Site icon Get In Marathi

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update : माझी लाडकी बहीण योजने मध्ये झाले मोठे बदल, जाणून घ्या

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update : माझी लाडकी बहीण योजने मध्ये झाले मोठे बदल, जाणून घ्या

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता खूप मोठे बदल झाले आहे. या योजनेची अर्ज करण्याची सुरुवात ही 1 जुलैपासून झाली होती. या योजनेची मुदत 1 जुलैपासून 15 जुलै पर्यंत ठेवण्यात आलेली होती. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update) परंतु आता सरकारने यात बदल करत या योजनेची अर्ज भरण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे. आता लाभार्थी महिला हा अर्ज 31 ऑगस्ट 2024 पर्यंत भरू शकनार आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update या योजनेसाठी महिलांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि लाभार्थ्यांना सामोरे जाऊ लागणाऱ्या अनेक अडचणींना लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना प्रतिमहा 1500/- रुपये राज्य सरकारकडून मिळणार आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने अटी व नियम लागू केले आहे. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना आवश्यक असणारे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आता मुदतवाढ करण्यात आलेली आहे.त्याच बरोबर राज्य सरकारने आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये देखील नियम कमी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकारने मुदत वाढ करण्याचे घोषित केले आहे. सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने 15 दिवसांची मुदत दिली होती. परंतु या योजनेला प्रचंड असा प्रतिसाद महिलांकडून लाभत आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update) आणि या योजनेची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे हे घेण्यासाठी महिला वर्ग हा प्रचंड संख्येने शासकीय कार्यालया मध्ये जमा होत आहे. एकाच वेळेस जास्त गर्दी झाल्याने प्रत्येक लाभार्थी महिलेला आवश्यक असणारे कागदपात्रांची ची पूर्तता करणे अवघड झाले आहे.

15 दिवसांमध्ये सर्व कागदपत्रे जमा करणे हे कठीण आहे. सध्या 2024 च्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असल्याने विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने शासकीय कार्यालयांमध्ये आपले कागदपत्रे घेण्यासाठी आलेले असतात. एकाच वेळी शासकीय कार्यालयांवर आलेला प्रचंड कामाचा प्रभाव लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात मुदतवाढीची घोषणा विधानसभेत केली आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सरकारने अनेक बदल करण्याचे घोषित केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना भरपूर साऱ्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. परंतु एवढे सारे कागदपत्र जमा करणे हे कठीण आहे आणि त्यासाठी शासकीय कार्यालयांवर खूप सारे कामाचे प्रेशर वाढले आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update) शासकीय कर्मचाऱ्यांकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रचंड महिलांची गर्दी दिसायला मिळत आहे. यावर पर्याय म्हणून महाराष्ट्र सरकारने आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये देखील आता सवलत दिली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल या कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयासमोर खूपच मोठी गर्दी झाली होती. यावर सरकारने निर्णय घेत या दोन्ही कागदपत्रांची अट ही शितल केली आहे. आता या कागदपत्रांमध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट जर नसेल तर त्या ऐवजी पंधरा वर्षे जुनी रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र हे कागदपत्रे देता येतील.

आणि दुसरे कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला आता जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्या ऐवजी पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. आता या दोन कागदपत्रांवर दिलेल्या सवलतीमुळे खूप सारी गर्दी ही शासकीय कार्यालय समोर होणार नाही. आणि लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ हा सहजपणे घेता येईल. आणि आता कागदपत्रांची पूर्तता करण्याची तारीख देखील 31 ऑगस्ट पर्यंत वाढविली आहे.

(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update) तहसील कार्यालयासमोर असणारी गर्दी यावरून विरोधी पक्षाने सरकारवर टीका करत विधानसभेत गदारोळ केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घेत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांवर मोठी सवलत दिली आहे. 2024 चा अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला होता.

या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रतिमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने अनेक नियम अटी व पात्रता लावलेल्या आहे. परंतु आता सरकारने या योजनेमध्ये मोठे बदल केले आहे. चला तर जाणून घेऊयात कोणते बदल या योजनेत करण्यात आले आहे. 

योजनत करण्यात आलेले महत्वाचे बदल

  1. सुरुवातीला माझी लाडकी बहीण योजनेच्या GR नुसार आवश्यक कागदपत्रांमध्ये उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक होते. परंतु जर लाभार्थी महिलाकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update) जर हे रेशन कार्ड असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र असेल. 
  2. या योजनेअंतर्गत कुटुंबातील 1 अविवाहित महिलेला देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 
  3. महिलेचा परराज्यात जन्म झाला असेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तिच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र हे कागदपत्रे आवश्यक आहे.
  4. यापूर्वीच्या अटीमध्ये 5 एकर शेतीची अट ठेवण्यात आली होती. परंतु नवीन बदलानुसार आता 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे. 
  5. पूर्वी जाहीर झालेल्या योजनेत लाभार्थी महिलेचे वयाची अट ही 21 वर्ष ते 60 वर्ष हे ठेवण्यात आले होते. परंतु नवीन बदलानुसार हे वय वर्ष आता 21 वर्ष ते 65 वर्ष असे करण्यात आले आहे. 
  6. माझी लाडकी बहीण योजना या योजनेची मुदती 1 जुलै ते 15 जुलै पर्यंत देण्यात आलेली होती. परंतु आता यामध्ये सुधारणा करत महाराष्ट्र सरकारने मुदत वाढ केलेली आहे. नवीन बदलला नुसार आता ही मुदत वाढ आता 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे. लाभार्थी महिला ही आता 1 जुलै ते 31 ऑगस्ट या दरम्यान माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करू शकते. 
  7. पूर्वीच्या नियमानुसार या योजनेमध्ये पात्र असण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक होते. परंतु आता या योजनेत बदल करण्यात आला असून अधिवास प्रमाणपत्र नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचे जुने रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला या चार पैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे गरजेचे आहे. 

माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑनलाईन कसा करायचा

हे देखील वाचा : Mazi Ladki Bahin Yojana 2024 : या तारखेला जमा होणार पहिला हप्ता, माझी लाडकी बहीण योजना

या योजनेचा अर्ज ऑफलाइन कसा करायचा 

लाभार्थी महिला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत नसेल तर त्यासाठी राज्य सरकारने ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गाव पातळी वरील महिलांनी अर्ज हा भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हा अर्ज अंगणवाडीतील सेविकांकडे जमा करायचा आहे. किंवा ग्रामपंचायत मध्ये हा अर्ज भरून जमा करायचा आहे. तालुका तालुकास्तरावर लाभार्थी महिलांनी हा फॉर्म भरून त्यासोबतचे आवश्यक असणारे कागदपत्रे हे नगरपरिषद किंवा नगरपंचायत येथे जमा करायचे आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता. 

  1. लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  2. महाराष्ट्र राज्यातील विवाहित, घटस्फोटीत विधवा आणि निराधार महिला या योजनेच्या लाभसाठी पात्र असतील. 
  3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय हे 21 वर्ष ते 65 वर्ष च्या आत असणे आवश्यक आहे.
  4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे बँकेमध्ये अकाउंट असणे गरजेचे आहे. 
  5. लाभार्थी महिलेकडे स्वतःचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. 

हे देखील वाचा : IND VS ZIM : झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव, भारतीय युवा खेळाडूंकडून निराशा जनक कामगिरी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण असेल अपात्र

  1. कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहे. 
  2. ज्या कुटुंबातील व्यक्ती हा आयकर भरत असेल म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबातील महिला देखील अपात्र असेल.
  3. ज्या कुटुंबातील व्यक्ती नियमित, कायमस्वरूपी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, राज्य सरकार किंवा भारत सरकार या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत असेल. किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तर त्या कुटुंबातील महिला देखील या योजनेसाठी अपात्र असणार आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update)
  4. ज्या महिलेने भारत सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या इतर कोणत्याही सरकारी योजनेतून जर 1500 पेक्षा अधिक रकमेचा लाभ घेतला असेल तर ती महिला देखील या योजनेसाठी अपात्र राहील. 
  5. ज्या कुटुंबातील सदस्य वर्तमान किंवा माजी खासदार किंवा आमदार असेल तर ती महिला देखील अपात्र असेल. 
  6. ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर व्यतिरिक्त) असेल तर त्या कुटुंबातील महिला देखील या योजनेसाठी अपात्र असणार आहे.

हे देखील वाचा : Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : महिलांना मिळणार 1500/- रुपये प्रति महिना, जाणून घ्या अर्ज कसा भरायचा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे उद्देश 

महाराष्ट्र सरकारचे महिलांसाठी अनेक योजना आहे. त्यापैकी हि एक योजना असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारचे उद्देश आहे की महिलांना आरोग्य व पोषण आणि त्यांचे आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झाली पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्या सर्वेनुसार महाराष्ट्र राज्यातील महिलांची रोजगाराची टक्केवारी ही पुरुषांपेक्षा कमी आहे त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update) राज्यातील महिलांचे आर्थिक, आरोग्य आणि पोषण यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.

त्यासाठी राज्य सरकारने हे एक मोठे पाऊल उचलत महाराष्ट्रातील गरजू महिलांना आर्थिक परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी ही योजना राबविली आहे. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य देखील सुधारण्यात मदत होऊ शकते.

त्याचबरोबर महिला या स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होतील. या योजनेद्वारे लाभार्थी महिलेला तिच्या आधार कार्ड वर लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये प्रति महिन्याला 1500/- रुपये इतकी रक्कम जमा होणार आहे. या योजनेचा लाभ हा 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना होणार आहे. त्याचबरोबर विधवा, विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत आणि निराधार महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

हे देखील वाचा : MG Comet EV Mileage : हि कार एक चार्ज मध्ये देते एवढे मायलेज, वारंवार चार्ज करण्याची गरज नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी वयाची किती अट आहे? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी वयाची 21 वर्ष ते 65 वर्ष अट आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अर्ज भरण्याची अंतिम मुदत किती आहे?

या योजनेची अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न किती असणे आवश्यक आहे?

या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना किती रुपयांची आर्थिक मदत होईल?

या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत होईल. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना केव्हा सुरू झाली आहे?

ही योजना 1 जुलै पासून सुरू झाली आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत नवीन बदल कोणते झाले आहे ?

या योजनेत वयाची अट वाढविण्यात आली आहे,कागदपत्रांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज कशाप्रकारे भरता येऊ शकतो?

या योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे भरता येऊ शकतो.

Spread the love
Exit mobile version