Toyota HyRyder : मायलेज च्या बाबतीत हि आहे सर्वात Best Car, टोयोटा ची नवीन हायब्रीड कार, जाणून घ्या कींमत

Toyota HyRyder : मायलेज च्या बाबतीत हि आहे सर्वात Best Car, टोयोटा ची नवीन हायब्रीड कार, जाणून घ्या कींमत

Toyota HyRyder : Toyota कंपनीच्या कार आकर्षक असून त्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी साठी देशभरात ओळखल्या जातात. सध्याच्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर खूप वाढले असून आता बहुतेक कार ग्राहक हे आता Hybrid कार कडे वळाले आहे. देशभरात नाही तर जगभरात Hybrid कारची मागणी आता वाढत आहे.

Toyota HyRyder
Toyota HyRyder

Toyota HyRyder : Hybrid कार मायलेज जास्त तर देताच परंतु त्यामुळे प्रदूषण देखील कमी होते. इलेक्ट्रिकल वाहन पेक्षा Hybrid कार परवडणाऱ्या असतात Hybrid कार फक्त पेट्रोल व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे आणि त्यासोबतच इलेक्ट्रिकल पावर स्टोरेज करण्यासाठी अतिरिक्त बॅटरी दिलेली असते. त्यामध्ये इंजिन द्वारे तयार करण्यात आलेली पावर हि इलेक्ट्रिकल स्वरूपात बॅटरी मध्ये स्टोअर करून ठेवली जाते आणि ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी ची गरज पडते तेव्हा बॅटरी द्वारे सप्लाय कार ला देण्यात येतो. 

Toyota Hyryder Mileage मायलेज 

Hybrid कार मध्ये इलेक्ट्रिकल आणि इंजिन या 2 पावर चा वापर करण्यात आला आहे. ही कार जास्त मायलेज देते Toyota च्या Hyryder या कार सोबतच अजून Maruti Suzuki Grand Vitara ही कार देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहे. Toyota च्या Hyryder या कार मध्ये पेट्रोल इंजिनचा वापर करण्यात आलेला आहे. त्यासोबतच बॅटरी देखील दिलेली आहे. कंपनीच्या दाव्या नुसार Toyota Hyryder हि कार 28kmpl एवढे मायलेज देते.

ज्यावेळेस कारचा स्पीड जास्त असतो त्यावेळेस कार ही इंजिन द्वारे धावते आणि ज्यावेळेस कारचा स्पीड हा कमी होतो. त्यावेळेस बॅटरी च्या पावर चा वापर करून कार ही धावत असते. या दोन्ही पर्यायांमुळे कार जास्त मायलेज देते. या कार मधील इंधन टाकीची स्टोरेज करण्याची कॅपॅसिटी हि 45 लिटर इतकी आहे. तसेच या कारचा जास्तीत जास्त स्पीड हा 180 kmph इतका आहे. ही एक Hybrid कार असली तरी या कार मध्ये स्पीड हा जास्त दिलेला आहे. तसेच ही कार BS VI 2.0 या इमेशन नॉम्स वर आधारित आहे.

Toyota Hyryder Battery बॅटरी 

Toyota Hyryder ही एक हाईटेक कार आहे. या कार मध्ये इंजिन सोबत बॅटरीचा वापर करण्यात आलेला आहे. या कारमध्ये अतिरिक्त पावर साठी 0.76kwh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. ज्यावेळेस कार चालू होते तेव्हा सुरुवातीला कार इंजिनवर चालते. त्यावेळेस बॅटरी हि चार्जिंग होत असते. काही वेळ कार चालल्यानंतर बॅटरी ही पूर्ण चार्ज होते आणि चार्जिंग पूर्ण झाल्या नंतर कार हि ऑटोमॅटिक EV वर शिफ्ट होते. त्यावेळेस बॅटरी मध्ये स्टोअर केलेली पावर चा वापर करून कार ही धावते. त्यामुळे इंधन ची खपत कमी होते आणि कार जास्त मायलेज देते. 

Toyota Hyryder Price किंमत 

Toyota Hyryder कार ची किंमत Variant नुसार वेगळी आहे. या कार मधील Toyota Urban Cruiser Hyryder या बेस मॉडेल ची किंमत 13.90 /- लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत ही 25.19 /- लाख रुपये इतकी आहे. ही कार EMI वर देखील खरेदी करता येऊ शकते. कारच्या अचूक किंमत आणि EMI बद्दल जाणून घेण्यासाठी शेजारील कार डीलर ला भेट द्यावी.

