Tractor Konta Kharedi Krava | शेतकऱ्याने कोणता Tractor खरेदी करावा,किती HP चा घ्यावा ?

Tractor Konta Kharedi Krava | शेतकऱ्याने कोणता Tractor खरेदी करावा,किती HP चा घ्यावा ?

Tractor Konta Kharedi Krava
Tractor

Tractor Konta Kharedi Krava | शेतकऱ्याने कोणता Tractor खरेदी करावा,किती HP चा घ्यावा ? :- देशामध्ये विवध कंपन्यांनी आपले ट्रॅक्टर बाजारात उतरविले आहे. शेतकर्यापुढे खूप सारे पर्याय आहेत ट्रॅक्टर ची निवड करताना.शेतकरी उपलब्ध असलेल्या ट्रॅक्टर मधून योग्य असा ट्रॅक्टर आपल्यासाठी निवडू शकतो. परंतु शेतकर्य समोर प्रश्न उभा असतो कि या सर्व ट्रॅक्टर मधून योग्य ट्रॅक्टर कसा निवडायचा. चला तर जाणून घेवूया सर्व tractor बद्दल माहिती आणि कोणता ट्रॅक्टर खरेदी करणे शेतकर्यासाठी असेल योग्य निर्णय.

आपण सर्व प्रथम सर्व tractor चे वर्गीकरण करून घेवूयात मग शेतकरी त्याच्या सोयी नुसार tractor ची निवड करेल.

