RR VS KKR : IPL 2024 राजस्थानचा 2 गडी राखून कोलकात्यावर विजय,जॉस बटलर चे शतक 

RR VS KKR : IPL 2024 राजस्थानचा 2 गडी राखून कोलकात्यावर विजय,जॉस बटलर चे शतक 

RR VS KKR
RR VS KKR

RR VS KKR : आयपीएल 2024 च्या 31व्या सामन्यात कोलकाता आणि राजस्थान हे दोन संघ आमने सामने आले  केकेआर ने प्रथम फलंदाजी करत असताना  224 धावांचे आव्हान आर आर संघाला दिले केकेआर संघाकडून सुनील नारायण यांनी शतक झळकावत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात  महत्त्वाची भूमिका निभावली परंतु सुनील नारायण याचे शतक व्यर्थ जात राजस्थान संघाने 224 धावा चे आव्हान पार करत सामना जिंकला.

IPL HIGHLIGHTS :- राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि कोलकत्याला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

KKR संघाची आक्रमक सुरवात संघाचे सलामीचे फलंदाज साल्ट आणि सुनील नारायण हे दोघे होते.  साल्ट हा चुकीच्या चेंडूवर फटका मारत झेलबाद झाला आवेश खानच्या गोलंदाजीवर तो त्याच्याच हाती झेल देत बाद झाला साल्ट ने तेरा चेंडू मध्ये दहा धावा केल्या त्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे IPL LIVE SCORE :- दुसऱ्या बाजूने सुनील नारायण हा आक्रमकपणे खेळी करतच होता.

राजस्थान संघाला पहिली विकेट लवकर मिळाली चौथाव्या षटकार मध्ये केकेआर ची पहिली विकेट गेली परंतु दुसऱ्या क्रमांकावर  अंगक्रिष हा फलंदाजीसाठी आला आणि त्याने सुनील नारायण ला चांगली साथ देत संघाचे धावफलक हलते ठेवले या जोडीने  85 धावांची भागीदारी केली ही भागीदारी त्यांनी  फक्त 43 चेंडूमध्ये केली. कुलदीपच्या गोलंदाजीवर अंगक्रिष हा अश्विन च्या हाती झेल देत बाद झाला त्याने 18 चेंडूमध्ये 30 धावा केल्या त्यामध्ये पाच चौकारांचा समावेश आहे संघाचा स्कोर 106 असताना  केकेआर संघाने आपली दुसरी विकेट गमावली.

  RR VS KKR  चौथ्या क्रमांकावर संघाचा कप्तान श्रेयस हा फलंदाजीसाठी आला श्रेयश अय्यर याने आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली परंतु तो जास्त वेळ मैदानावर टिकला नाही त्याला चहलने एसटी चित करत 11 धावांवर बाद केले श्रेयश अय्यरणे सात चेंडू मध्ये 11 धावा केल्या त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार लगावला श्रेयस अय्यर आणि सुनील नारायण या दोघांमध्ये 14 चेंडूंमध्ये 27 धावांची भागीदारी झाली पाचव्या क्रमांकावर केकेआर संघाचा आक्रमक फलंदाज रसेल हा आला पण तोही जास्त धावा न करता स्वस्तात बाद झाला त्याने दहा चेंडू मध्ये तेरा धावा केल्या त्यामध्ये दोन चौकार समाविष्ट आहे संघाचे धावफलक 184 धावा चार बाद आणि 17 ओवर्स असे झाले. रसेल आणि सुनील नारायण मध्ये 19 चेंडू मध्ये 51 धावांची भागीदारी झाली. 

Rinku Singh :- रसेल बाद झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर भारताचा युवा फलंदाज रिंकू सिंग हा आला. रिंकू सिंगने मोठे फटकेलगावत शेवटचे ओवर्स चांगलेच धुतले दुसऱ्या बाजूने सुनील नारायण ने आर आर संघाच्या गोलंदाजांना चांगले चोपत आपले IPL 2024 मधील पहिले शतक पूर्ण केले. सुनील नारायण ने केवळ 56 चेंडूमध्येच 109 धावा चोपल्या त्यामध्ये सहा मोठे षटकार तर 13 चौकार लगावले. अठराव्या ओवर्स मध्ये सुनील नारायण हा बाद झाला परंतु त्याने संघाला मोठे धावफलक उभारून दिले होते.