Toyota Hyryder इंजिन 

Toyota Hyryder या कार मध्ये M15D-FXE या इंजिनचा वापर करण्यात आलेला आहे. हे एक पावरफुल Hybrid इंजिन आहे या इंजिनची क्षमता ही 1490 CC इतकी आहे. तसेच हे इंजिन 91.18 bhp @5500 rpm  एवढी पावर जनरेट करू शकते त्याचबरोबर 122nm@4400-4800 rpm एवढा टॉर्क हे इंजिन तयार करू शकते. तसेच या इंजिन मध्ये एकूण 3 सिलेंडरचा वापर करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक सिलेंडर सोबत 4 वाल दिलेले आहे. हे एक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन इंजिन आहे यामध्ये 5 स्पीड गिअर बॉक्स देण्यात आलेले असून या इंजिनची ताकद ही कारच्या पुढील चाकांना देण्यात आलेली आहे.

Toyota Hyryder ब्रेक सिस्टीम 

Toyota कंपनीने  याकार मध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केलेला असून यामध्ये देण्यात आलेले ब्रेक हे ए.बी.एस कार्यपद्धतीवर आधारित आहे. तसेच या कार पुढील चाकांसाठी वेन्टीलेटेड ब्रेक दिलेले आहे तर मागील चाकांसाठी सॉलिड डिस्क ब्रेक दिलेले आहे. या कारमध्ये देण्यात आलेले स्टेरिंग हे पावर ऑपरेटेड असून हे स्टेरिंग टेलिस्कोपिक आहे. ते ऍडजेस्टेबल आहे तसेच या कार ची टर्निंग रेडियस ही 5.4 Meter इतकी आहे.

कार मधील पुढील चाकांसाठी मॅक फर्जंन तर मागील चाकांसाठी टोर्षण या सस्पेन्शनचा वापर करण्यात आलेला आहे. बाकी कार कंपनीच्या तुलनेमध्ये या कार मध्ये अतिशय आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केलेला असून या कारमध्ये सस्पेन्शन हे देखील अत्याधुनिक टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. या सस्पेन्शनमुळे कार मध्ये कुठल्याही प्रकारचे दनके जाणवत नाही. या कार मध्ये प्रवास हा अतिशय आरामदायक होतो. 

Toyota Hyryder Dimensions कारचा आकार 

Toyota Hyryder कारच्या डिझाईन बद्दल बोलायचे झाल्यास या कार चा लुक हा अतिशय आकर्षित करणारा आहे. ही कार रुबाबदार आणि भरगच्च असी दिसते. या कारची लांबी ही 4365mm, रुंदी 1795mm, उंची 1645mm इतकी आहे आकाराने ही कार मोठी आहे ही SUV सेगमेंट मध्ये येते. या कारचा आकार हा टाटा कंपनीच्या NEXON या कार पेक्षा थोडा मोठा आहे.या कारमध्ये सीटिंग कॅपॅसिटी ही 5 व्यक्तींची आहे. ज्यामध्ये पुढील सीटांवर 2 व्यक्ती आणि मागे 3 व्यक्ती असे 5 व्यक्ती या कारमध्ये बसू शकतात. या कारचा व्हील बेस 2600mm इतका आहे. तसेच कारचे वजन हे 1300 kg आहे. कारच्या समोर आपल्याला ऍडजेस्टेबल हेड लॅम्प दिलेले आहे.

तसेच हेडलाइट हे प्रोजेक्टर हेडलॅम्प असून ते हॅलोजन देखील आहेत. तसेच कार ला  LED DRL देखील दिलेले आहे. कारचे मागील लाईट हे देखील एलईडी स्वरूपाचे आहे. या कारच्या सर्व टायरची साईज ही 17 इंच इतकी आहे. त्याचबरोबर या टायरला कव्हर देखील कंपनीने दिले आहे. या टायरचे साईज ही 215/60R17 अशी आहे. हे टायर रेडियल असून ते ट्यूबलेस दिलेले आहे कारच्या वरती आपल्याला सनरूफ बघायला मिळत नाही. पाठीमागे शार्क फिन एंटीना दिलेला आहे. कारच्या बाहेरून देण्यात आलेल्या आरश्यांना टर्न इंडिकेटर अटॅच करून दिलेले आहे. तसेच कारच्या मागे स्पॉयलर देखील देण्यात आलेले आहे. या कारमध्ये आपल्याला मागील काचेसाठी वायपर आणि वाशर दिलेले नाही. 

Toyota Hyryder सुविधा 

Toyota कंपनीने कार मध्ये अनेक सुविधा देऊन चालकाला आणि पॅसेंजर ला सोईस्कर अशा गोष्टी दिलेल्या आहेत. कार मध्ये पावरफुल AC देण्यात आलेला आहे. तसेच या AC चे आउटलेट हे मागील सीटासाठी देखील दिलेले आहे. तसेच थंडीच्या दिवसांसाठी कारमध्ये हिटर ची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. कारचालकाचे सीट हे ऍडजेस्टेबल दिलेले आहे तसेच कारचे स्टेरिंग देखील ऍडजेस्टेबल आहे चालक आपल्या गरजेनुसार स्टेरिंग ऍडजेस्ट करून शकतो. कार मध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलचे फीचर्स देखील उपलब्ध आहे. यामुळे कारमधील टेंपरेचर हे मेंटेन ठेवता येते.

