Site icon Get In Marathi

USA VS SA : अटीतटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यूएसए संघावर 18 धावांनी विजय

USA VS SA : अटीतटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यूएसए संघावर 18 धावांनी विजय

USA VS SA : T20 वर्ल्ड कप मधील सुपर 8 च्या सामन्यांना सुरवात झाली असून T20 वर्ल्ड कप चा  41 वा सामना यूएसए आणि साऊथ आफ्रिका या 2 संघांमध्ये खेळण्यात आला होता. (USA VS SA) हा सामना अटीतटीचा झाला युएसए संघाने शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. अखेर आफ्रिका संघाने युएसए संघावर 18 धावांनी विजय मिळविला.

USA VS SA

USA VS SA सुपर 8  मधील पहिला सामना हा यूएसए आणि साऊथ आफ्रिका या 2 संघ दरम्यान झाला हा सामना सर व्ही व्ही एन रिचर्ड या मैदानावर खेळविण्यात आला. यूएसए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. साऊथ आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओवर मध्ये 4 गडी गमावत 194 धावा केल्या.(USA VS SA) हे आव्हान पार करताना युएसए संघाने आफ्रिका संघाला कडवी झुंज दिली आतापर्यंत झालेल्या सर्वसामान्यांमध्ये यूएसए संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे तसेच या सामन्यात देखील युएसए संघाने अप्रतिम खेळी केली.

यु एस ए संघाने 20 ओव्हर मध्ये 6 गडी गमावत 176 धावा केल्या. यूएसए संघाने सुरुवातीपासून चांगली फलंदाजी केली आणि सामन्यात चुरस कायम ठेवली. एकवेळेस यूएसए संघ हा सामना जिंकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु साऊथ आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजींनी यूएसए संघाच्या फलंदाजांना रोखले. (USA VS SA T-20 world cup) आफ्रिका संघाकडून क्विंटन डी कॉक याने 74 धावांची खेळी केली आणि संघाचा कप्तान मारक्रम याने 46 धावांची खेळी केली. यूएसए संघाकडून गौस यानी  अप्रतिम अशी नाबाद 80 धावांची खेळी केली. गौस यानी  नाबाद एकेरी झुंज दिली परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. साऊथ आफ्रिका संघासाठी टी-ट्वेंटी विश्वचषकातील हा सलग पाचवा विजय आहे. 

साऊथ आफ्रिका संघाची फलंदाजी 

(USA VS SA) यूएसए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि साऊथ आफ्रिका संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. साऊथ आफ्रिका संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी क्विंटन डी कॉक  आणि त्याच्या साथीला हॅन्ड्रीक्स ही जोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली. या जोडीने साउथ आफ्रिका संघाला चांगली सुरुवात करून दिली या दोघांनी संघाला 16 धावा पर्यंत नेले असताना साऊथ आफ्रिका संघाची पहिली विकेट पडली तिसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर हॅन्ड्रीक्स हा बाद झाला. त्याला सौरभ नेत्रवळकर यानी  कोरि अंडरसन च्या हाती झेल देत बाद केले. हॅन्ड्रीक्स यानी 11 चेंडू मध्ये 11 धावा केल्या त्यामध्ये 1 षटकार लगावला होता.

आता साउथ आफ्रिका संघाची स्थिती ही 16 धावा 1 गडी बाद अशी झाली. हॅन्ड्रीक्स बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आफ्रिका संघाचा कर्णधार मारक्रम हा आला. या जोडीने तुफान अशी फटकेबाजी करत यूएसए  संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या जोडीने 10 ओव्हर मध्ये साऊथ आफ्रिका संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला. या जोडीने तुफान अशी फटकेबाजी करत फक्त 60 चेंडू मध्ये 110 धावांची भागीदारी केली. संघाचे धावफलक 126 असताना साउथ आफ्रिका संघाची दुसरी विकेट पडली. तेराव्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर क्विंटन डीकॉक हा बाद झाला. त्याला हरमीत याने शयन च्या  हाती झेल देत बाद केले.