RR VS KKR सुनील नारायण आणि रिंकू सिंग या दोघांमध्ये आठ चेंडू मध्ये 11 धावांची भागीदारी झाली होती सुनील नारायण बाद झाल्यानंतर रिंकू सिंगच्या साथी  ला वेंकटेश हा फलंदाज आला व्यंकटेश अय्यरणे सहा चेंडू मध्ये आठ धावा करत एक चौकार लगावला आणि तो कुलदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला संघाचे धावफलक 215 वर असताना वेंकटेश अय्यर बाद झाला रिंकू सिंग आणि व्यंकटेश या दोघांमध्ये अकरा चेंडूमध्ये वीस धावांची भागीदारी झाली तो बाद झाल्यानंतर आठव्या क्रमांकावर रमणदीप सिंग हा फलंदाजीसाठी आला शेवटचे षटकार असताना रिंकू सिंह स्ट्राइक आपल्याकडे ठेवत  जास्त धावा काढण्याचा प्रयत्न केला. 

रिंकू सिंगने नऊ चेंडू मध्ये वीस धावा केल्या त्यामध्ये दोन षटकार आणि एक चौकार लगावला रमणदीप सिंग एक चेंडू मध्ये एक धाव करता आली.कोलकाता संघाने 20 षटकांमध्ये 223 धावा केल्या आणि सहा गडी गमावले सुनील नारायण व्यतिरिक्त कोणताही फलंदाज मैदानात जास्त वेळ टिकला नाही एकटा सुनील नारायण ने राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत केकेआर संघाला मोठे धावसंख्या उभारून दिली राजस्थान संघाच्या गोलंदाजी मध्ये कुलदीप आणि आवेश या दोघांना प्रत्येकी दोन विकेट मिळालं  तर बोल्ट आणि चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली अश्विनला एकही विकेट मिळविण्यात यश आले नाही.

 सुनील नारायण याचे शतक :-   केकेआर संघाच्या सलामीच्या जोडीमध्ये सुनील नारायण याने आक्रमकपणे खेळी करत आपले आयपीएल 2024 मधील पहिले शतक नोंदविले वेस्टइंडीज संघाकडून खेळणारा सुनील नारायण हा मुख्यतः गोलंदाजीसाठी ओळखला जातो परंतु आयपीएल मध्ये त्याला केकेआर संघाने फक्त गोलंदाजच नाही तर फलंदाजीसाठी देखील त्याला संधी दिली. संघाला एक जोरदार सुरुवात करून देण्यास तो मुख्य भूमिका निभावतो आयपीएल 2022 मध्ये देखील सुनील नारायण हा सलामीला फलंदाजीसाठी येत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.आयपीएल 2023 मध्ये सुनील नारायणला सलामीला पाठवले नव्हते. 

परंतु या सीझनमध्ये त्याला पुन्हा एकदा संधी देत सलामीला पाठवण्यात आले सुनील नारायण ला सलामीला पाठवण्या मागे केकेआर संघाचा एकच उद्देश असतो तो म्हणजे प्रत्येक चेंडूवर जोरदार टोला लगावत संघासाठी चांगली सुरुवात करून देणे आणि सुनील नारायण यांनी दिलेल्या संधीचा फायदा घेत केकेआर संघाला आतापर्यंत भरपूर सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली आहे आज सुनील नारायण ने अपेक्षेपेक्षा चांगले खेळत संघाला मोठे आव्हान उभे करण्यात मुख्य भूमिका निभावली.

RR VS KKR मैदानावर एकही खेळाडू टिकत नसताना सुनील नारायण हा राजस्थानच्या गोलंदाजांवर एकेरी तुटून पडला होता त्याला चांगली साथ एकही फलंदाज देत नसताना तो न डगमगता मोठमोठे टोले लगावत होता आणि त्याने आपले आयपीएल 2024 मधील शतक देखील पूर्ण केले. आपण  गोलंदाजच नाही तर फलंदाज देखील आहे हे दाखवून दिले त्याला जर एखाद्या फलंदाजाकडून चांगली साथ मिळाली असती तर संघाचे आव्हान हे अजून जास्त असते आणि केकेआर संघ हा सामना जिंकू शकला असता.