तसेच एअर क्वालिटी कंट्रोल देखील उपलब्ध आहे. यामुळे कार मधील हवेची गुणवत्ता ही चांगली राहते. तसेच ॲक्सेसरी पावर आउटलेट, व्हॅनिटी मिरर, रीडिंग लॅम्प, ऍडजस्टेबल हेड रेस्ट, सेंटर आर्म रेस्ट, क्रूज कंट्रोल, पार्किंग सेन्सर, की लेस एन्ट्री, इंजिन स्टार्ट स्टॉप बटन, प्याड्ल शिफ्ट, यूएसबी चार्जर, ग्लो बॉक्स असे खूप सारे फीचर या कारमध्ये आपल्याला बघायला मिळतात. कारच्या आत मध्ये ड्युअल टोन डॅशबोर्ड दिलेला आहे. या डॅशबोर्ड वरती ग्लोव बॉक्स आणि ट्याकोमीटर देखील दिलेले आहे. कारच्या दरवाजांचे हँडल याला क्रोम फिनिशिंग दिलेले आहे. तसेच एअर कंडिशनर पॅनल फॅब्रिक, आर्मरेस्ट अशा अनेक गोष्टींचा वापर आत मध्ये करण्यात आलेला आहे. 

Toyota Hyryder Safety संरक्षणात्मक सुविधा 

कंपनीने Hyryder या कार मध्ये 6 एअरबॅग दिलेल्या आहेत. या एअरबॅग ड्रायव्हर आणि पॅसेंजर या दोन्ही साईडने आहे. तसेच साईड एअरबॅग देखील दिलेल्या आहे. कार मध्ये वापरण्यात आलेले ब्रेक हे एबीएस या पद्धतीवर कार्य करतात यामुळे कार स्लिप होत नाही आणि पलटी होण्याची भीती देखील कमी असते. तसेच सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक अशा सुविधा उपलब्ध आहे. कार मध्ये देण्यात आलेला आरसा हा आधुनिक स्वरूपाचा आहे. हा आरसा दिवस आणि रात्र या दोन्ही प्रकारांमध्ये कार्य करू शकतो. तसेच इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे.

सीट बेल्ट वार्निंग, डोअर अजर वार्निंग, इंजिन इमोबलाइजर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल या सुविधा कार मध्ये उपलब्ध आहे. तसेच कार पार्किंग करण्यासाठी किंवा कार ज्यावेळेस आपण रिव्हर्स घेत असतो त्यावेळेस मागील दिसण्यासाठी कारच्या मागे कॅमेरा देण्यात आलेला आहे. कार मध्ये 360 डिग्री कॅमेरा उपलब्ध नाही. ज्या वेळेस कारचा एक्सीडेंट होतो किंवा कारला जोऱ्याचा दणका बसतो त्यावेळेस कारमध्ये ऑटो सेंसर वापरण्यात आलेले आहे. यामुळे कारचे दरवाजे हे ऑटोमॅटिक अनलॉक होतात. 

हे देखील वाचा : Maruti Suzuki Grand Vitara : हि आहे सर्वात जास्त मायलेज देणारी हायब्रीड कार, कींमत किती असणार?

Toyota Hyryder Entertainment मनोरंजनात्मक सुविधा 

Toyota Hyryder या कार मध्ये 7 इंच एवढा मोठा फुल टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले ब्लूटूथ कनेक्शन वर देखील कार्य करू शकतो. या स्क्रीनला आपण आपला मोबाईल देखील ब्लूटूथ द्वारे जोडू शकतो. याला कनेक्शन करण्यासाठी अँड्रॉइड आणि एप्पल कार प्ले देखील जोडता येते. मोबाईल चार्जिंग करण्यासाठी यूएसबी पोर्ट उपलब्ध आहे. तसेच कार मध्ये एकूण 4 स्पीकर दिलेले आहे. त्यामध्ये 2 स्पीकर हे पुढील बाजूला आहे तर 2 स्पीकर हे मागे देण्यात आलेले आहे. याव्यतिरिक्त कार मध्ये रेडिओ देखील देण्यात आलेला आहे.

हे देखील वाचा : Ind Vs Sl Highlights : भारत श्रीलंका सामना बरोबरीत सुटला, 0 धावांवर भारताच्या 2 विकेट पडल्या

Spread the love