाईल ॲप सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरले जाऊ शकतात 
  • पात्र महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. 
  • ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येणार नाही त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची लेखी सुविधा उपलब्ध आहे.(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) ही सुविधा अंगणवाडी बाल विकास प्रकल्प कार्यालय ग्रामपंचायत सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असणार आहे. 
  • भरलेला अर्ज हा अंगणवाडी, बालविकास, सेतू सुविधा केंद्र यामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन भरण्यात येईल अर्ज ऑनलाईन यशस्वीरित्या भरला गेल्यानंतर त्याची पोचपावती मिळेल. 
  • अर्ज भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी/रक्कम नाही लागणार. 
  • अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेला त्या ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे. फॉर्म भरताना लाभार्थी महिलेचा फोटो काढण्यासाठी आणि E-KYC करण्यासाठी महिलेला तिथे उपस्थित असणे आवश्यक आहे. 
तात्पुरती यादी 

अर्ज भरल्यानंतर जे अर्जदार प्राप्त असतील त्यांची पोर्टलवर तात्पुरती यादी जाहीर करण्यात येईल. त्याची प्रत अंगणवाडी ग्रामपंचायत येथे सूचना फलकावर लावण्यात येईल. 

आक्षेप असल्यास 

जाहीर झालेल्या यादीवर जर काही आक्षेप असल्यास त्यासाठी अंगणवाडी सेतू सुविधा केंद्र येथे लेखी हरकत नोंदविता येईल. लेखी हरकत प्राप्त झाल्यानंतर रजिस्टरमध्ये नोंद करण्यात येईल.(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) आणि ती ऑनलाईन अपलोड करण्यात येईल पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केल्याच्या तारखेपासून पाच दिवसांपर्यंत हरकत नोंदविणे आवश्यक आहे. 

अंतिम यादी 

समिती मार्फत हरकतीचे निराकरण करण्यात येईल पात्र लाभार्थ्यांची यादी ही तयार केल्यानंतर ती अंगणवाडी ग्रामपंचायत सुविधा केंद्र येथे जाहीर करण्यात येईल. पात्र यादीमध्ये लाभार्थी महिलेचा मृत्यू झाल्यास सदर महिलेचे नाव त्या यादीतून वगळण्यात येईल. 

लाभलेल्या रकमेचे वाटप 

पात्र असणाऱ्या महिलेच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत ही रक्कम बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. 

हे देखील वाचा: MG Comet EV : फक्त 11000 रुपयांमध्ये  घरी घेऊन जा हि कार ! देशातील सर्वात छोटी इलेक्ट्रिक  कार

माझी लाडकी बहीण पूर्ण योजने साठी लागणारा कार्य काल 

  • माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र मध्ये 1 जुलैपासून सुरू होणार आहे. लाभार्थी महिला 1  जुलैपासून अर्ज भरू शकणार आहे. अर्ज भरण्यासाठी 1 जुलै ते 15 जुलै हा कार्यकाल असणार आहे. 15 जुलै ही शेवटची तारीख असणार आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024)या तारखे मध्ये अर्ज भरणे गरजेचे असणार आहे. 
  • अर्ज भरल्यानंतर पात्र महिलांची तात्पुरती यादी ही 16 तारखेला जाहीर करण्यात येईल. ही यादी ऑनलाईन पोर्टलवर, मोबाईल ॲप, ग्रामपंचायत सूचनाफलक, अंगणवाडी येथे सादर करण्यात येईल. 
  • प्राप्त झालेल्या यादीमध्ये हरकत किंवा तक्रार करायची असल्यास त्याचा कार्यकाल हा महाराष्ट्र सरकारने 16 जुलै ते 20 जुलै दरम्यान दिलेला आहे. या पाच दिवसांमध्ये लाभार्थी महिलेला प्राप्त झालेल्या यादीमध्ये तक्रार असल्यास ती महिला या पाच दिवसांमध्ये आपले हरकत अर्ज भरू शकते. 
  • लाभार्थी महिलेंनी तक्रार जाहीर केल्यानंतर 21 जुलै ते 30 जुलै दरम्यान या तक्रारीचे निराकरण करण्यात येईल. या 10 दिवसांमध्ये प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे निराकरण होणार आहे. 
  • तक्रारीचे निराकरण केल्यानंतर राज्य सरकार हे अंतिम यादी 1 ऑगस्ट या तारखेला जाहीर करेल. ही अंतिम यादी आपण ऑनलाइन पोर्टलवर, मोबाईल ॲप, अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत फलकावर बघू शकतात. अंतिम यादी ही सर्व तक्रारींचे निराकरण करून प्राप्त झालेली असेल. 
  • अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर लाभार्थी महिलांचे बँकेमध्ये E-KYC करण्यात येईल त्याचा कार्यकाल हा 10 दिवसांचा असणार आहे. 10 ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिला यांचे E-KYC करण्यात येईल. 
  • E-KYC झाल्यानंतर लाभार्थी महिलांचे निधी हस्तांतरण हे 14 ऑगस्टला करण्यात येईल. 
  • निधी हस्तांतरण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला लाभार्थी महिलेच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.

हे देखील वाचा: T-20 World Cup Winner List : आत्तापर्यंतच्या सर्व T-20 विश्वचषक विजेत्यांची यादी

माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सरकारला किती खर्च येणार 

(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी महिलांना दर महिन्याला 1500 /- रुपये ची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. त्यासाठी काही नियम व अटी दिलेल्या आहे. ज्या की आपण वर बघितल्या आहेत. या अटींमधून ज्या महिला पात्र असतील त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. 

हे देखील वाचा : Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update : माझी लाडकी बहीण योजने मध्ये झाले मोठे बदल, जाणून घ्या

या योजनेद्वारे राज्य सरकारला प्रतिवर्षी अंदाजे 46 कोटी रुपये खर्च येऊ शकतो. त्यासाठी महाराष्ट्र सरकार हे अर्थसंकल्पात तशी तरतूद करणार आहे. या योजनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प भाषणात सांगितले होते.

माझी लाडकी बहीण या योजनेसाठी राज्य सरकारला किती खर्च येणार आहे?(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024)

माझी लाडकी बहीण या योजनेसाठी राज्य सरकारला अंदाजे 46 कोटी रु खर्च येणार आहे.

माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लाभार्थी महिलेचे वयोमर्यादा किती आहे?

(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लाभार्थी महिलेचे वयोमर्यादा 21 ते 60 वर्ष आहे. 

माझी लाडकी बहीण ही योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे ?

माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे. 

माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न किती असणे आवश्यक आहे?

माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न 250000/- रु च्या आत असणे आवश्यक आहे. 

माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला किती रुपयाचा लाभ होणार आहे?

माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला प्रतीमहा 1500/- रु चा लाभ होणार आहे. 

माझी लाडकी बहीण ही योजना कधी लागू होणार आहे?

माझी लाडकी बहीण ही योजना 1 जुलै पासून लागू होणार आहे.

Spread the love