हे देखील वाचा !

राजस्थान संघाची सावधपणे सुरुवात :-  केकेआर संघाकडून 224 धावांचे मोठे आव्हान राजस्थान संघाला मिळाले परंतु संघाने सावधपणे सुरुवात केली. राजस्थान संघाची सलामीची जोडी यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर या दोघांनी सावधपणे सुरुवात केले जॉस बटलर हा मोठे टोले लगावण्यात यशस्वी होत होता दुसरीकडून यशस्वी जयस्वाल हा देखील चांगली खेळी करत होता परंतु वैभव च्या गोलंदाजीवर त्याने चुकीचा टोला लगावत व्यंकटेश अय्यरच्या हाती झेल देत तो बाद झाला त्याने नऊ चेंडूमध्ये 19 धावा केल्या त्यामध्ये तीन चौकार आणि एक षटकार लगावला संघाचे धावफलक 22 असताना तो बात झाला.

 यशस्वी जयस्वाल आणि बटलर या दोघांमध्ये 11 चेंडूंमध्ये 22 धावांची भागीदारी झाली तो बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान संघाचा कप्तान संजू सॅमसंग हा आला संजू सॅमसन ने सावर्तने खेळण्यास सुरुवात केली परंतु त्यालाही जास्त वेळ मैदानात टीकता आले नाही तो हर्षित रानाच्या गोलंदाजीवर नारायण च्या हाती झेल देत बाद झाला त्याने आठ चेंडूमध्ये 12 धावा केल्या त्यामध्ये दोन चौकार लगावले.

RR VS KKR आता राजस्थान संघाची स्थिती 47 धावा आणि दोन गडी बाद अशी नाजूक स्थिती झाली होती कप्तान बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर रियान पराग हा आला सध्या फॉर्ममध्ये असलेला रियांन पराग हा कडवी झुंज देत जॉस बटलर ला चांगली साथ दिली या दोघांमध्ये 22 चेंडू मध्ये 50 धावांची भागीदारी झाली संघाचे धावफलक 97 असताना रियांन पराग हा रसेलच्या हाती झेल देत बाद झाला. 

रियान परागला हर्षित राणांनी बाद केले रियान पराग ने 14 चेंडू मध्ये 34 धावा चोपल्या त्यामध्ये दोन  षटकार आणि चार चौकार लगावले रियान परागने संघाला सावरण्यात चांगली भूमिका निभावली तो बाद झाल्यानंतर ध्रुव हा फलंदाजीसाठी आला परंतु त्याला जास्त वेळ मैदानात टिकण्यात यश आले नाही आणि त्याला सुनील नारायण यांनी बाद केले ध्रुवने चार चेंडूमध्ये दोन धावा केल्या आता राजस्थान संघाची स्थिती 100 धावा चार गडी बाद आणि आठ षटकार अशी नाजूक स्थिती झाली होती त्यानंतर अश्विन हा फलंदाजीसाठी आला अश्विनी 11 चेंडू मध्ये आठ धावा केल्या आणि एक चौकार लगावला तो चक्रवर्ती च्या गोलंदाजीवर अंगक्रिष च्या हाती झेल  बाद झाला एका बाजूने जॉस  बटलर हा चांगली खेळी करत होता परंतु त्याला देखील कोणताही फलंदाज चांगली साथ देत नव्हता.

 राजस्थान  संघ हा विजयापासून दूर चालल्याचे दिसत होते अश्विन  बाद झाल्यानंतर हिट माहेर हा फलंदाजीसाठी आला पण त्यालाही चक्रवर्तीने पहिल्या चेंडूवर चालते केले जोऱ्याचा फटका मारण्याच्या धुंदीत  हिटमायर हा श्रेयश अय्यर च्या हाती झेल देत बाद झाला आता राजस्थान संघाची स्थिती 121 धावा सहा गडी बाद आणि बारा षटकार अशी नाजूक स्थिती होती आता या स्थितीतून सावरणे राजस्थान संघाला शक्य नाही असेच दिसत होते आणि केकेआर हा सामना लवकरच जिंकेल असे वाटत होते परंतु एका बाजूने जॉस  बटलर हा टिकून चांगले फटके लगावत धावफलक हलते ठेवत होता.

