Namo Shetkari 4th Installment : नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
Namo Shetkari 4th Installment : महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्यातील सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत चौथा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. आणि यामुळे आता शेतकऱ्यांना खरीप हंगामात या त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. राज्य सरकारच्या वतीने हा हप्ता अचानकपणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे.
Namo Shetkari 4th Installment : दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी परळी येथे कृषी विषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय कृषी मंत्री आणि राज्य कृषी मंत्री हे उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थिती दरम्यान हा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आजच आणि आत्ताच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित होणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
योजनेचे नाव | नमो शेतकरी महासन्मान योजना महाराष्ट्र |
लाभार्थी शेतकरी संख्या | 1 कोटी शेतकरी |
एकूण वितरीत निधी | 2063 कोटी |
4 था हप्ता वितरण तारीख | 21 ऑगस्ट 2024 |
योजना विभाग | कृषी व महसूल विभाग |
शेतकऱ्यांना आर्थीक सहाय्य करण्यासाठी सरकारने पी एम किसान योजना (PM Kisan Yojana) सोबतच नमो किसान योजना (PM Kisan Yojana) सुरू केलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी 2023 साली करण्यात आलेली आहे. नमो शेतकरी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पीएम किसान योजने सारखेच 6000/- रुपये बँक खात्यात जमा करण्यात येतात आणि या योजनेचा चौथा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा झालेला आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी ही अधिकृत वेबसाईटवर बघता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडालेला आहे. पण तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे की पीएम किसान योजनेसाठी पात्र असणारे शेतकरी हे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेला देखील पात्र असणार आहे. म्हणजेच पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी हीच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.
त्यामुळे तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. या योजनेची लाभार्थी यादी बघण्यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बेनीफिशरी पर्याय निवडून यामध्ये तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि तुमचे गाव निवडून या योजने ची लाभार्थी यादी सहजपणे पाहू शकतात.
नमो शेतकरी महा सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अचानक वितरीत झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Namo Shetkari 4th Installment) या योजनेच्या निधी दरम्यान 2000/- रुपये जमा झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या भांडवलासाठी देखील या पैशाचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी कार्यक्रमात या हप्त्याची घोषणा केली.
आणि त्यांनी या कार्यक्रमादरम्यान रिमोटचे बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात करून दिली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात 2000/- रुपये जमा झाले असून दोन दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000/- रुपये जमा होणार आहे.
नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी स्टेटस बघण्यासाठी तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमची माहिती तेथे भरून लॉगिन करून घ्यायचे आहे. आणि मग तुम्हाला तेथे तुमच्या कोणत्या बँक मध्ये पैसे जमा झाले आहे, ही सर्व माहिती तेथे बघायला मिळणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप बाबत एक दिवसा पूर्वीच नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर अपडेट आले होते. यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पैसे जमा होणार अशी माहिती देण्यात आलेली होती. आणि त्यानुसार योजनेचा निधी वाटप करण्यास सुरुवात देखील झालेली होती. त्यामुळे या योजनेचा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असे बोलले जात होते.
(Namo Shetkari 4th Installment) परळी येथे झालेल्या कृषी विषयक कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण, राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे मुख्यमंत्री अजित पवार, तसेच राज्य कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि इतर मान्यवर या कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करत राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित होण्यासाठी लगेच सुरुवात देखील झालेली असून बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झालेला आहे. (Namo Shetkari 4th Installment) नमो शेतकरी योजनेचा हा चौथा हप्ता असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000/- रुपये जमा होणार आहे. नुकतीच नवीन योजना सुरू असलेल्या माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे देखील महिलांच्या बँकेत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबतच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक मध्ये जमा झाल्याने शेतकऱ्यांनी मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हे देखील वाचा : Ola Roadster Bike : अखेर OLA ची Bike लॉंच, अगदी कमी कींमत मध्ये 579 km ची रेंज देणार