Site icon Get In Marathi

TATA Nexon CNG : आली आहे देशातील no 1 CNG कार, जाणून घ्या कींमत

TATA Nexon CNG : आली आहे देशातील no 1 CNG कार, जाणून घ्या कींमत

TATA Nexon CNG : टाटा कंपनीची देशभरात लोकप्रिय असणारी आणि सर्वात जास्त खप होणारी कार आता लवकरच सीएनजी मध्ये देखील लॉन्च होणार आहे. TATA कंपनी ही देशातील एकमेव कंपनी आहे. (TATA Nexon CNG) जिचे प्रत्येक महिन्याला सर्वाधिक कार ची विक्री होते. TATA कंपनीच्या कार या डिझाईन मध्ये आकर्षक असतात, त्याचबरोबर त्या सर्व सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणाऱ्या देखील असतात. TATA कंपनीच्या कार मजबूत असून त्या देशातील कुठल्याही भागात व्यवस्थितपणे पळू शकतात. देशातील या सर्वाधिक लोकप्रिय कार कंपनीने आता पुन्हा मार्केटमध्ये खळबळ उडून दिली आहे.

TATA Nexon CNG

(TATA Nexon CNG) कारण आता TATA ची सर्वात लोकप्रिय असणारी कार ही आता CNG मध्ये देखील लॉन्च होणार आहे. यापूर्वी ही कार फक्त पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिकल या व्हेरिएंट मध्येच उपलब्ध होती परंतु देशभरातील लाखो चाहते आणि प्रचंड होणारी विक्री हे लक्षात घेऊन कंपनीने आता हे मॉडेल CNG मध्ये देखील लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या कार शो दरम्यान TATA कंपनीने आपली Nexon CNG ही SUV कार उपलब्ध केली होती. बाकी मॉडेल प्रमाणे हे मॉडेल देखील आकर्षित करणारे आहे.

यापूर्वी TATA कंपनीच्या SUV मॉडेलमध्ये Punch, टीयागो आणि टिगोर या कार CNG वर्जन मध्ये उपलब्ध होत्या. तसेच आता कंपनीने चौथे SUV मॉडेल मार्केटमध्ये लॉन्च केले. TATA चे Nexon CNG हे मॉडेल 4 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असणार आहे. सध्या TATA कंपनीची Nexon इलेक्ट्रिक, डिझेल आणि पेट्रोल व्हेरिएंट मध्ये मार्केटमध्ये विक्री होत आहे. 

TATA Nexon CNG Engine पावर आणि ट्रान्समिशन 

TATA कंपनीच्या टियागो, टिगोर आणि Punch या कार मध्ये ट्वीन सिलेंडर इंजिन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला असून त्याच प्रकारचे इंजिन त्रज्ञानाचा वापर हा Nexon च्या CNG मॉडेल मध्ये करण्यात येणार आहे. Nexon चे हे इंजिन टर्बो चार्जर पेट्रोल इंजिन सोबत CNG किट देण्यात येणार आहे. इंजिनची क्षमता ही 1199CC इतकी असणार आहे. Nexon चे हे इंजिन 1.2 लीटरचे टरबो पेट्रोल इंजिन असून हे इंजिन 118 bhp आणि 170nm टोर्क जनरेट करू शकते.

या कार मध्ये आपल्याला ऑटोमॅटिक गेअर बॉक्स मिळणार नाही. ट्रान्समिशन मध्ये या कारमध्ये 5 स्पीड बॉक्स मिळण्याची शक्यता आहे. या कारमध्ये AMT गिअर बॉक्स चा वापर करण्यात येऊ शकतो. सध्या कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार हे मॉडेल मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये लॉन्च होणार आहे. परंतु जर TATA कंपनीने हे CNG मॉडेल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअर बॉक्स मध्ये देखील उपलब्ध केले तर ते ग्राहकांना आणखीनच आकर्षित करू शकते. 