 IPL LIVE SCORE आता आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी  पॉवेल हा आला त्याने बटलरला चांगली साथ दिली आणि या दोघांनी फक्त 27 चेंडू मध्ये 57 धावांची भागीदारी केली हातातून गेलेला सामना पुन्हा एकदा रोमांचक स्थितीत आलेला होता परंतु सुनील नारायण ने संघाला सातवी विकेट मिळवून दिली त्याने पॉवेल ला चिक बाद केले पॉवेलने तेरा चेंडूमध्ये 26 धावा केल्या त्यामध्ये तीन षटकार आणि एक चौकार लगावला तो बाद झाल्यानंतर ट्रेंट बोल्ट हा फलंदाजीसाठी आला परंतु तोही पहिल्या चेंडूवर धावबाद झाला आता संघाची स्थिती ही 186 धावा आठ बाद आणि 17.3 ओवर्स अशी झाली होती.

 जॉस बट्लर ची कडवी झुंज :- सामना पूर्णपणे केकेआर संघाच्या ताब्यात होता परंतु एका बाजूने जॉस बटलर हा अजून खेळत असल्याने सामन्यांमध्ये थोडीशी चुरस अजून बाकी होती नव्या क्रमांकावर आवेश खान हा फलंदाजीसाठी आला.RR VS KKR आता राजस्थान संघाला 15 चेंडू मध्ये 38 धावांची गरज होती एका बाजूने जॉस बटलर आणि एका बाजूने  आवेश खान हा होता या नाजूक स्थितीतून सामना जिंकणे राजस्थान संघासाठी कठीण होते कारण अवेश खानला जर स्ट्राइक मिळाली तर चेंडू आणि धावांमध्ये अजून फरक वाढला असता आणि राजस्थान संघाला सामना जिंकणे आणखीनच कठीण झाले असत.

बटलरने स्वतःकडे स्ट्राइक ठेवत जोरदार टोले लगावले बटलरने सर्व चेंडू आपल्याकडे ठेवत एकेरी हल्ला चढवला एक धाव निघत असताना देखील त्याने धाव न काढत स्वतःच्या हिमतीवर मोठे टोले लगावले आणि पंधरा चेंडू मध्ये 38 धावांचे आव्हान त्यांनी पार केले शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थानने विजय मिळविलाच बटलरने या सामन्यात महत्त्वाची भूमिका निभावली एकट्याने किल्ला लढवत हा सामना जिंकला कोणताही फलंदाज साथ देत नसताना बटलर हा एकता लढला आणि त्याने संघाला यश मिळवून दिले

हा सामना जिंकत राजस्थान रॉयल हा संघ अंकात पहिल्या क्रमांकावर पोहोचला राजस्थानने सात सामन्यांपैकी सहा सामने जिंकले आणि बारा गुणांसह अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे तर दुसऱ्या क्रमांकावर केकेआर संघ आहे केकेआर संघाने सहा सामन्यात चार सामन्यात विजय इतर दोन सामन्यात पराभव मिळाला आहे केकेआर संघाचे आठ गुण आहेत.

  जॉस बटलर सामन्याचा मानकरी :- राजस्थान संघाकडून सलामीला आलेला जॉस बटलर  याने शेतकी खेळी करत राजस्थान संघाला विजय मिळवून दिला बटलरने एकट्याने किल्ला लढवत या सामन्यात महत्त्वाची भूमिका निभावली दुसऱ्या बाजूने एकही फलंदाज मैदानावर टिकत नसताना देखील बटलरने एकेरी झुंज सुरूच ठेवली आणि केकेआर संघाच्या गोलंदाजांवर आक्रमकपणे हल्ला करत राजस्थान संघाला यश मिळवून दिले.RR VS KKR शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात  राजस्थान संघाला यश मिळाले नाबाद खेळी करणारा बटलर हा सामना मानकरी ठरला संघाची स्थिती नाजूक असताना आणि संघ विजयापासून दूर असताना देखील न डगमगता बटलरने धुवाधार खेळी केली शेवटच्या 15 चेंडू मध्ये 38 धावांची गरज असताना बटलरने स्ट्राइक आपल्याकडे ठेवत जोरदार खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला आयपीएल 2024 मध्ये जॉर्ज बटलरचे हे पहिले शतक आहे.