क्विंटन डी कॉक याने 40 चेंडू मध्ये 74 धावा केल्या त्यामध्ये 5 षटकार आणि 7 चौकार लगावले. क्विंटन डी कॉक बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी डेविड मिलर आला परंतु त्याला एक हि धाव न करू देता हरमित याने आपल्या दुसऱ्या चेंडूवर त्याला बाद केल. हरमित यानी  आपल्या गोलंदाजीवर स्वतः झेल घेत. मिलर ला बाद केले आणि साऊथ आफ्रिका संघाची 126 धावांवर तिसरी विकेट गेली. (USA VS SA) आता साउथ आफ्रिका संघाची स्थिती 126 धावा 3 गडी बाद अशी झाली होती. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आफ्रिका संघाचा आक्रमक फलंदाज कलासेन हा आला. या जोडीने देखील चांगली भागीदारी केली. या जोडीने आक्रमकपणे खेळ करत संघाचे धावफलक हलते ठेवले.

या दोघांमध्ये 15 चेंडू मध्ये 15 धावांची भागीदारी झाली. संघाचे धावफलक 141 असताना साउथ आफ्रिका संघाची चौथी विकेट पडली. साऊथ आफ्रिका संघाचा कप्तान मारक्रम हा बाद झाला. पंधराव्या ओवरच्या सहाव्या चेंडूवर नेत्रवळकर यानी  मारक्रम याला बाद केले.(USA VS SA) नेत्रवळकर यानी अली खानच्या हाती झेल देत मारक्रम याला बाद केले. मारक्रम याने 32 चेंडू मध्ये 46 धावा केल्या त्यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. आता आफ्रिका संघाची स्थिती 141 धावा 4 गाडी बाद अशी झाली होती. आता फलंदाजीसाठी मैदानात स्टब हा आला.

या जोडीने संघाला सावरत तुफान फटकेबाजी केली. कुठलीही चुकी न करता या जोडीने नाबाद खेळी केली. आणि 20 ओव्हर मध्ये संघाला 194 धावा पर्यंत नेऊन पोहोचले. या दोघांमध्ये 30 चेंडू मध्ये 53 धावांची भागीदारी झाली. कलासेन याने  22 चेंडू मध्ये नाबाद 36 धावा केल्या त्यामध्ये 3 षटकार लगावले. तर स्टब याने नाबाद 16 चेंडू मध्ये 20 धावा केल्या त्यामध्ये 2 चौकार लगावले. साऊथ आफ्रिका संघाने 20 ओव्हर मध्ये 4 गडी गमावत 194 धावा केल्या. 

यूएसए संघाची गोलंदाजी 

यूएसए संघाकडून सौरभ नेत्रवळकर यानी  4 ओव्हर मध्ये 21 धावा देत 2 गडी बाद केले. हरमित सिंग यानी  4 ओव्हर मध्ये 24 धावा देत 2 गडी बाद केले.

यूएसए संघाची फलंदाजी 

यूएसए संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी स्टीवन टेलर आणि गौस ही जोडी मैदानात आली. 195 धावांचे आव्हान मैदानात घेऊन उतरलेले यूएसए संघाची सलामीची जोडी ने संघाला चांगली सुरुवात करून दिली. या जोडीने 21 चेंडू मध्ये 33 धावांची भागीदारी केली संघाचे धावफलक 33 असताना पहिली विकेट पडली. चौथ्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर स्टीव्हन टेलर हा बाद झाला. त्याला रबाडा यानी  कलासेनच्या हाती झेल देत बाद केले.

स्टीव्हन टेलर याने 14 चेंडू मध्ये 24 धावा केल्या त्यामध्ये 1 षटकार आणि 4 चौकार लगावले. स्टीवन टेलर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी नितीश कुमार हा आला.(USA VS SA) या जोडीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला परंतु संघाचे धावफलक 53 असताना यूएसए संघाची दुसरी विकेट पडली. यूएसए संघाची दुसरी विकेट ही नितेश कुमारच्या रूपाने पडली. नितीश कुमार हा अगदी स्वस्तात बाद झाला त्याने 6 चेंडूमध्ये 8 धावा केल्या  त्यामध्ये 1 षटकार लगावला. नितेश कुमार याला रबाडा यानी  स्टबच्या हाती जेल देत बात केले.

यूएसए संघाची स्थिती आता 53 धावा 2 गडी बाद अशी झाली होती. नितेश कुमार बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी यूएसए संघा चा आक्रमक फलंदाज एरॉन जोन्स  हा आला. परंतु धावफलकामध्ये 3 धावांची भर पडल्यानंतर एरॉन जोन्स  हा देखील बाद झाला. सातव्या ओवरच्या पाचव्या चेंडूवर यूएसए संघाची तिसरी विकेट पडली. एरॉन जोन्स  याला महाराज यानी  डीकॉकच्या हाती झेल देत बाद केले.(USA VS SA) एरॉन जोन्स  यानी  5 चेंडू मध्ये शून्य धावा केल्या. एरॉन जोन्स  बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी कोरी अँडरसन हा मैदानात आला. ही जोडी चांगली धावा करेल अशी अपेक्षा होती. परंतु अँडर्सन हा देखील स्वस्तात बाद झाला अँडर्सन यानी बारा चेंडू मध्ये 12 धावा केल्या.