  • ट्रॅक्टर खरेदी करण्याची गरज आहे का ? :-  Tractor खरेदी करणे हि एक खूप मोठी गुंतवणूक आहे. पूर्ण शेतीची अवजारे आणि ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी जवळ पास 10 लाख रुपये इतका खर्च येतो. आणि एवढी मोठी गुंतवणूक करण्यासाठी शेती हि जास्त पाहिजे . छोट्या शेती साठी एवढी मोठी गुंतवणूक योग्य ठरणार नाही.त्यासाठी शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
  • ट्रॅक्टर कोणत्या कंपनीचा खरेदी करावा ? :- सध्या काही ट्रॅक्टर कंपन्या देशात लोकप्रिय आहेत.  जसे कि JOHN DEERE, Mahindra, Sonalika, Powertrack,Eicher,Kubota, Swaraj अजून देखील भरपूर अश्या कंपन्या मार्केट मध्ये उपलब्ध आहेत.शेतकऱ्यांनी सर्वप्रथम ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी आपल्या आसपास किंवा गावात कोणत्या कंपनीचे ट्रॅक्टर उपलब्ध आहे  ज्या कंपनीचे ट्रॅक्टर जास्त उपलब्ध असतील शेतकऱ्यांनी त्याच कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी करावा कारण जे ट्रॅक्टर जास्त उपलब्ध आहेत त्यामुळे त्यांचे शोरूम देखील जास्त उपलब्ध असते तसेच त्यांचे सर्विस सेंटर देखील आपल्याला जास्त भेटतील त्यामुळे शेतकऱ्याला ट्रॅक्टरच्या मेंटनसला काही अडथळा  येणार नाही आणि त्याला चांगली सुविधा कंपनीकडून मिळेल.
  • ट्रॅक्टर कोणता घ्यावा 2WD कि  4WD ? : –  शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी दोन पर्याय उपलब्ध असतात ट्रॅक्टर टू व्हील ड्राईव्ह घ्यायचा की फोर व्हील ड्राईव्ह घ्यायचा शेतकरी हा त्याच्या शेता नुसार ट्रॅक्टर खरेदी करताना टू व्हील ड्राईव्ह किंवा फोर व्हील ड्राईव्ह घेऊ शकतो जर शेत हे नरम असेल आणि ट्रॅक्टरला जास्त ताकद न लावता देखील मशागत करता येत असेल तर शेतकऱ्यांनी पुढील ड्राईव्ह ट्रॅक्टर घ्यावा. परंतु जर शेत हे दगडाचे असेल आणि काळे असेल आणि मशागत करण्याला ट्रॅक्टरला जास्त ताकद लावायला लागत असेल तर शेतकऱ्याने फोर व्हील ड्राईव्हची निवड करावी फोरव्हील ड्राइव्ह ट्रॅक्टर हा ओल्या शेत जमिनीत देखील मशागत करू शकतो तसेच टू व्हील ड्राईव्ह हा ओल्या जमिनीत हसण्याची शक्यता असते टू व्हीलर ट्रॅक्टरची किंमत ही फोर व्हीलर पेक्षा कमी असते फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर हा टू व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर पेक्षा इंधन देखील जास्त खातो फोर व्हील ड्राईव्हची मेंटनस किंमत देखील जास्त असते जर शेतकऱ्याला ट्रॅक्टर कडून जास्त जड काम करून घ्यायचे असेल किंवा त्याला ओली शेत जमिनीत ट्रॅक्टर चालवायचा असेल तर त्याने फोर व्हील ड्राईव्हची निवड करावी परंतु जर शेतजमीन ही नरम असेल आणि शेतकऱ्याला जास्त मेहनतीचे काम जर ट्रॅक्टर कडून करून घ्यायचे नसेल तर त्यांनी टू व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरची निवड करावी त्यामुळे त्याचे पैशात देखील बचत होईल आणि मेंटेनन्स देखील कमी लागेल
