Nandgaon Market : आता नांदगाव तालुक्यात या नवीन ठिकाणी होणार शेतीमालाचा लिलाव
Nandgaon Market :
Nandgaon Market : नांदगाव तालुक्यातील वेहळगाव गणातील शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी नांदगव बाजार पेठेत यावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असे, या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या भागात बाजारपेठ सुरू व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि आता वेहळगाव येथे शेतीमालाचा लिलाव तथा बाजार भराविण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती नांदगाव नवनिर्वाचित सभापती सतीश बोरसे यांनी दिली आहे.
वेहळगाव येथे शेतीमालास लिलाव विक्री सुरू झाल्यास त्या भागातील सुमारे 20 गावांना या बाजारपेठेचा फायदा होणार आहे. वेहळगाव भागात शेतमालासाठी बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असे आता बाजार समितीच्या निर्णयाने या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. वेहळगाव येथील ग्रामपंचायत समितीने या बाजारपेठेसाठी तब्बल 5 हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे.
या नवीन बाजारपेठेबद्दल बोलताना सभापती सतीश बोरसे यांनी सांगितले की वेहळगाव येथे बाजार समिती सुरू करण्यात यावी अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी होती. तसेच वेहळगाव येथील ग्रामपंचायत ने त्यांच्या मालकीची 5 हेक्टर जागा देखील उपलब्ध करून दिली. याबाबत ग्रामपंचायत सरपंच सौ वर्षा प्रमोद भाबड, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच फेडरेशनचे संचालक नांदगाव बाजार समितीचे माजी उपसभापती प्रमोद भाबड वेहळगाव येथील बाजार समितीचे संचालक पोपट सानप, ग्रामस्थांच्या सहकार्य मिळाल्याने ही खरेदी केंद्रास आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून तसेच जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी मंजुरी दिल्याची माहिती मिळत आहे.
(Nandgaon Market) या नवीन बाजारपेठेमुळे वेहळगाव येथील जवळपास 20 गावांना या बाजारपेठेचा फायदा होणार आहे. या बाजारपेठेमुळे परिसरातील कळमदरी, सावरगाव, पळाशी, जामदरी, मंगळने, आमोदे, मळगाव, बीरोळा, न्यू पांजण, मूळडोंगरी, रणखेडा, बिरोळा, चांदोरा, तळवाडे तसेच चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड, उंबरदे, सायगाव, नरडाणे या गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या भागात प्रामुख्याने मका आणि कांदा हा शेतमाल विक्रीस आणला जातो.
तसेच या खरेदीच्या केंद्राची मंजुरी प्रस्तावास ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, राजेश कवडे, विलास भाऊ आहेर, रामेश बोरसे, तेज कवडे समितीची उपसभापती दीपक मोरे, सचिव अमोल खैरनार यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे सहकार्य मिळालेले असून (Nandgaon Market) लवकरच खरेदी केंद्रा करिता वेहळगाव, पिलखोड या भागातील आणि इतर भागातील व्यापारी वर्गात खरेदीचा परवाना दिला जाणार असून, शेतमाल खरेदी केंद्राचे उद्घाटन नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच सभापती सतीश बोरसे हे म्हणाले की माझ्या कार्यकाळात वेहळगाव खरेदी केंद्रास सुरुवात होत असल्याने मला आनंद आहे.
हे देखील वाचा : Lek Ladki Yojana : या योजनेचा पण घ्या लाभ, मिळतील तब्बल 1 लाख रुपये