त्यामध्ये 1 षटकार लगावला. अँडरसन याला नॉर्किया यानी बोल्ड आउट केले. यूएसए संघाची स्थिती 71 धावा 4 गाडी बाद अशी झाली. आता खूप मोठ्या फरकाने यूएसए हरणार असे वाटत होते. कोरि यांडरसन बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी शयन हा आला. परंतु तोही जास्त वेळ मैदानात टिकला नाही. यूएसए संघाकडून गौस हा एकेरी झुंज देतो होता परंतु त्याला कोणताही फलंदाज जास्त वेळ मैदानात साथ देऊ शकला नाही. शयन याने नऊ चेंडू मध्ये 3 धावा केल्या त्याला शमशी याने पायाचीत बाद केले. आता युएसए संघाचे स्थितीत 76 धावा 5 गडी बाद अशी झाली होती. आता हा सामना संपूर्ण साऊथ आफ्रिका संघाच्या ताब्यात होता.

हे देखील वाचा : Afg Vs Png, Super 8: अफगाणिस्तानचा विजय, सुपर 8 मध्ये दणक्यात एन्ट्री

यूएसए संघ हा सामना मोठ्या फरकाने हरणार असे वाटत होते. 76 धावांवर यु एस एस चा अर्धा संघ बाद झाला होता. आता फलंदाजीसाठी यूएसए संघाचा अष्टपैलू खेळाडू हरमित हा मैदानात आला. या जोडीने संघाला सावरत चांगली खेळी केली. यूएसए संघ 100 धावा करतो की नाही असे वाटत होते परंतु या जोडीने चांगली खेळी करत संघाला सावरले.(USA VS SA) हातातून गेलेल्या सामन्यात यूएसए संघाने पुन्हा आशा जिवंत केल्या. एक वेळ अशी आली की यु एस ए संघ हा सामना सहज जिंकेत असे वाटत होते. परंतु परत साऊथ आफ्रिका संघाच्या गोलंदाजानी भेदक गोलंदाजी करत अमेरिकेच्या फलंदाजांना रोखले.

संघाचे धावफलक 167 असताना हरमित हा बाद झाला. 19 व्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर तो बाद झाला. हरमित याला रबाडा यानी  स्टबच्या हाती झेल देत बाद केले. हरमित यानी  22 चेंडू मध्ये 38 धावांची अप्रतिम खेळी केली होती. त्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार लगावले होते. (USA VS SA) तो बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी जसदीप हा मैदानात आला. जसदीप याला आफ्रिका संघाच्या गोलंदाजांनी रोखून ठेवले. जसदीप यानी  6 चेंडू मध्ये फक्त 2 धावा केल्या.

आणि युएसए संघ 20 ओवर मध्ये 6 गडी गमावत 176 धावाच करू शकला. अखेर यूएसए संघाला 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यु एस ए संघाकडून गौस यानी  नाबाद 14 चेंडू मध्ये 24 धावांची खेळी केली. त्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार लगावले आणि जसदीप यानी  नाबाद 6 चेंडू मध्ये 2 धावा केल्या.

हे देखील वाचा : David Wiese Retirement : देविड वीसे ने घेतला सन्यास,इंग्लडचा नामीबिया वर विजय
साऊथ आफ्रिका संघाचे गोलंदाजी  

साऊथ आफ्रिका संघाचा भेदक गोलंदाज रबाडा यानी 4 ओव्हर मध्ये 18 धावा देत यूएसए संघाचे 3 महत्त्वाचे फलंदाज बाद केले. महाराज, नोरख्या आणि शमशी यांना प्रत्येकी 1,1 विकेट मिळाली. 

सामन्याचा मानकरी

साऊथ आफ्रिका संघाचा सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉक हा या सामन्याचा मानकरी ठरला. (USA VS SA) क्विंटन डीकॉक याने 40 चेंडू मध्ये 74 धावा केल्या त्यामध्ये 5 षटकार आणि 7 चौकार लगावले.

Spread the love
Exit mobile version