  • ट्रॅक्टर  किती HP चा घ्यावा ? :-  ट्रॅक्टर हा किती एचपी चा घ्यावा हे देखील खूप महत्त्वाचे आहे एचपी म्हणजे ट्रॅक्टरची ही कार्यक्षमता असते जेवढी ट्रॅक्टरची एचपी जास्त तेवढी ट्रॅक्टरची कार्य करण्याची क्षमता जास्त असते साधारणता ट्रॅक्टर हे 15 एचपी पासून सुरू होतात तर मुख्यतः 50 किंवा ६० एचपी पर्यंत ट्रॅक्टर हे खरेदी केले जातात.महाराष्ट्रात फळबागासाठी मुख्यतः 15 एचपी ते 30 एचपी पर्यंत ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. ट्रॅक्टरची एचपी ज्याप्रमाणे कमी पासून जास्त पर्यंत उपलब्ध आहेत्यानुसार ट्रॅक्टरचे इंधन खबर देखील हे वाढत जाते ट्रॅक्टर जेवढा एचपी ने जास्त असेल  तेवढे तो इंधन जास्त खपत करतो जर शेतकऱ्याला ट्रॅक्टर कडून जे काम करून घ्यायचे ती जर कमी ताकतीचे असेल आणि जर  त्याची शेती ही कमी असेल तर त्याने ट्रॅक्टर हा कमी एचपी चा घ्यावा आणि जर त्याची शेती ही जास्त असेल आणि त्याला ट्रॅक्टर कडून जास्त मेहनतीचे काम करून घ्यायचे असेल तर त्यांनी जास्त एचपी चा ट्रॅक्टर  खरेदी करावा महाराष्ट्रात साधारणता  35  एचपी ते 50 एचपी पर्यंत ट्रॅक्टर हे जास्त प्रमाणात उपलब्ध आहे.
  • ट्रॅक्टर साठी स्पेअर पार्ट उपलब्ध आहेत का ? :-  ट्रॅक्टरची देखभाल करत असताना त्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट हे उपलब्ध असणे गरजेचे आहे ट्रॅक्टर वापरत असताना ट्रॅक्टरला काही अडचण आल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची देखभाल करत असताना त्याला लागणारे स्पेअर पार्ट हे जवळपास उपलब्ध असणे गरजेचे आहे आपण जर ट्रॅक्टर खरेदी केला आणि त्याचे जर स्पेअर पार्ट हे उपलब्ध नसतील तर आपणास अडचण येऊ शकते त्यामुळे आपण जो ट्रॅक्टर खरेदी करत आहोत. त्याचे स्पेअर पार्ट हे आपल्याला जवळपास असणाऱ्या शहरात ते सोप्या पद्धतीने आपल्याला उपलब्ध झाले पाहिजेत मुख्यतः भारतातील कंपनी असलेल्या ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट हे आपल्याला लगेच  भेटतात परंतु जर विदेशी कंपनीचा ट्रॅक्टर असेल जसे की कुबोटा जॉन डियर या ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट भेटणे हे थोडे अवघड असते त्यामुळे या गोष्टी  ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवणे आवश्यक आहे
  •  ट्रॅक्टरचे मायलेज किती आहे ? :- शेतकऱ्याने Tractorखरेदी करण्यापूर्वी ट्रॅक्टरचे मायलेज लक्षात घेणे आवश्यक आहे ट्रॅक्टरची मायलेज हे कंपनीनुसार बदलत असते काही कंपन्यांचे ट्रॅक्टर हे थोडे जास्त मायलेज देतात तर काही कंपनीचे ट्रॅक्टर कमी मायलेज देतात उदाहरणार्थ जॉन डियर ट्रॅक्टर हा मायलेज थोडा कमी देतो परंतु त्याचे कार्य करण्याची क्षमता ही बाकी ट्रॅक्टर पेक्षा जास्त आहे.जॉन डियर ट्रॅक्टर हा बाकी कंपनीच्या ट्रॅक्टर पेक्षा जास्त मजबूत आणि वजन दार आहे त्याचे प्रत्येक स्पेअर पार्ट हे बाकी कंपनीच्या ट्रॅक्टर पेक्षा हेवी आहेत.त्यामुळे त्याचे मेंटेनन्स हे कमी येते व त्याला लवकर काही अडचण येत नाही. तसेच पावरट्रॅक हा जास्त मायलेज देतो तो कमी इंधन खपत करत जास्त कार्य करतो परंतु मजबुतीमध्ये तो जॉन डीअर पेक्षा कमी आहे तेव्हा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की ट्रॅक्टर हा कमी मायलेज देणार घ्यायचा की जास्त मायलेज देणार आहे