TATA Nexon CNG Price कारची किंमत

TATA Nexon CNG ही कार 4 व्हेरिएंट मध्ये लॉन्च होणार आहे. कार मध्ये असणाऱ्या सुविधा त्यांच्यानुसार या कारचे 4 व्हेरिएंट असणार आहे आणि त्याचबरोबर त्या 4 ही व्हेरिएंट ची किंमत दिलेल्या सुविधा नुसार वेगळी असणार आहे मिळालेल्या माहितीनुसार या कारची किंमत 9.25 /- लाख रुपये पासून सुरू होणार आहे. या कारची ही किंमत एक्स शोरूम आहे. या 4 व्हेरिएंट मध्ये कंपनी आपले बेस्ट मॉडेल पासून टॉपचे मॉडेल मार्केटमध्ये उतरवील आणि त्यानुसार त्या सर्व मॉडेलची किंमत वेगळी असणार आहे. अचूक किंमत जाणून घेण्यासाठी जवळील डीलर ला भेट द्यावी.

TATA Nexon CNG Mileage कार चे मायलेज 

ही कार एक कॉम्पॅक्ट SUV असून या कार मध्ये आपल्याला पेट्रोल आणि CNG हे दोन ऑप्शन मिळणार आहेत. TATA च्या या नवीन CNG कारचे मायलेज 20 km/kg असणार आहे.

TATA Nexon CNG Variant कारचे व्हेरिएंट 

TATA कंपनीने यापूर्वी आपल्या तीन कॉम्पॅक्ट  SUV कार या CNG व्हेरिएंट मध्ये लॉन्च केल्या होत्या या तीनही मॉडेलला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आता कंपनी आपली सर्वात जास्त खप होणारे SUV कार CNG मध्ये लॉन्च करणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार TATA Nexon CNG हे मॉडेल 4 व्हेरिएंट मध्ये लॉन्च होणार आहे. या कारचे बेस मॉडेल हे मॅन्युअल गेअर बॉक्स ट्रान्समिशन वर कार्यरत असणार आहे. या कारचे टॉपचे व्हेरियंट हे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन वर उपलब्ध असू शकते. 

TATA Nexon CNG Launching Date लॉन्च केव्हा होणार? 

TATA Nexon CNG 2024 मध्ये सप्टेंबर या महिन्यांमध्ये लॉन्च होणार आहे. 2023 मध्ये TATA कंपनीने जाहीर केले होते.कंपनीने 2023 मध्ये सांगितले होते की 2024 च्या जून महिन्यामध्ये कार लॉन्च होणार आहे. परंतु आता नवीन मिळालेल्या अपडेट नुसार कंपनीने या कारची लॉन्चिंग हि सप्टेंबर महिन्यात ठेवली आहे. दिवाळी हा सण तोंडाशी असताना ही कार लॉन्च होणार आहे. त्यामुळे या कारला प्रचंड अशी मागणी उपलब्ध होऊ शकते.

TATA Nexon CNG Suspension कार मधील सस्पेन्शन 

TATA Nexon CNG या कार मध्ये आपल्याला पुढील चाकांसाठी इंडिपेंडेंट लोवर विष बोल म्याक फर्जंन विथ कॉइल स्प्रिंग हे सस्पेन्शन देण्यात आले आहे. तर मागील चाकांसाठी सेमी इंडिपेंडेंट स्टॅबिलायझर बार कॉइल स्क्रीन हे सस्पेन्शन दिलेले आहे. तसेच या कारमध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल प्रकाराची स्टेरिंग देण्यात आलेली आहे. या स्टेरिंग ला चालकाच्या गरजेनुसार ऍडजेस्ट करु शकतो. स्टेरिंग ला मागे, पुढे आणि वर, खाली देखील ऍडजेस्ट करता येऊ शकते. या कारची टर्निंग रेडियस ही 5.1 मीटर असणार आहे. या कार च्या पुढील चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहे. तर मागील चाकांसाठी ड्रम ब्रेक दिलेली आहे. तसेच या कारच्या सर्व चाकांची साईज ही 16 इंच असून सर्व चाक हे अलॉय व्हील चे असणार आहेत. 

TATA Nexon CNG Dimensions साईज 

TATA Nexon CNG ही एक कॉम्पॅक्ट कार असून तिची साईझ ही TATA Nexon कार प्रमाणे असणार आहे. या कारची लांबी ही 3995mm आहे, रुंदी 1804 mm आहे तर कारची उंची ही 1620 mm असणार आहे तसेच या कार मध्ये आपल्याला मागील बाजूस बूट स्पेस हा 382 लिटरचा मिळतो. या कारची सीटिंग कॅपॅसिटी 5 व्यक्तींची असणार आहे. तसेच जमिनीपासून या कारची उंची ही 208 mm एवढी आहे. या कारचा व्हील बेस हा 2498mm असणार आहे.