  • शेतकऱ्याची आर्थिक कुवत किती आहे ? :- Tractor खरेदी करणे ही एक मोठी गुंतवणूक शेतकऱ्याला करणे शक्य आहे की नाही हे विचार करणे गरजेचे आहे.ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी शेतकऱ्याने त्याचे आर्थिक बजेट तपासणी गरजेचे आहे ट्रॅक्टर हे दोन लाखापासून  ते दहा ते वीस लाखापर्यंत उपलब्ध आहेत शेतकऱ्यांनी त्याच्या कुवतीनुसार ट्रॅक्टर हा खरेदी केला पाहिजे.ट्रॅक्टर हा एकदा खरेदी करून त्याची गुंतवणूक थांबत नसते त्याच्या देखभालीसाठी आणि इंधन साठी पैसे हे लागणार असतात.शेतकरी जेवढा महाग ट्रॅक्टर खरेदी करेल  त्यानुसार पैसे त्याला त्या ट्रॅक्टरच्या देखभालीसाठी लागणार असतात. शेतकरी ने जर महाग ट्रॅक्टर खरेदी केला तर तेवढेच जास्त पैसे त्याला त्याच्या देखभालीसाठी लागणार आणि तेच त्यांनी जर कमी किमतीचा ट्रॅक्टर खरेदी केला तर त्याच्या मेंटेनन्सला देखील पैसे कमी लागणार मोठ्या ट्रॅक्टर साठी लागणारे स्पेअर पार्ट हे देखील महाग असतात आणि त्याचे इंधन खपत हे सुद्धा जास्त असते
  • शेतकरी हा ट्रॅक्टर कुठल्या कारणासाठी खरेदी करत आहे ? :- शेतकरी हा ट्रॅक्टर घरगुती वापरासाठी खरेदी करत आहे की व्यवसाय करण्यासाठी खरेदी करत आहे. शेतकऱ्याला जर व्यवसाय करण्यासाठी ट्रॅक्टर हा खरेदी करायचा असेल तर त्याने ट्रॅक्टर हा हेवी आणि जास्त एचपी चा खरेदी करणे गरजेचे असते कारण व्यवसाय करत असताना ट्रॅक्टरला कुठलाही अडथळा येऊ नये हे गरजेचे असते. Tractor Konta Kharedi Krava | शेतकऱ्याने कोणता Tractor खरेदी करावा,किती HP चा घ्यावा ? व्यवसाय करताना वेळेची बचत झाली पाहिजे आणि त्याचबरोबर काम देखील हे जास्त झाले पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या एचपी चा ट्रॅक्टर घेणे गरजेचे असते आणि तेच जर शेतकरी हा ट्रॅक्टर घरगुती शेतीसाठी खरेदी करत असेल तर त्यांनी ट्रॅक्टर हा कमी एचपी चा घेणे गरजेचे आहे कमी एचपी चा ट्रॅक्टर असल्याने त्याला इंधन खपत देखील कमी होईल आणि त्याला देखभालीसाठी देखील खर्च कमी येईल. 
  • पुन्ह विक्रीसाठी मार्केट उपलब्धता :- ट्रॅक्टर हा जुना झाल्यानंतर विक्री  करण्याच्या वेळेस त्याची किंमत किती येऊ शकते हे देखील विचार करणे गरजेचे आहे ट्रॅक्टर हा जुना झाल्यानंतर त्याची विक्री करताना त्याची किंमत ही त्याच्या परिस्थितीनुसार आणि त्याच्या कंपनीनुसार ठरत असते जर ट्रॅक्टर हा जॉन डियर कंपनीचा असेल तर तो विक्री वेळेस जास्त पैसे करून देऊ शकतो कारण त्याचे वजन हे जास्त आहे.  त्याचबरोबर तो बाकी ट्रॅक्टर पेक्षा जास्त मजबूत आहे त्याचबरोबर ट्रॅक्टर जर हा पावरट्रेक किंवा महिंद्रा असेल तर त्याची रिसेल करत असताना किंमतही कमी येऊ शकते या ट्रॅक्टरला येणारा मेंटेनुसार जॉन डीअर ट्रॅक्टर पेक्षा जास्त त्याचबरोबर तो मजबूतीत देखील त्यापेक्षा कमी असतो.

हे देखील वाचा :- Tractor कोणती battery खरेदी करावी ?

देशातील काही TOP Tractor Brand कोणते आहे ?

  1. JOHN DEERE .
  2. KUBOTA
  3. MAHINDRA
  4. NEW HOLLAND
  5. POWERTRAC
  6. MASSEY FERGUSON
  7. SONALIKA
  8. TAFE
  9. EICHER
  10. HINDUSTAN

हे वाचा : John Deere Tractor : जॉन डियरचा 63 एचपीचा शक्तिशाली ट्रक्टर शेतकऱ्यांच्या साथीला,कींमत?

वरील सर्व गोष्टींचा विचार करून Tractor खरेदी करावा :-

तर याप्रमाणे शेतकरी हा वरील सर्व बाबींचा विचार करून ट्रॅक्टर हा खरेदी करू शकतो शेतकऱ्याने  सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून ट्रॅक्टर हा खरेदी करावा कारण ट्रॅक्टर खरेदी करताना शेतकऱ्यांना खूप मोठी रक्कम द्यावी लागत असते आणि त्याला तो ट्रॅक्टर भरपूर वर्ष साठी सांभाळायचा असतो.

हे वाचा !

Spread the love