TATA Nexon CNG कम्फर्टेबल सुविधा 

या कार मध्ये खूप सारे अत्याधुनिक सुविधा देण्यात आलेल्या आहेत. कार मध्ये आपल्याला पावर स्टेरिंग दिलेले आहेत त्याचबरोबर मागील आणि पुढील काचा या पावर ऑपरेटेड आहे. तसेच कार मध्ये पावरफुल AC दिलेला आहे. चालकाचे सीट हे ऍडजेस्टेबल असणार आहे. या कारला व्हेंटिलेटर सीट देण्यात आलेले आहे तसेच कार मध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टीम दिलेली आहे ज्यामुळे कार मध्ये वातावरण हे नियंत्रित राहते.

हवेची गुणवत्ता योग्य ठेवण्यासाठी कारमध्ये एअर क्वालिटी कंट्रोल सिस्टीमचा वापर करण्यात आलेला आहे. कारला ॲक्सेसरीज पावर आउटलेट देण्यात आलेले आहे. व्हॅनिटी मिरर, रियर रीडिंग लॅम्प, रियर सीट अड्जेस्टेबल हेड रेस्ट, रियर क्रूज कंट्रोल, पार्किंग सेन्सर, किलेस एन्ट्री इंजिन स्टार्ट स्टॉप बटन, ग्लो बॉक्स, पेडल शिफ्ट, ऑटोमॅटिक हेड लॅम्प, फॉलो मी होम हेड लॅम्प अश्या अनेक सुविधा या कार मध्ये उपलब्ध आहेत.

TATA Nexon CNG Interior इंटेरियर 

या कारच्या डॅश बोर्डवर आपल्याला ट्याकोमीटर मिळते. तसेच डिजिटल ओडोमीटर, लेदर स्टेरिंग व्हील, ग्लो बॉक्स, स्टेरिंग व्हील, डिजिटल क्लस्टर, 3.24 इंच डिजिटल क्लस्टर, अशा अनेक सुविधा कार मध्ये देण्यात आलेल्या आहे. 

हे देखील वाचा : Hyundai Exter : हि आहे Hyundai ची जबरदस्त SUV कार, कींमत फक्त 6 लाख

TATA Nexon CNG Exterior एक्सटेरियर 

या कारचा बाहेरील लुक खूप आकर्षित करणारा असून कारला बाहेरून देखील खूप साऱ्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. या कारच्या समोर आपल्याला ऍडजेस्टेबल हेड लॅम्प देण्यात आलेले असून हे हेड लॅम्प एलईडी आहेत. तसेच एलईडी डीआरएल देखील देण्यात आलेले आहे. (TATA Nexon CNG) हेड लॅम्प च्या खाली डीफॉगर दिलेले आहेत कारच्या मागील टेल लाईट हे देखील एलईडी प्रकाराचे आहे. रेन सेंसिंग वायपर, रियर विंडो वायपर, रियर विंडो वॉशर आणि रियर विंडो डी फॉगर देखील उपलब्ध आहेत.

या कारचे सर्व व्हील हे अलॉय व्हील आहे. तसेच कारच्या पाठीमागे स्पायलर देखील देण्यात आले आहे आणि कारच्या वरती शार्क फिन एंटीना दिलेला आहे. कारच्या कॉर्नरला फॉग ल्याम्प देण्यात आलेले आहे. तसेच कारच्या वरती रुफरेल दिलेले आहे. या कारचे सनरूफ हे सिंगल पेन मध्ये उपलब्ध आहे. या कारचा सर्व चाकांची साईज ही 215/60R16 अशी आहे. कारचे सर्व टायर हे रेडियल ट्यूबलेस प्रकाराचे आहे. 

TATA Nexon CNG Safety सेफ्टी 

या कारमध्ये ABS ब्रेकिंग सिस्टम चा वापर करण्यात आलेला आहे. तसेच सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक्स, ड्रायव्हर एअर बॅग, पॅसेंजर एअरबॅग, डे नाईट रियर व्ह्यू मिरर, कर्टन एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन, सीट बेल्ट वार्निंग, डोअर अजर वार्निंग, इंजिन ईमोबालायझर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, रियर कॅमेरा अशा सुविधा या कारमध्ये उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा : IND Vs SL 3rd T20 Highlights : अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा लाजिरवाणा पराभव, सुपर ओव्हर मध्ये भारताने सामना जिंकला

Spread the love
Exit mobile version